संत सोपानदेव चरित्र २२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग – २२.

अनुक्रमणिका


गेल्या २०-२२ दिवसांच्या शिणवट्याने थकलेल्या चौघांनाही दुसर्‍या दिवशी जरा उशीराच जाग आली ती मामीआजीच्या आवाजानेच!आज त्यांच्याकडे श्राध्द असल्यामुळे गडबड सुरु होती.त्यांनाही ब्राम्हणभोजन झाल्या वर जेवायचे निमंत्रण दिल्यावर सोपानाचे चेहर्‍यावरची चिंता पाहुन निवृत्तीनाथांनी कारण विचारले.दादा!आपण इथे असल्याने कांही विपरीत तर घडणार नाही ना? आणि झालेही तसेच…
मध्यान्ह उलटली तरी,कोणीही बहिष्कृत नातवंड घरांत असल्यामुळे जेवायला आले नाहीत.संतापाने श्रीधर पंत मुलांवर ओरडत म्हणाले,हे सर्व तुमच्यामुळे घडलय!तुमच्यामुळे आज माझे पितर उपाशी राहणार,त्यांना अन्नोदक मिळणार नाही,हे पाप माझ्या माथी बसेल.आणि आमच्यामुळे आपल्या स्वर्गस्थ पितरांना अन्नोदक मिळाले तर?ज्ञानदेवांनी दृढ स्वरांत विचारले.मामाआजोबांच्या चेहर्‍यावर संताप तसाच होता.
ज्ञानदेवांनी डोळे मिटले आणि सोपानांना मामाआजोबांच्या स्वर्गस्थ पितरांना बोलावण्याची आज्ञा केली. आज जरी त्यांच्या वडीलांचंच श्राध्द असलं तरी,त्यांचे सगळेच पितरं आज इथे येऊन जेवतील.ज्ञानदेवांच्या आज्ञेने सोपान वाड्याबाहेर गेले.मामाआजोबांना काय वाटले कुणास ठाऊक,त्यांनी पुजेच्या ताटातील तीळ घेऊन दाराबाहेर टाकत आव्हान केले.


“आगच्छंतु श्राध्दकाले पितृपितामह प्रविता महः।आर्गच्छामः।अस्मत् पितृ पितामह प्रविता महस्थाने क्षणं दत्वा भवभ्दीः प्रसादः कर्तव्यः।”
त्यांच आवाहन पुर्ण झालेही नाही तोच ज्या दारांतुन सोपान बाहेर गेले,त्याच दारातुन त्यांचे पितर आंत येऊं लागले. भान हरपुन श्रीधरपंतानी मामीआजीला हाक मारली.मामी गडबडीने बाहेर आल्यावर समोरचे दृष्य पाहुन गांगरल्या तोच त्यांचा हात धरुन मुक्ताई म्हणाली, चला मामीआजी!या सगळ्यांना वाढायला घेऊ या ना?लगबगीने दोघीनी ही साग्रसंगीत सर्व वाढल्यावर सर्व पितरं आसनस्थ होऊन शांतपणे जेऊ लागली.

अन्नाचा सुवास बाहेर दरवळु लागला. आपण कुणीच जेवायला गेलो नसतांना कृष्णाजीपंताच्या घरी पंगत कुणाची बसली हे बघायला ब्राम्हण तिथे आले आणि समोरचे दृष्य पाहुन दिडःमुढ झाले त्यांना दिसले,वाड्याबाहेर सोपान व वाड्याच्या अंगणांत ज्ञानेश्वर हात जोडुन डोळे मिटुन उभे आहेत आणि वाड्याच्या पडवीत चक्क कृष्णाजी पंताच्या पितरांची पंगत बसलेली.ब्राम्हणांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता स्वतःला चिमटे काढुन बघत होते.पण समोर घडत असलेले सुर्यप्रकाशा इतके सत्य होते.पितर जेवुन उठले.कृष्णाजी पंतांनी त्यांना मनोभावे प्रणिपात केला. सर्व पितर स्वर्गस्थ झाले आणि सोपान आंत आले.


मामाआजोबांचा त्यांच्याविषयीचा आकस गेला व मामाआजोबांनी चौघानां ह्रदयाशी कवटाळले.क्षमा मागीतली. आग्रहाने त्यांना जेवुं घातले.जेवणं झाल्यावर चौघेही भावंड खोलीत आल्या वर,मुक्ताईनं सोपानांना विचारले,दादा!तूं कां बरं बाहेर थांबला होतास?आणि ती सगळी पितरं गेल्यावरच तू आंत आलास सोपान म्हणाले,मुक्ते!ज्ञानदादांनी आज्ञा केल्यानुसार आजोबांच्या पितरांना आव्हान केले आणि ज्ञानदादानं आपल्या योगसामर्थ्यानं त्यांना या भूतलावर आणले,पण त्यांच्याबरोबर कांही पाशवी शक्तीही येऊ पाहत होत्या.त्या जर आल्या असत्या तर श्राध्द निर्विघ्न पार पडु शकले नसते.त्या शक्तींना रोखुन धरण्यासाठी मी वाड्याबाहेर थांबलो.


तेवढ्यात मामाआजोबांनी धर्म सभेत चलण्यासाठी बाहेर बोलावलं.इथं घडलेला वृतांत त्यांच्या कानी गेला आहे.
पैठणच्या धर्मसभेत येण्यासाठी या भावंडांनी मैलोगणती पायपीट केली होती,आता तो क्षण,ती वेळ आली होती, स्वतःला सिध्द करण्याची!
धर्मसभेच्या व्यासपीठावर आचार्य बोपदेवशास्री व दुसर्‍या आसणावर राम शास्री बसले होते.कृष्णाजीपंत आणि चौघा भावंडांनी आचार्यांना वंदन केले.
आणि त्यांच्या आज्ञेने चौघानीही आपापली ओळख करुन दिली.सभेतील कांही ब्राम्हणांनी त्यांच्या नांवांची हेटाळणी,उपहास करत असलेले पाहुन, सोपानदेव हात जोडुन म्हणाले, आचार्य! आपली अनुमती असेल तर,या भूदेवांच्या शंकेचं निरसन करुं का?

क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *