ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.413

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१३

सहस्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्रीं देखे । देखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥ नादी नाद भेद भेदुनी अभेद । पश्चिम मार्गी आनंद देखूनी राहे ॥२॥ मन पवन निगम आगम सुरेख । आधार सहस्रदळ देख देहीं नयनीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे डोळां हा प्रणव । निवृत्तीनें अनुभव मज दिधला ॥४॥

अर्थ:-

योगी पुरुषाने सहस्रदळ कमळातील ब्रह्मरध्रातंर्गत नीळी ज्योती पाहिली की त्याचा पाहिलेपणा निघुन जा

तो. नादाच्या ठिकाणी असणारा नादधर्म जगात द्वैत भासत असणारा भेद, अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने नाहीसा करुन तो दैवीसंपत्तीरुप पश्चिम मागनि मन प्राण वेद, शास्त्र अशा तऱ्हेचे भासणारे निरनिराळे पदार्थ या सहस्र दळातील ज्योतीच्या ज्ञानाने ब्रह्मरुप आहेत असे प्रतीतिला येईल. योगाभ्यासातील प्रणवरुप ध्यानाच्या डोळ्यांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला आत्मसुखाचा अनुभव करून दिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *