संत सोपानदेव चरित्र १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – १०.

अनुक्रमणिका


आईवडीलांची दशक्रीया विधी करायचे ठरवले पण,अनेक अडचणी समोर आल्या.अखेर कावेरीआक्का धावुन आल्या.त्यांच्या चिरंजीवाने आणि विनायकबुवांनी दिलेला मदतीचा हात पुरेसा होता.दिवसभर दशक्रीया विधी साठी लागणारे सामान,शिधा,पाणं,फुलं गोळा करण्यसाठी निवृत्ती,ज्ञानदेव बाहेर होते.सोपानही कांहीबाही कामं करीत होते.लहानग्या मुक्ताईला कश्याची गडबड आहे हेच कळेना.अखेर तिची जिज्ञासा तिला समजेल अशा भाषेत समजावुन सांगीतली.दशक्रीया विधी व मनाची पण सगळी तयारी होत आली.
ही अनाथ पोरकी चार भावंड आपल्या आईवडीलांची दशक्रीया विधी करणार ही गोष्ट वनव्यासारखी गांवात पसरली.चर्चेला उधान आले.त्यातही दोन गट पडले.एक मुलांच्या बाजुने व दुसर्‍या गटाचे म्हणणे की,पापी,अधर्मींच्या मुलांना ही क्रीया करण्याचा अधिकार नाही.हे सर्व या भावंडांच्या कानावरही आले,पण त्यांनी आपला संयम ढळु दिला नाही.


आणि दिवस उजाडला.विठ्ठलपंतां नी संस्कृत,संस्कृती,शास्रोक्त व अशास्र संस्कारांची ओळख करुन दिलेली होतीच कावेरीआक्का व विनायकबुवासह चारही भावंडे गंगाकाठावर गेलीत.आई वडीलांची अस्थीच नसल्यामुळे ही मुलं दशक्रीया श्राध्दविधी कशी करणार यावर लोकांचे तर्कवितर्क चालु होते.निवृत्ती, ज्ञानदेव विधीची तयारी व मांडामांड करीत होते.सोपानही मदतीला होतेच. मधेच सोपानांनी विचारले,दादा!
“जातस्याहि ध्रुवो मृत्यर्धृवं जन्म मृतस्यच” अर्थात जन्मास आलेल्या व्यक्तीस मरण आणि मृतास जन्म या गोष्टी अटळ असतात असं भगवद् गीता सांगते,मग हा श्राध्द विधी कां करायचा?निवृत्तींनी ज्ञानदेवांकडे सूचक बघितल्यावर, ज्ञानदेवांनी सोपानांच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले,सोपाना! ” श्रध्दया क्रीयते यत् तत् श्राध्दम्” असंही वेदात सांगीतलं आहे.”

वासांसि जीर्णानी यथा विहाय नवाति ग्रह्याति नरोsपराणिं तथा।शरीराणि विहाय जीर्णान्यन्याति संयति नवानि देही।” असही भगवद् गीतेत सांगीतले आहे.अर्थात ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्रे टाकुन नवीन वस्रे धारण करतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करुन नवीन शरीर धारण करतो. सोपाना! मृत्यु अटळ पण सुंदर आहे. सोपाना! मनुष्य मृत्यु पावल्यावर त्याचं शरीर नष्ट होते,पण आपलं त्या व्यक्ती बद्दलचं प्रेम,आदर,स्नेह या भावना तर नष्ट होत नाही ना?ह्या भावनाच त्यांची स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी श्राध्दविधी करुन त्यांना अन्नोदक देऊन त्यांच्या विषयीच्या ह्याच भावना त्यांच्या निर्वाणा नंतरही ह्रदयात कायम आहे असे त्यांना आश्वासक वचन देतो.आणि याचसाठी हा श्राध्दविधी करायचा असतो.


विनायकबुवांच्या मार्गदर्शनाखाली साधन सामग्रीची शास्रशुध्द मांडामांड करायला निवृत्ती-ज्ञानदेवानी सुरुवात केली.तिघेही भाऊ गंभीर होते.त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.स्वतः सावरुन निवृत्ती दोघा भावांना म्हणाले, आईबाबांचे पार्थीव सांपडली नसल्यामुळे आपण पलाशविधीने श्राध्द करणार आहोत.पण दादा!ब्राम्हण आणि किरवंत मिळाले नाही तर? निवृत्ती म्हणाले,तर आपण वेदांतात सांगीतल्या प्रमाणे चट श्राध्द विधी करुं.पिंडदान करुन काक स्पर्श करुन घेऊ आणि आईबाबांच्या आत्म्यांना आव्हान करुन हविर्भाग गंगेत अर्पण करु.


सर्व श्राध्दविधी आटोपल्यावर झाडावर बरेचसे कावळे गोळा झाले होते पण ते पिंढाला स्पर्श करीत नव्हते. विनायकबुवा म्हणाले,पोरांनो! तुमच्या आईबाबांची कोणती तरी इच्छा अपुरी राहिली असावी.निवृत्ती पुढे होणार तोच, दादा थांबा! थांबा!आईबाबांना काय सांगायचे ते मी सांगतो असे म्हणुन ज्ञानदेव पुढे झाले.सोपानही त्यांच्या बाजुला जाऊन उभे राहिले.ज्ञानेश्वरांनी चित्त एकाग्र करुन,डोळ्यात अवघी उर्जा एकवटली.आणि दिसली लहरणारी दोन विरळ शरीरं,त्यांच्या आईबाबांचे!चौघाही भावंडांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले आणि ज्ञानेश्वरांनी बोलायला सुरुवात केली.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *