रक्षाबंधन वा राखीपौर्णिमा : धनंजय महाराज मोरे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

रक्षाबंधन

वर्णन: rakshabandan
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधनहा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात नारळी पौर्णिमाया नावाने तो साजरा केला जातो. रक्षाबंधनाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. परंतु, आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत. यापैकी पहिल्या कथेला धार्मिक महत्त्व आहे. बाकीच्या सर्व कथा बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक व या सणाच्या महत्त्वासंबंधी आहेत.

कहाणी रक्षाबंधनाची!

इंद्र- इंद्राणी
एकदा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दु:ख दूर होते.भगवान कृष्ण म्हणाला- हे श्रेष्ठ पांडवा! एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू झालेले युद्ध जवळ जवळ बारा वर्षांपर्यंत चालले होते. असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते. अशावेळी इंद्र देवतांसह अमरावतीला पळून गेले. तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकांत आपले वर्चस्व निर्माण केले होते. इंद्र देवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञ-कर्म करू नये. सर्व लोकांनी माझी (स्वत: ची) पूजा करावी.
दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञ-वेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले. धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली. हे पाहून इंद्राने आपले गुरू बृहस्पतींच्या चरणी प्रार्थना केली, की गुरूवर्य! अशा परिस्थितीत मला इथेच जीव द्यावा लागेल, मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणार नाही. अशावेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा.
गुरूवर्य बृहस्पतिने इंद्राचे दु:ख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले. श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले.
येन बद्धो बलिर्राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वामभिवघ्नामि रक्षे मा चल मा चल:।
इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी द्विजांपासून स्वतिवाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठविले. रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली आहे.
संरक्षणाचे बंधन-रक्षाबंधन
एकदा राजस्थानच्या दोन राजांमध्ये भांडण चालू होते. त्यातील एका राजावर मोगलांनी आक्रमण केले. आक्रमणाची संधी ओळखून दुसर्‍या राजपूत राजाने मोगलांना मदत करण्यासाठी सैन्य तयार ठेवले होते. पन्ना पण या मोगलांच्या वेढ्यात अडकलेली होती. तिने दुसर्‍या राजाला (म्हणजे मोगलांची मदत करणार्‍या राजाला) राखी पाठविली. राखी मिळाल्यानंतर त्याने उलट मोगलांवरच आक्रमण करून त्यांना पराभव केला. अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या कच्च्या धाग्याने दोन राजांच्या मैत्रीचे पक्के सूत्र बांधले.
कृष्ण-द्रौपदी
एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्याने रक्ताची धार वाहत होती. हे सर्व पाहून द्रौपदीला राहवले नाही. तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. कृष्ण- द्रौपदीत बहिण-भावाचा बंध निर्माण झाला. त्यामुळे नंतर जेव्हा दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या हाकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली. हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो.
चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.
नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.
पौराणिक कथा व इतिहास चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.
काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहिणीच्या स्नेहाचा रक्षाबंधनया सणाचे महत्त्व कायम आहे.
रक्षाबंधनामागील शास्त्र काय ?
यमलहरींमुळे व पृथ्वीकणांमुळे संयोगाने पृथ्वीवर निर्माण होणार्‍या आच्छादनाचा, म्हणजे रक्षेचा आसुरी शक्‍तींना उपयोग होऊ नये, म्हणून त्यांचे स्त्री-शक्‍तीने पुरुषतत्त्वाच्या माध्यमातून केलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन.
या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींच्या गतिमानतेतून निर्माण होणार्‍या घर्षणात्मक ऊर्जेतून वायुमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजकणांना पृथ्वीकणांच्या संयोगाने ज्या वेळी जडत्त्व प्राप्‍त होते, त्या वेळी हे कण भूमीवर आपले आच्छादन तयार करतात. यालाच `रक्षाअसे संबोधले जाते.
बलिराजा हा या रक्षेतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींचा आवश्यकतेप्रमाणे आसुरी शक्‍तींच्या पोषणासाठी उपयोग करून घेतो; म्हणून या दिवशी भूमीला आवाहन करून तिच्या साहाय्याने बलीला बंधन घालण्याचे प्रतीक म्हणून स्त्री-शक्‍ती कार्यमान पुरुषाला राखी बांधते, म्हणजेच रक्षारूपी कणांना ताब्यात ठेवून वायुमंडलाचे रक्षण करण्यासाठी विनवते. सर्वसमावेशक अशा तांदुळाच्या कणांचा समुच्चय हा राखीचे प्रतीक म्हणून कार्यमान पुरुषाच्या हातात बंधन म्हणून बांधला जातो.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे? आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आहे ही सूचित होते.
रक्षाबंधन राशीनुसार आपल्या भावाला राखी बांधा
रक्षाबंधन हा सण सर्व सणांमध्ये मोठा आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते. तेव्हा भाऊ आपल्या यथाशक्तीने बहिणीला भेट देऊन तिच्या रक्षेच वचन घेतो.
मग आता पाहूया राखीच्या या सणासाठी तुमचा रक्षा सूत्र कसा हवा. ज्योतिषानुसार आपल्या भावाला राशीनुसार जर राखीची निवड केली तर तो सूत्र भावासाठी कल्याणकारी राहील.
मेष किंवा वृश्चिक राशी असल्यास लाल रंग किंवा गुलाबी राखीची निवड करावी.
वृषभ किंवा तुला राशीसाठी चांदीची राखी किंवा सिल्वर कलरच्या राखीची निवड करू शकता.
मिथुन किंवा कन्या राशी असलेले भावांसाठी हिरवा, निळा, गुलाब, सोनेरी रंगाचा निवड योग्य असेल.
कर्क राशीच्या भावांसाठी पांढरा, क्रीम, पिवळा, नारंगी रंगाची निवड शुभ ठरेल.
सिंह राशीच्या भावांसाठी गुलाबी, नारंगी, सोनेरी, निळा-काळ्या रंगांना सोडून बाकी सर्व रंगाच्या राखीची निवड करू शकता.
धनू किंवा मीन राशीच्या लोकांसाठी केशरी, पिवळा, नारंगी, सोनेरी, फिकट लाल रंग शुभ ठरतील.
मकर व कुंभ राशी असणार्‍या भावांसाठी आस्मानी, निळा, फिरोजी, हिरवा रंग शुभ ठरेल.
या प्रकारे रंगांची निवड करून राखीच्या या पवित्र सणाला तुम्ही खास बनवू शकता.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *