संत सोपानदेव चरित्र २१

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – २१.

अनुक्रमणिका


आपण मोठा भाऊ,गुरु असल्याचं दाखले देऊन हरप्रकारे निवृत्ती समजावुन सांगत दार उघडायची गळ घालुं लागले. सोपानही रडवेला होऊन म्हणाले,अरे दादा!तूच तर सांगीतले ना की,संन्यास्या ने रागालोभापलिकडे गेलं पाहिजे,दादा! संताप आवर!समाजानं तुला दुःख दिलं म्हणुन तू स्वतःला शिक्षा कां करतोहेस? त्यापेक्षा समाजाला स्वच्छ कर!उघड की रे दादा कवाड!ज्ञानदादा दोघांचेही ऐकत नाहीसे पाहुन मुक्ता आपल्या लाडक्या दादाची समजुत घालायला पुढे होऊन….


“योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा।।
विश्व रागे झाले वन्हीं।संती सुखे व्हावे पाणी।।
शब्दशस्रे झाले क्लेश।संती मानवा उपदेश।।
विश्वपट ब्रम्ह दोरा।ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
मुक्ताबाईच्या मुखातुन इतकी सशक्त, निर्दौष,स्वच्छ अभंगरचना,लाडिवाळ अविर्भाव,गहिरा स्वर,भावनेनं ओथंबले ला आवाज आणि आर्तता!ज्ञानेश्वरच काय पण झोपडीच्या भिंतीनाही पाझर फुटला.ताटी उघडा ज्ञानेश्वराsss या आर्त हाकेनं राग,रुसवा,संताप विसरुन ज्ञानेश्वर बाहेर आले.सगळ्यांना रडु आवरेनासे झाले.ज्ञानदेव बाहेर येऊन निवृत्तीदादांच्या पायावर कोसळुन माफी मागीतली.सोपानांचे डोळे पुसले,मुक्ताई ला कुशीत घेतले नी त्यांचा बांध फुटला.
घळघळ रडणारी मुक्ताई शांत,समंजस होऊन समजुत घालत असल्याचे पाहुन सर्वांना मोठे कौतुक वाटले.


दुसर्‍या दिवशी पैठणला जाण्या साठी चौघांनी आळंदी सोडली.मजल दर मजल करीत ही भावंंड आपेगांवला त्यांच्या वडिलोपार्जित घर असलेल्या गांवी आलेत,पण तिथेही त्यांना हेटाळणी तिरस्कार!कुत्सीकता,विखारी घाव झेलत गावाबाहेर पडले.आणि चौघेही पैठणला पोहोचले.पैठणला विठ्ठलपंताचे आजोळ होते.त्यांचे मामा कृष्णाजीपंत देवकुळे यांनीही आपल्या या नातवंडांना वाड्यात जागा दिली नाही.

पण मामींनी त्यांच्या विरोधात जाऊन गोठ्याजवळची खोली देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली.या विरोधाभासाने सोपान कासावीस झाले.त्यांची कासाविसी पाहुन निवृत्तीदादा म्हणाले,धर्मकांडांचा विळखा इतका जबरदस्त असतो की, अपलं परकं याचं भान विसरतो. संध्या काळी मामीआजींनी तुळशीवृंदावना जवळ सांजवात केल्यावर,या चौघांच्या आवाजाने व सुस्पष्ट मंत्रोच्चाराने वाडा दुमदुमुन गेला.ओंकारनाद,गायत्री जप झाल्यावर भगवद् गीतेच्या उच्चारवर्णाला सुरुवात झाली.
“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चेवं किं कुर्वत संजयः”! पडवीतल्या झोपाळ्यावर रामरक्षा म्हणत असलेले कृष्णाजीपंत ह्या सर्व प्रकाराने स्तिमित झाले.ही आपली नातवंड सामान्य नसुन,ईश्वरांचे अवतार आहे याची त्यांना जाणीव झाली.


संध्याकाळचे जेवणे आटोपल्यावर ज्ञानेश्वर पैठणच्या धर्मसभेबद्दल बोलत असतांना सोपानदेव म्हणाले,दादा!पैठण च्याही धर्मसभेने आपल्याला नाकारले शुध्दीपत्रक दिले नाही तर?तर आपण काशीच्या महासभेत आपलं गार्‍हाणं मांडु!पण दादा!काशीला जाणं सोपं नाही निवृत्ती म्हणाले,आपल्याला हटयोग अभ्यास येतो,त्या सामर्थ्याचा वापर करुन समाजोपयोगी अस्तित्व सिध्द करु
कांही तरी वेगळं,अघटीत घडलं की,लोकं आकर्षित होतील.समाजाचं प्रबोधन, उद्बोधन करणं कर्मकर्तव्य तसेच लोकांना ज्ञान देऊन त्यांच अज्ञान दूर करणं आपलं जीवित कर्तव्य समजुन लोकं आपल्याकडे आकर्षित होतील असं केलं पाहिजे.

सोपानांच्या बोलण्यांतील सुस्पष्टता,सुसंगती,तर्कशुध्दता होती. काय म्हणायचं हे ज्ञानेशांना उमजलं,पण पटलं नव्हतं.दादा! समाजाला या अज्ञाना तुन,कर्मकांडातुन,बाहेर काढायचं असेल तर,त्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित होणं जरुरी आहे,तरच मांतव्य जपणारा एक नवा समाज निर्माण होईल.मग कोण्या विठ्ठलपंत-रुख्मिणीला देहान्त प्रायश्चित घ्यावं लागणार नाही.पुन्हा कुणाची लेकरं अनाथ होणार नाही, बहिष्कृत होणार नाही.यासाठी उर्जेचं सामर्थ्य,योगसामर्थ्य समाजाला समजावुन देणे नितांत गरजेचं आहे. बोलतां बोलतां सोपानांचा आवाज गहिवरला,गळ्यात हुंदका दाटला.
क्रमशः संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading