कंठव्या, तालव्य, मुर्धन्य, दंतव्य, ओष्ठ्य मराठी व्याकरण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कदाचित माहीत नसेल, पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे. तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.


क, ख, ग, घ, ङ – यांना कंठव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना तालव्य म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना मूर्धन्य म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना दंतव्य म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना ओष्ठ्य म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा .


आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

जय मराठी !
क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ….
•••••••••••••••••••••••••••••••••••
क – क्लेश करू नका
ख- खरं बोला
ग- गर्व नको
घ- घमेण्ड करू नका
च- चिँता करत राहू नका
छ- छल-कपट नको
ज- जवाबदारी निभावून न्या
झ- झुरत राहू नका
ट- टिप्पणी करत राहू नका
ठ- ठकवू नका
ड- डरपोक राहू नका
ढ- ढोंग करू नका
त- तंदुरुस्त रहा
थ- थकू नका
द- दिलदार बना
ध- धोका देऊ नका
न- नम्र बना
प- पाप करू नका
फ- फालतू कामे करू नका
ब- बडबड कमी करा
भ- भावनाशील बना
म- मधुर बना
य- यशस्वी बना
र- रडू नका
ल- लालची बनू नका
व- वैर करू नका
श- शत्रुत्व करू नका
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा
स- सत्य बोला
ह- हसतमुख रहा
क्ष- क्षमा करा
त्र- त्रास देऊ नका
ज्ञ- ज्ञानी बना !!

कृपया सर्व लोकांना पाठवा.
मराठी बोला अभिमानाने 🙏

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *