ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.406

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०६

शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥ जागृति स्थूळ तूर्या महाकारण । हेचि कीर खूण तुझे ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हे जाणिजे । देहीं नाद गाजे परेवरी ॥३॥

अर्थ:-

ब्रह्म व माया यांचा भेद अर्धनारीनटेश्वरा प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एका शंकराच्या काही भागात पार्वतीचे रूप दिसते, वास्तविक पार्वतीला वेगळे रूप नाही. खरे रुप शंकराचेच असते. त्या प्रमाणे मायेचे वेगळे स्वरुप नाही. ती ब्रह्माच्या काही भागावर भासते. या गोष्टीचे वर्म लक्ष्यात घ्या.ज्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था व स्थूल, सूक्ष्म, कारण वगैरे देह भासतात.त्या प्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी माया भासते. योगाभ्यासाने परावाणीमध्ये जो अनुहत ध्वनी होतो तो ऐकू येऊ लागला म्हणजे मायेचे मिथ्यात्व कळून ब्रह्मप्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *