भाग – १७.
निवृत्तीनाथ सोपानांना ओंकार समजावत पुढे म्हणाले,ओंकारातला दुसरा स्वर आहे ‘ऊ’ऊ हे उच्छावारनाचं, त्यागाचं,समर्पनाचं,समर्पनशीलतेच तत्व आहे.अविनाशी तत्वाशी समरस होण्या साठी आत्म्याचं अधिष्ठान ‘ऊ’ या स्वराला लाभलं आहे.ओंकारांतील तिसरं अक्षर आहे ‘म’ म हे व्यंजन आहे.’म’ चा उच्चार करतांना वरचा ओठ खालच्या ओठाला स्पर्श करुन प्राणतत्व कोंडलं जातं आणि ते प्राणतत्व ह्रदयाकडे जाते.’म’ हा महा मंडलाचा अधिदाता असुन महानता, विशालता हे त्याचं तत्व आहे.या विशाल तेजोवलयाचं सगुन,साक्षात रुप म्हणजे ओंकार!या सगळ्यांतुन स्रवत निवृत्तींचा आवाज सोपानांच्या मस्तकातल्या संवेदनाच्या तारा झंकारत होत्या आणि सोपान ज्ञानामृतांचे कण ग्रहण करीत होते.ज्ञानदेव सुध्दा मिटल्या डोळ्यांनी निवृत्तीदादांच्या मुखातील शब्द नी शब्द जीवाचे कान करुन ऐकत होते.मुक्ता एकटीच घरी असल्याची जाण आल्याने तिघेही घराकडे लगबगीने निघाले.
दुपारी जेवणं सुरु असतांना भीत भीत मुक्ता निवृत्तींदादांना म्हणाली,दादा! आईने शिकवलेली भगवद् गीता माझी मुखोद्गत आहे.मला पण सगळं शिकायच, शिकवशील?तिघांनाही तीचे कौतुक वाटले.जेवणं झाल्यावर,चौघेही अंगणातील शेवग्याच्या झाडखाली बसले.ज्ञानदेव तिघांना उद्देशुन बोलायला सुरुवात केली. गुरुशिवाय जशी ज्ञानसाधनेला दिशा नाही तसेच उपनयन सस्काराशिवाय ज्ञानसाधनेला अधिकार,आकार नाही. आपल्या बाबांचीही तीच इच्छा होती व त्यासाठी त्यांनी देहान्त प्रायश्चित घेतले. तेव्हा उद्या विनायकबुवांना सोबत घेऊन धर्मसभेत गार्हाण मांडुन न्याय मागु. निवृत्तींनी दुजोरा दिला.सोपान म्हणाले, पण!धर्ममार्तडांनी न्याय दिलाच नाही तर दोघांनाही ही शंका होतीच!मुक्ता म्हणाली, मग आपण त्याहीपेक्षा वरच्या धर्मसभेत जाऊन न्याय मागु.
दुसर्या दिवशी धर्मसभेत जायच ठरलं. कसं आणि काय काय बोलायचं यावर चर्चा झाली.अचानक निवृत्तींनी विचारले,ज्ञानेशा!खरच आपल्याला मोंजीबंधना सारख्या संस्काराची गरज आहे?सध्या जसं समाजापासुन अलिप्त राहतो तसच जन्मभर राहीलो तर?कशाला हवेत समाजाभिमुख संस्कार? समाजाची स्विकृती?ज्ञानदेवांच्या लक्षात आलं दादा परीक्षा पाहताहेत.क्षणभर विचार करुन ज्ञानदेव म्हणाले,दादा!आपण सन्यस्त वृत्तीने राहणार ते या समाजातच ना?ज्या समाजांत अज्ञान अंधश्रध्दा पसरली आहे,त्या समाजाला आपण शहाणं,डोळस करण्याचा प्रयत्न करणार आहोत ना?मग त्या समाजाचे कांही नीतिनियम,आचारसंहिता पाळायला नको? दादा! ही मौजीबंधनाची अनुमती आपण आपल्यासाठी घेत नसुन, समाजा त मिसळुनच समाजमन जाणता आलं पाहिजे तरच मळ आपल्याला स्वच्छ करतां येईल.डोळे मिटुन ऐकत असलेल्या सोपानांचे मत विचारल्यावर ते म्हणाले,
“भक्ती हे हरति।जाती न सरती।ञु
ऐसी आत्मस्थिती। स्वसंवेद्या।।”
असं असतांना भक्तीचं अधिष्ठान मानुन अज्ञानाला उद्बोधन करण्यासाठी समाज स्विकृती जरुरीची असेल तर अवश्य घ्यावी.तीघेही आश्चर्यमुग्ध झाले.निवृत्तीं नी सोपानांना मिठीत घेत विचारले,ओवी बध्द शब्दरचना कधीपासीन करतोस रे? कधी आणि कुठे शिकलास?गदगदल्या स्वरांत निवृत्ती म्हणाले,सोपाना मी धन्य झालो.माझे दोन्हीही शिष्य लोकोत्तर, युगोत्तर ठरणार!उद्यापासुन वेदाभ्यासाचं अभिवचन मिळाल्याने,सोपानांचा नव संजीवनी,प्रेरणा,स्फुर्ती,आत्मविश्वास दुणावला.त्या छोट्या झोपडीत भर माध्यन्हीला प्रसन्नतेच चांदणं अवतरलं..
तेवढ्यात बाहेरुन विनायक बुवांची हाक ऐकु आली.बोला बाळांनो! काय काम आहे? निवृत्ती म्हणाले,भूदेव! ज्यासाठी आमच्या आईबाबांनी देहान्त प्रायश्चित घेतलं,तरी अजुनपर्यंत आमच्या वरचं ग्रामण्य उठवलं नाही,ते उठवावं, समाजात सामावुन घ्यावं,आमच्या मौंजी बंधनाला अनुमती मिळावी,यासाठी आम्ही चौघे विज्ञप्ती पत्र घेऊन आपल्या सवे धर्मसभेत जावे,त्यासाठी आपली मदत हवी म्हणुन बोलावले.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.
