श्रीयंत्र संपूर्ण माहिती व पूजन विधी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीयंत्र

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे ‘श्रीयंत्र’, ‘नवचक्र’ आणि ‘महामेरु’ असेही म्हणतात. सर्व यंत्रामधील ही शिरोमणी आहे आणि त्याला ‘यंत्रराज’ असे म्हणतात .या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुरसुंदरी( षोडशी ) जो वैदिक श्रीदेवी महालक्ष्मी आहेत. श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने श्री लक्ष्मी व संपत्ती, ऐश्वर्याची हरसिद्धि प्राप्ती होते.


आदिशंकराचार्य व पुष्पदन्त यांनी रचलेल्या “सौदर्यं लहरी” नावाचा या संस्कृत भाषेतील ग्रंथात “श्री यंत्र” उपासनाविषयी सांगितले आहे .
हिंदू व्रतवैकल्यांमध्ये श्री लक्ष्मी पूजनातील एक आकृती आहे. हा एक तांत्रिक पूजेचा किंवा कर्मकांडाचा भाग आहे. हे यंत्र कागदावर द्विमितीय आकृती स्वरूपात किंवा सोने किंवा पंचधातू यांपासून त्रिमितीय स्वरूपात तयार केले जाते. याचे विशिष्ट प्रकारचे निश्चित असे मोजमाप असते. भारतातील अनेक मंदिरांत प्राचीन काळापासून श्रीयंत्रे स्थापित केलेली दिसून येतात.


श्री यंत्राच्या मध्यभागी एक बिंदु असून त्याच्याभोवती चारही बाजूंनी एकातएक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात. हे नऊ त्रिकोण नऊ शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. या नऊ त्रिकोणांच्या अंतरभाजनाने एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात. या आकृतीभोवती आठ कमळाच्या दलांचे एक वलय असते. त्याभोवती दुसरे सोळा कमळाच्या पाकळ्यांचे अजून एक वलय असते. यांच्या चारी बाजूंभोवती प्रत्येकी तीन वर्तुळाकार पायर्या असतात. आणि त्यांच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या तीन चौकोनी पायर्या असतात. असे मानले जाते की या सर्व विविध ठिकाणी देवीची एकूण साठ रूपे विराजमान आहेत.

श्रीयंत्र स्थापना व मुहूर्त

श्रीयंत्राचे निर्माण सिद्ध मुहूर्तामध्येच करतात. श्रेष्ठ मुहूर्त – गुरुपुष्ययोग, रविपुष्ययोग, नवरात्री, धन – त्रयोदशी, दिपावली, शिवरात्री, अक्षय तृतीया. आपल्या घरात कोणत्याही श्रेष्ठ मुहूर्तावर श्रीयंत्राची स्थापना करता येते. ‘ तंत्रसमुच्चयन ’ या ग्रंथानुसार कोणत्याही बुधवारी सकाळी श्रीयंत्राची स्थापना करता येते. याची स्थापना खूप सहज आहे. शास्त्रांच्या अनुसार मंत्र सिद्ध चैतन्य श्रीयंत्राची नित्य पूजा आवश्यक नाही. अथवा नित्य जलस्नान आवश्यकता नाही. जर शक्य असेल तर यंत्रावर पुष्प, अत्तर इत्यादी समर्पित करता येते आणि रोज यंत्रासमोर अगरबत्ती व दिवा लावणे जरूरी आहे.

श्रीयंत्र पूजन विधी

श्रीयंत्र पूजेच्या स्थानाव्यतिरिक्त आपल्या कपाटात, कारखान्यात किंवा अन्य महत्वपूर्ण जागी स्थापन करता येते. ज्यादिवशी श्रीयंत्र स्थापन केले जाते त्या दिवसापासून साधकाला त्याचा प्रभाव जाणवू लागतो.
श्रीयंत्राची पूजा खूप सरळ आणि स्पष्ट आहे. स्नान, ध्यान करून शुद्ध पिवळे वस्त्र धारण करून पूर्व किंव उत्तर दिशेला तोंड करून, पिवळ्या किंवा सफेद आसणावर बसून पूजा करावी. आपल्या समोर चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र झाकावे. विवाहित व्यक्तींनी श्रीयंत्राचे पूजन पत्नी सहीत केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्रीयंत्रात सफलता मिळण्यासाठी गुरुपूजन आवश्यक आहे. आपल्या समोरिल चौरंगावर गुरुचित्र, विग्रह, यंत्र, पादुका स्थापित करून हात जोडून गुरुचे ध्यान करावे.


यानंतर चौरंगावर तांदूळाची रास करून त्यावर एक सुपारी गणपती समजून स्थापित करावी. या गणपतीला पंचोपचार पूजन करावे. म्हणजे हळद , कुंकु, अक्षता , पुष्प, इ. याच चौरंगावर एका तांब्याच्या पात्रात फुलांचे आसन करून त्यावर श्रीयंत्र ( तांबे किंवा पारा या स्वरूपातील ) स्थापित करावे. यानंतर एकाग्रतापूर्वक हात जोडून यंत्राचे ध्यान करावे.

दिव्या परां सुधवलारुण चक्रयातां मूलादिबिन्दु परिपूर्ण कलात्मकायाम। स्थित्यात्मिका शरधनुः सुणिपासहस्ता श्री चक्रतां परिणतां सततां नमामि॥

अशाप्रकारे श्रीयंत्राचे ध्यान करून श्रीयंत्राची प्रार्थना करावी. जर ही प्रार्थना नित्य १०८ वेळा जप केल्यास अत्यंत लाभप्रद होते. –

धनं धान्यं धरां हर्म्यं कीर्तिर्मायुर्यशः श्रियम्। तुरगान् दन्तिनः पुत्रान् महालक्ष्मीं प्रयच्छ मे॥

ध्यानप्रार्थनानंतर श्रीयंत्रावर पुष्प अर्पित करून पुढील मंत्र म्हणावा.

ॐ मण्डूकाय नमः। ॐ कालाग्निरुद्राय नमः। ॐ मूलप्रकृत्यै नमः। ॐ आधारशक्तयै नमः। ॐ कूर्माय नमः। ॐ शेषाय नमः। ॐ वाराहाय नमः। ॐ पृथिव्यै नमः। ॐ सुधाम्बुधये नमः। ॐ रत्नद्वीपाय नमः। ॐ भैरवे नमः। ॐ नन्दनवनाय नमः। ॐ कल्पवृक्षाय नमः। ॐ विचित्रानन्दभूम्यै नमः। ॐ रत्नमन्दिराय नमः। ॐ रत्नवेदिकायै नमः। ॐ धर्मवारणाय नमः। ॐ रत्न सिंहासनाय नमः।

कमळ फुलांची माळ अर्पण करावी. लक्ष्मीबीजमंत्र पारायण केल्यास सर्वात लाभदायक असते.

लक्ष्मी बीज मंत्र

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः॥

हा अत्यंत प्रभावशाली आणि सर्वाधिक लाभप्रद लक्ष्मी बीज मंत्र आहे.
सर्वात शेवटी लक्ष्मीची आरती म्हणावी.

अशोक काका कुलकर्णी संकलित समग्र साहित्य

अशोक काका कुलकर्णी संकलित समग्र साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *