संत सोपानदेव चरित्र ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – ६

अनुक्रमणिका


सोपानांनी आईच्या नांवे फोडले ला टाहो झोपडीचे छत फाडत त्या ध्वनीने इंद्रायणीचा जणूं थरकाप उडाला. आपल्या या संथ वाहणार्‍या “जीवनदायीनी” या नावाला काळीमा फासणारं ठरलं.सोपानाच्या फोडलेल्या टाहोनं इंद्रायणीची ही अवस्था? तर त्याला कुशीत घेतलेल्या निवृत्तींची अवस्था काय झाली असेल?मुक्ताई तर लहान होती,तिची समजुत कशीही पटेल पण,सोपान?आईपण आठवण्याइतके जाणते होते,ते कसे आईशिवाय राहु शकेल?

निवृत्ती घायाळ नजरेने ज्ञानेशा कडे पाहत होते.सोपानांनी त्यांना घट्ट मिठी मारुन हुंदक्यावर हुंदके देत होते आणि असाह्य,केविलवाणे,निवृत्ती ज्ञानदेव मुकपणे त्याचं रडणं बघत होते.
आईच्या अनंत आठवणी सोपानांच्या मनात पिंगा घालत होत्या.डोळ्यातुन वाहणार्‍या प्रत्येक अश्रूतुन आईची एक एक आठवण झिरपत होती.दोन दिवस झाले तरी आई बाबा आले नाहीत आणि आतां ते परत कधीच येणार नाही हे सत्य स्विकारायची मनाची तयारी करुन म्हणाले, निवृत्तीदादा!यापुढे आई म्हणुन रडणार नाही.वेगळाच सोपान झालेला असेल.मुक्ताईची आई व बाबा या दोन्हीही भूमिका निभावेन.मुक्ताईला हसरं ठेवायचं असेल तर सोपानाला रडुन चालणार नाही.तुम्ही व ज्ञानदादांनी सांगीतलेल्या जीवनाच्या मार्गावरुन हा सोपान पावलं टाकेल.तीन भावांचा संवाद मुक्ताई रडणे विसरुन विस्फारल्या डोळ्यांनी पाहत,ऐकत होती.तिच्याही निरागस बाल मनाला एवढं कळलं की, आतां आई बाबा परत येणार नाही.


उद्यापासुन कोणी काय कामे करावी याचा आराखडा करणें सुरु असतांनाच,दूरुन विनायकबुवा येतांना दिसले.आल्यावर त्यांनी धीर एकवटुन, अवसान गोळा करुन म्हणाले,मुलांनो! एक अत्यंत दुःखद वार्ता सागण्याचे दुर्भाग्य माझ्या वाट्याला आले.उच्च वर्णीय समाजानं तुमचा स्विकार करुन, मौंजीबंधनाला मान्यता द्यावी,यासाठी धर्मसभेने दिलेली देहान्त प्रायश्चिताची शिक्षा तुमच्या आईवडीलांनी स्विकारुन स्वतःस गंगेत समर्पित केले.तुम्ही आतां पोरके झालात.चौघांच्याही गालावरुन ओघळणार्‍या अश्रूंबरोबरच मूर्तीमंत निश्चयही ओघळत होता.निश्चयी स्वरांत ज्ञानदेव म्हणाले,अखेर हिंदु धर्मातल्या कर्मठ कर्मकांडांनी आपल्या आईबाबां चा बळी घेतला.त्यांचं ब्रम्हसभेकडुन शुध्दीपत्र मिळवण्याचं अपुरं काम पूर्ण करुं.

आणि दादा!यापुढे धर्मातल्या कर्मठ कांडापायी पुनः कोणाचा बळी जाणार नाही असं कांहीतरी करणं हेच माझ्या जीवनाचं उदिष्ट असेल.त्या चौघांचा संयमीपणा,आईवडीलांच्या मृत्युची बातमी धीरोदत्तपणे स्विकारल्याचा समंजसपणा,परमेश्वरावरचा गाढ विश्वास एकमेकांंबद्दलची आत्यंतिक माया, श्रीपादस्वामीची विठ्ठलपंताच्या पोटी चार अलौकिक रत्न जन्माला येणार ही भविष्यवाणी त्यांना आठवली.चौघांच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत, आशिर्वाद देऊन परत गेले.


आईबाबा कायमचे निघुन गेले हे सत्य कितीही क्लेशकारक असले तरी स्विकारणं भाग आहे.यापुढची वाटचाल आत्मनिर्भर होऊन करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर म्हणाले,मुक्ते! विनायक भटजीं ची पत्नी कावेरी आक्काकडुन आवश्यक गोष्टी शिकुन घे. आजचा तुझ्या चार वर्षा च्या बालपणांंतला शेवटचा दिवस समज. सोपाना!तूं जास्तीत जास्त लक्ष विद्या भ्यासाकडे व मुक्ताईकडे दे!आपण सन्यासाची पोरं म्हणुन समाज आपल्या ला धिक्कारेल,हेटाळणी,अपमान,अन्याय करतील,पण हीच सन्यासाची पोरं काय करु शकतात,हेच या समाजाला दाखवुन द्यायचं आहे.या चौघांची दुर्दम्य इच्छा शक्ती आणि केलेला संकल्प सिध्दीस नेण्याची धडपड पाहतां नियतीलासुध्दा विचार करावा लागेल.भविष्याविषयी समोर सारा अंधार असतांनाही चौघेजण निद्रेच्या स्वाधीन झाले.


दुसरा दिवस उजाडला तोच मुळी वेगळाच.नेहमीप्रमाणे निवृत्ती-ज्ञानदेव गंगाघाटावर गेले.निष्पाप मुक्ताई अजुन उठलेली नव्हती.सोपानांना जाग आली आणि कर्तव्याची जाणीव झाली आणि घर अंगणाच्या साफसफाईला सुरुवात केली.तेवढ्यात खांद्याला अडकवलेली झोळी व उद्विग्न चेहर्‍याने निवृत्ती ज्ञानेशां नी घरांत प्रवेश केला.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *