वै. बाबा महाराज सातारकर संपूर्ण परिचय

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Kirtankar of Varkari Baba Maharaj Satarkar
Babamaharaj Satarkar Passed Away:
Baba Maharaj Satarkar बाबा महाराज सातारकर
Baba Maharaj Satarkar : बाबा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार होते;
अनेक जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भावना
महाराष्ट्रातील सामान्यांपर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचविण्याचे काम वै. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी केले. बाबामहाराज सातारकर हे भक्तिभावात तल्लीन होऊन कीर्तन करायचे. वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार, अध्वर्यू हे त्यांच्या निधनाने हरपले असल्याची भावना वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांनी व्यक्त केली.
वारकरी संप्रदायात बाबामहाराज सातारकर यांचे भाषेवर प्रभुत्व होते. कुशल वाणी व हजरजबाबी गायकीतून त्यांनी कीर्तन केले. नामनिष्ठ, प्रेमनिष्ठेतून त्यांनी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी त्यांना शब्दसुमनांजली अर्पण करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली

सलग सात वर्षे घेण्यात आलेले बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन
शनैश्वर उत्सवात ९० च्या दशकात संस्कृती वैभव संस्थेतर्फे पिंपळपारावर सलग सात वर्षे घेण्यात आलेले बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन नाशिककरांच्या आजही स्मरणात आहे.

२ श्रद्धांजली :- रामकृष्ण लहवितकर
बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रभावी प्रसार केला. ऐश्वर्याची वचनाक्षी, ईश्वरवती ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले. सुशिक्षित समाजात त्यांनी वारकरी संप्रदायाचे बीजारोपण केले. सोप्या, सुलभ भाषेत त्यांनी कीर्तनाला गायनाची झालर दिली. – रामकृष्ण लहवितकर

१ श्रद्धांजली :- मुरलीधर पाटील
भक्तिभावात तल्लीन होऊन बाबामहाराज सातारकर कीर्तन करायचे. समाजातील थोर कीर्तनकार आपल्यातून हरपले आहेत. – मुरलीधर पाटील

अन् वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज आणि त्यांच्या लोकप्रिय कीर्तनातून एक पिढी घडली, त्याचे श्रेय बाबामहाराज सातारकर यांना जाते.
वारकरी संप्रदायासाठी दिलेले मूल्य असे योगदान म्हणजे हरिपाठ व अमृतानुभव ग्रंथांवरील बाबामहाराज सातारकर यांची गोड अशी प्रवचने, तसेच त्यांच्या स्वर्गीय आवाजात हरिपाठ व श्री पांडुरंगाचे काकडा भजन ऐकून अनेकांचे पाठांतर झाले. अशा या थोर माहात्म्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. वारकरी संप्रदायातील पोकळी कधीही न भरणारी आहे. – नवनाथ गांगुर्डे, विश्वस्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर

प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..
बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
वारी केली
महत्वाची बाब म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा त्यांनी वारी केली होती.

बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
5 फेब्रुवारी 1936
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला.
बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
सातारा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला
बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
चाल
वयाच्या चौथ्या वर्षी बाबा महराज यांनी त्यांचे आजोबा असलेले दादा महाराज यांच्या कीर्तनात चाल म्हटली.
बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते.
दादा महारांचीच हीच शिकवण पुढे बाबा महाराजानी पुढे जपली.
माझे वय ८३ आणि माझी वारी ८४ वी. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे असे एका बाबा महाराज म्हणाले होते.
विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज
प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा
………………………………………………………………………………..

Baba Maharaj Satarkar Died At The Age Of 89. His Wari Love And His Life Journey Know In Details Srr99

.विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज व वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची पहिली चाल गायली.

ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती,ते प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा जपली होती.
लहानपणापासूनच बाबा महाराज त्यांचे आजोबा आणि आई-वडिलांसोबत वारी करायचे. बालपणापासून सुरु असलेली ही त्यांची वारी वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा त्यांनी सुरु ठेवली होती. दादा महाराजांचे लहानपणापासूनच लाडके असणारे बाबा महाराज होते. खूप लहानपणापासून ते त्यांच्यापुढे बसून कीर्तन ऐकायचे. तेव्हापासून त्यांच्या कानावर जे काही पडले ते त्यांच्या संस्कारात उतरले.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची कुळपरंपरा आहे. ती त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपली.


वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाला सुरुवात
वयाच्या चौथ्या वर्षी बाबा महराजांनी दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हटली. त्यांना दादा महाराजांच्या पायाला जखम असतानाही चिखलात उभे राहून कीर्तन करताना पाहिले. आणि हीच निष्ठा पुढे बाबा महाराजांच्या पिढीने पुढेही जपली.
प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दादा महाराज हे बाबा महाराजांच्या आजोबाचे नाव. एक नातू म्हणून बाबा महाराजांनी आजोबांची सगळे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बाबा महाराजांच्या पिढीत आजपर्यंत वारी कोणी चुकवलेली नाही. आजोबा दादा महाराज, वडील भाऊ महाराज त्यानंतर मी. माझ्या पुढची मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत होते.

वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी लिहीलेल्या एका लेखात त्यांना सांगितले होते की, “माझे वय ८३ आणि माझी वारी ८४ वी. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. ” त्यांच्या वयोमानाने त्यांच्याकडून वारीत चालणे होत नव्हते तरी ते चार पाऊले वारीत चालून गाडीतून वारी अनुभवायचे.

………………………………………………………………………………………………………

प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात. आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.

नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

पंढरीची वारी आहे माझ्या घरी! ३५ वर्षांपासून दापोडीतील दोन मैत्रिणींची एकत्र पायीवारी
बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.
Gas Cylinder च्या स्फोटात कऱ्हाड हादरलं! दोन मुलांसह सात जण होरपळून जखमी, पाच घरांचं 20 लाखांचं नुकसान
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.

बाबा महाराज सातारकरांच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
अन् वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज
………………………………………………………………………………..

“बाबा महाराज सातारकर यांचं कार्य प्रेरणादायी कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ शब्दांत वाहिली आदरांजली

बाबा महाराज सातारकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली
आज मी बाबा महाराज सातारकरांच्या निधनाचं वृत्त ऐकलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो. बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबा महाराज सातारकर आज वैकुंठवासी झाले. त्यांनी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे जनजागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. बाबा महाराज सातारकर हे अत्यंत साधेपणाने आणि सरळ संवाद साधत असत. बाबा महाराज सातकरकर यांची वाणी आणि शैली लोकांचं मन जिंकत असे. त्यांच्या वाणीमध्ये कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी आज त्यांना श्रद्धांजली वाहतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- बाबा महाराज सातारकर: फर्निचरचे व्यावसायिक ते ज्येष्ठ निरुपणकार! कीर्तनकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं?
प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
………………………………………………………………………………..
ज्येष्ठ निरुपणकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती.

बाबा महाराज सातारकर: फर्निचरचे व्यावसायिक ते ज्येष्ठ निरुपणकार! कीर्तनकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं?
कीर्तन, निरुपण रक्तात भिनवून घेतलेले बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

बाबा महाराज सातारकर यांचं निधन (फोटो-फेसबुक पेज, बाबा महाराज सातारकर)
ज्येष्ठ निरुपणकार, कीर्तनकार, प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांनी संपूर्ण आयुष्य कीर्तन परंपरेला वाहिलेलं होतं. बाबामहाराज सातारकर यांच्या घरातच वारीची आणि संतवाड्:मयाची परंपरा होती. त्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. विठ्ठल सोप्या शब्दांमध्ये सांगणारी एक वाणी आज शांत झाली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलभक्तांवर शोककळा पसरली आहे.

सातारा या ठिकाणी झाला जन्म
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ ला झाला. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्यांचं नाव होतं. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या घरात १३५ वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर यांचे वडील दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंग वादक होते. तर त्यांचे चुलते अप्पा महाराज सातारकर आणि अण्णा महाराज सातारकर परमार्थाचे धडे त्यांनी घेतले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी मृदूंग वादनाचे धडे घेतले. तर २६ मार्च १९५४ ला बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला.

निरुपणकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं?
१९५० ते १९५६ या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. “१९५६ मध्ये माझा पाच ते सहा लाखांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण तो व्यवसाय मी करणं थांबवलं. जे काही होतं ते कवडीमोल दरात विकलं. मी माझ्या वडिलांना सांगितलं की ज्याला भांडवल लावलं आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकलं आहे ते टिकवून धरु. जे प्रारब्धात असेल ते होईल. असं सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करु लागलो” असंह बाबामहाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार झाला.

फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला
बाबा महाराज म्हणाले होते “जर फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला नसता तर मला कोट्यवधी रुपये मिळाले असते. पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलंही नसतं. त्या दुकानात खुर्ची चांगली मिळते. पण आज माझं जगभरात नाव आहे का? तर वारकरी आहे म्हणून.वारकरी झालो त्याचीच फलश्रुती आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना बरोबर घेऊन चालतो. स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही. दुसऱ्याच्या निंदेवर तुमची इमारत कच्ची आहे हेच आमचा वारकरी संप्रदाय सांगतो” असंही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. ८० वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मानकरी परंपरा त्यांच्या घरात आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा १०० वर्षांपासून त्यांच्या घरात आहे.

बाबामहाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार
१. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार,
२. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार,
३. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे.
४. पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत.

बाबामहाराज सातारकर यांचे ट्रस्ट
१. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था – १९८३
२. बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान – १९९०
या दोन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष बाबामहाराज सातारकर आहेत.

विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी का नाही? बाबा महाराज सातारकर यांनी सांगितलं कारण
“पुंडलकाची आई वडिलांची भक्ती पाहून विठ्ठल स्वतः आला. ही केवढी मोठी सामाजिक घटना आहे. ज्याला आई नाही आणि बाप नाही तो पांडुरंग. कारण पांडुरंगच सगळ्यांचा आई बाप आहे. विठ्ठल बाप, माय, चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमचे जीवन. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल आमचा निजाचा. सज्जन सोयरा जिवाचा. माय, बाप, चुलता, बंधू अवघा तुझसी संबंधू ! समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया! हे तुकारा महाराजांनी म्हणून ठेवलं आहे. या भूमिकेतू विठ्ठलाचा अवतार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी नाही. काही काळ होती. सानेगुरुजींनी ती बंदी हटवली.” असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वारकरी संप्रदायात एकनाथांनी दाखवून दिलं की कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. ज्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे तो पवित्रच आहे. तसं जीवनात उलटसुलट गोष्टी घडणारच. परिपूर्णतेने सुखी कोण आहे? कुणीच नाही. पण ज्या उणिवा वारीत भरुन निघतात. सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यायला पंढरीची वारी शिकवते. सहनशीलता वारी शिकवते. वारीतली सहनशीलता घरी आली तर अवघाची संसार झालाच म्हणून समजा. असंही बाबा महाराज सातारकर यांनी म्हटलं होतं. विठ्ठल, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या रचना ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. त्यांचा आदर्श समोर ठेवत पुढे अनेक कीर्तनकार घडले आहेत. विठ्ठलाशी एकरु होऊन त्याचा विचार सगळ्यांपर्यंत पोहचवणारे बाबा महाराज सातारकर यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. मात्र त्यांच्या प्रवचनांमधून ते कायमच आपल्या बरोबर राहतील यात शंका नाही.

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
Kirtankar Baba Maharaj Satarkar Death News in Marathi

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं ८८ व्या वर्षी नेरूळमध्ये निधन.
Kirtankar Baba Maharaj Satarkar Death News in Marathi
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं ८८व्या वर्षी निधन
Baba Maharaj Satarkar Died Marathi News: प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.

किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.

सातारकर फडाची परंपरा
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातं असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती! आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.

बाबा महाराज सातारकर यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा वाटा मोलाचा होता.…
शास्त्रीय गायनाचेही धडे
बाबा महाराज सातारकर यांनी जसं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं, तसंच त्यांनी शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. ११व्या वर्षापासूनच त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते.

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. अतिशय सहज साध्या आणि रसाळ वाणीतून त्यांनी ज्ञानेश्वरी व संत साहित्याचे निरुपण केले. त्यांच्या निधनामुळे संतसाहित्याचे एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी…

१९६२ साली आप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन-प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली.

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
त्यांचे निधन ही वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी आहे. वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट…

भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. या सप्ताहांना लाखो भाविकांची मोठी गर्दी होत असे.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार-प्रसारासाठी आणि प्रबोधनासाठी अर्पण केलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि भक्तांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो…
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातू शोक व्यक्त करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) आपल्या भावना व्यक्त करताना बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही एक्सवर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात पत्नी रुक्मिणी सातारकर यांचंही निधन
दरम्यान, याचवर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी ह. भ. प. रुक्मिणी उर्फ माई सातारकर यांचंही ८६व्या वर्षी निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांच्यासमवेत रुक्मिणी सातारकर यांनीही वारकरी संप्रदाय परंपरा पुढे वाढवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. खाद्यसंस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखनही केलं होतं.

वारकरी वैभव

………………………………………………………………………………..

………………………………………………………………………………..

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *