संत सोपानदेव चरित्र १८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – १८.

अनुक्रमणिका

दुसरा दिवस उजाडला तोच मुळी उत्साहवर्धक!चौघांनीही आपली सकाळची सर्व कामे,आन्हिक आटोपली. तेवढ्यात विनायकबुवा आलेच.त्यांना वंदन केले.गोपाळकृष्णाला साकडं घालुन, मनोमन आईबाबांनाही नमस्कार करुन बुवांसोबत चौघेही बाहेर पडले.धर्म सभेत आज धर्मपंडीतांची गर्दी होती. पैंठणहुन धर्मसभेचे दोन आचार्य,पंडीत मोरेश्वरशास्री आणि आचार्य बोपोदेवाचार्य आले होते.आळंदीचा सगळा ब्रम्हवृंद धर्मपीठात हजर होता. विनायकबुवांनी चौघा भावडांना सोबत घेऊन धर्मगारात प्रवेश करतांना पाहुन अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या, नाकं मुरडल्या गेली तर कांहीनी ही घाण इथ कशाला आणली असं विनायकांना विचारण्यात आले. विनायकबुवांनी धर्ममंडपातील एका रिकाम्या कोपर्‍यात चौघांना उभं राहण्यास सांगीतले.कुणास स्पर्श होणार नाही ही दक्षता घ्या,असं हळुच सांगायला विसरले नाही.चौघानांही खुप अपमानीत व वाईट वाटले पण पर्याय नव्हता.समोर येईल ते सोसावे लागणार होते.समाजा च्या कठोर नियमांच पालन मनात असो वा नसो करावं लागणारच होतं.

धर्मसभा सुरु झाली.आचार्य बोपदेव आणि पंडीत मोरेश्वर शास्रींच्या मार्गदर्शनाखाली नव नवीन मुद्दे मांडल्या जात होते.नवीन संकेत ठरत होते.सामा जिक शास्राचे मुद्दे समजावल्या जात होते सर्व मुद्दे संपल्यावर कोणाला कांही शंका असल्यास,पुढे येऊन विचारावं असं मोरेश्वर शास्रींनी म्हटल्यावर,विनायक बुवा पुढे येऊन नमस्कार करत म्हणाले, कांही गार्‍याणे आपल्यासमोर मांडु इच्छितो,अनुमती असावी.अनुमती मिळताच त्यांनी चौघा भावंडांना समोर बोलावले.इतका वेळ निरामय शांतता असलेल्या धर्मसभेत या चौघांचा प्रवेश झाल्याबरोबर एकच गदारोळ उठला. धर्मसभेत जमलेल्या रुढीप्रिय ब्रम्हवृदां च्या तळपायाची आग मस्तकांत गेली. आक्षेप घेतल्या जाऊ लागले.विनायक बुवांनी त्या चौघा भावंडाना आणले म्हणुन त्यांच्यावरही बहिष्काराची भाषा बोलु लागले.

धर्मसभेत एकच हल्लकल्लोळ माजला.अखेर धर्मपीठ प्रमुख,आचार्य शंकरशास्री सोमणांनी आवाज उंचावुन सर्वांना शात राहण्याचे आव्हान केले.पैठणच्या मोरेश्वर शास्रींनी हा काय प्रकार म्हणुन सोमणशास्रींना विचारल्यावर,हळु आवाजांत सारं कथन केल्यावर,मोरेश्वर शास्रींनी सभेची सुत्र आपल्या हाती घेऊन तिव्र स्वरांत सर्वांना शांत राहण्यास सांगीतले. या धर्मसभेत गार्‍हाणे मांडण्याचा अधिकार कोणाला ही अगदी ग्रामाण्य असले तरी सुध्दा आहे.ही विद्वान विठ्ठलपंतांची मुलं ना? तेव्हा त्यांचे म्हणणे ही धर्मसभा नक्कीच ऐकेल असे म्हणुन विनायकबुवांना पुढे बोलावुन गार्‍हाणे मांडण्यास सांगीतले.ते बोलण्यास सुरुवात करणार तोच,भूदेव! थांबाव!आमचं गार्‍हाणं आम्हालाच मांडु द्यावं अशी धर्मसभेला विनंती आहे. ज्ञानदेवांनी विनायकबुवांना थांबवलं.

मोरेश्वर पंडीत आणि आचार्य बोपदेवांनी आवाजाच्या दिशेने बघीतलं.साधारण सहा ते बारा वर्षापर्यंतच्या वयोगटातील चार मुलं एकमेकांचा हात घट्ट धरुन उभी होती.चौघांचेही चेहरे तेजःपुंज, पण चंद्राची शीतलता,डोळे अत्यंत तेजस्वी! पण बालकाची निरागसता,निर्व्याजता, आवाज खणखणीत,उच्चार स्पष्ट पण स्वरांत अवघ्या विश्वाचं मार्दव भरलेलं, उभं राहण्याची ऐट,लक्षवेधी नम्रता अशा या चार लेकरांना पाहुन पैठणचे जेष्ठ आचार्य व पंडीत स्तिमित झालेत. त्या चार बालकांत त्यांना ब्रम्हा, विष्णु,महेश व चिमुकल्या कन्येत आदी मायेचे बालरुप दिसले.नतमस्तक उभ्या असलेल्या या कपाळकरंट्यांना,धर्म बुडव्यांना धर्मसभेबाहेर घालवायचे सोडुन ही दोन्ही आचार्य त्यांच्याकडे नुसते बघत काय बसले हेच ब्रम्हवृंदांना कळेना.धर्मगारांत निरव शांतता पसरली होती.त्या निरव शांततेचा भंग करत विचारले,बाळांनो कोण तुम्ही?काय हवय आचार्य आम्हाला न्याय हवाय!एवढ्या निरागस मुलांवर कोणी अन्याय केला? निःसंकोचपणे सांगा!आचार्यदेव आमच्या वर या धर्मसभेनच अन्याय केला आहे. नम्रतेने नतमस्तक होऊन निवृत्ती म्हणाले


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *