संत सोपानदेव चरित्र १९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – १९.

अनुक्रमणिका

निवृत्तीनाथांच्या स्वरांतील मार्दव्याचं कौतुक वाटुन आचार्य म्हणाले,सांग बाळ अनुमती आहे.मान झुकवुन पुढे येत म्हणाले,आचार्यदेव!मी विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई कुळकर्णीचा जेष्ठ पुत्र, आणि गहिनीनाथांचा शिष्य निवृत्ती!मी द्वितिय पुत्र, निवृत्तीदादाचा धाकटा बंधु व शिष्य ज्ञानदेव!जेमतेम ७-८ वर्षाचं चंद्रासारखा शितल चेहरा,डोळ्यात निरागस भाव,किंचित कावरीबावरी झालेली नजर असलेले सोपानदेव पुढं येऊन म्हणाले,मी कनिष्ठ पुत्र,आणि निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांचा कनिष्ठ बंधु व शिष्य सोपानदेव!नंतर मुक्ता पुढे येऊन, जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करीत म्हणाली,मी सर्वात धाकटी कन्या,मुक्ता! तिचा तो निरागस,निष्पाप,निर्वाज्य मुद्रा पाहु बोपदेवांना गलबलुन आले.अरे बाळांनो!तुमच्या सारख्या अबोध बालकां वर कुणी रे अन्याय केला?शास्री पंडीतांनी ?की, धर्मपंडीतांनी?त्यांनी तिव्र स्वरांत पृच्छा केली.

निवृत्तीनाथ म्हणाले,माझ्या वडीलांनी आईची मूक संमती गृहित धरुन सन्यास घेतला.सद्गुरु श्रीधरपंत स्वामींच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रमी बनले.त्यामुळे त्यांना समाजात बहिष्कृत केले.त्यानंर आम्हा चार भावाडांचा जन्म झाला.त्यांच्यावर ग्रामण्य घातलं.माझ्या पित्याने तीन कृच्छे,तीन चद्रायणे,जात कर्मादि विधी व गुरुंच्या आज्ञेनुसार प्रायश्चितही केले.पण बहिष्कार उठला नाही.समाजाकडुन अवहेलना,अत्याचार अपमान,तिरस्कार सोसतच आम्ही मोठे होत आलो.माझं मौंजीबंधनाचं वय झाल्यावर वडील धर्ममार्तडांना भेटुन हात पाय जोडुन उपनयानाची अनुमती मागीतली,पण अनुमती न देतां त्यांचे कडुन घडलेल्या धर्मबाह्य वर्तनासाठी त्यांना देहान्त प्रायश्चिताची शिक्षा सुनावली.बोलतां बोलतां निवृत्तींनाथांचा आवाज कापरा झाला म्हणुन ज्ञानेश्वर पुढे येऊन बोलु लागले.

धर्मसभेच्या आदेशानुसार माझ्या आईबाबांनी देहान्त प्रायश्चित घेतलं,त्या वेळी हा निवृत्तीदादा केवळ १०,मी ८, सोपान ६ व ही मुक्ता केवळ चार वर्षाची होती हे सांगतांना ज्ञानदेवांच्या डोळ्यांतुन अश्रू ओघळु लागले. त्यांचा कंठ दाटुन आल्याने सोपान पुढे होऊन म्हणाले, आचार्यदेव!आम्हा अजान,अज्ञान चार भावंडांना पोरकं,अनाथ करुन नेहमी साठी आमचे आईबाबा देहान्त प्रायश्चित घेऊन निघुन गेले.त्यांनी धर्माचा,धर्म शास्राचा,धर्मसभेचा मान ठेवुन व आमच्या पुढील भविष्यात कल्याण व्हावे म्हणुन दिलेली शिक्षा मुकाट भोगली. शिक्षा भोगत असतांना आम्हा लेकरां साठी त्यांचं काळीज तिळतिळ तुटल नसेल?एवढी लहान,अजान मुलं कशी जगतील?कशी वाढतील?काय खातील? कसे राहतील?त्यांना कांहीच वाटले नसेल?पण आमच्या उज्वल भविष्याचा विचार करुन उरावर मणामणाचा दगड ठेवुन देहान्त प्रायश्चित घेतले.सोपानांना बोलवेना,अविरत अश्रू वाहु लागले. निवृत्ती पुढे येऊन म्हणाले,आचार्यदेव! आमच्या आईवडीलांनी आम्हाला अनाथ पोरकं करुन प्रायश्चित घेतल्यावरही या धर्मसभेने आमच्यावरचा बहिष्कार, ग्रामण्य उठवलं नाही,उलट समाजाने जेवढा जास्त अन्याय,अत्याचार करतां येईल तेवढा केला.अवहेलना,तिरस्कार, झेलत,अर्धवट मिळत असलेल्या माधुकरीवर जीवन जगत आहोत.

सोपान म्हणाले,आचार्यदेव!मृत्यु नंतर वैर संपते ना?प्रायश्चितानं पापं धुतली जातात ना? मग आईवडीलांच्या मृत्युनंतरही आमच्याशी मांडलेलं वैरत्व कां संपवलं नाही?आणि हे जर बरोबर असेल तर त्यांच्या देहान्त प्रायश्चीताला कांहीच अर्थ नसेल तर,त्यांचा मृत्यु म्हणजे हत्या ठरणार असं नाही कां वाटत आपल्याला?सोपान जरी अत्यंत संयमानं,मार्दवतेनं,नम्रतेने बोलत असले तरी त्यांच्या अंतःकरणात ज्वालामुखी भडकला होता.मस्तकावरची शीर ताड ताड उडत होती.चेहरा लाल झाला होता. त्यांची ही अवस्था बघुन ज्ञानदेवांनी मुक्ता ला खुणावुन सोपानचा हात तिच्या हातात दिला.आणि स्वतः बोलायला सुरुवात केली.आचार्यदेव!आम्हा चौघा भावंडांना बहिष्कारांतुन मुक्त करुन आमच्यावरच ग्रामण्य काढुन समाजात सन्मानाने सामावुन घ्यावं व उपनयन संस्काराला अनुमती द्यावी एवढंच आमचं मागण आहे.त्या चौघांचे दिनवाने चेहरे बघुन बोपदेवांचं काळीज तुटलं.त्यांनी तिथल्या तिथे धर्मसभेचे प्रमुख शंकर शास्री सोमणांना सगळे शास्रास्र शोधुन या मुलांना परत समाजात सामावुन घेण्याचा आदेश दिला.आम्हीही पैठणला गेल्यावर शास्रपुराणे शोधतो.बाळांनो निश्चिंत रहा.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *