भाग ३ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🔸गोसावी-बैरागी. भाग 3🔸
———————————————
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————

भाग ३
🔸गोसावी-बैरागी.🔸
———————————————
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————

वैशिष्टे १ :
दंडी म्हणजे दंड धारण करणाऱ्या गोसाव्यांचा एक पंथ आहे.
गोसावी आणि बैरागी वादात १८,००० बैरागी मारले गेले.*
गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत.
दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व गौण मठ तीन मिळून सात मठ व बावन्न मठ्या आहेत.
दसनामी शंकराचार्यांचे कट्टर अनुयायी अशुनही त्यांनी त्यांचा प्राचीन नारायणीय धर्मही सोडला नाही.

*गोसाव्यांत थोड्याफार आचारफरकाने अनेक पंथोपपंथ आहेत. दंडी म्हणजे दंड धारण करणाऱ्या गोसाव्यांचा एक पंथ आहे. रावणवंशी नावाच्या पंथातील लोक हातात व कमरेभोवती केसांची वलये बांधतात. वैरागी नावाचा एक वैष्णव पंथ असून हे लोक गळ्यात तुळशीमाला व कपाळावर गंधाच्या किंवा गेरूच्या दोन उभ्या रेघा देतात.

गोसावी आणि बैरागी वादात १८,००० बैरागी मारले गेले.*
मुळात गोसावी आणि बैरागी परस्परांशी गुण्यागोविंदाने वागत, परंतु अकबराच्या (१५४२–१६०५) काळात त्यांच्यात वैर उत्पन्न झाले व पुढे १७६० मध्ये हरद्वार येथील कुंभमेळ्यात, गंगेत प्रथम स्नान कोणी करावे, या निमित्ताने वाद उत्पन्न झाला. या वादाची परिणती उभय पक्षांतील लढाईत होऊन तीत १८,००० बैरागी मारले गेले असे सांगतात.*

गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत.
संन्यासी व बैरागी ह्या संज्ञा गोसावी-बैरागी ह्या संज्ञांप्रमाणे सर्व सामान्यतः समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यात अनुक्रमे शैव व वैष्णव पंथांचे अनुयायी असा अर्थ असल्याचे एच्.एच्. विल्सन यांचे मत आहे. इस्लाम धर्मातील फकीर शब्दास असलेला अर्थ हिंदू धर्मातील गोसावी, बैरागी किंवा साधू या शब्दांनी व्यक्त होतो. तसे पाहू जाता गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत व त्यांतून निश्चितपणे कुठल्याही एकाच पंथाचा बोध होत नाही. भीक्षाटन व तीर्थाटन करणाऱ्या हिंदी साधूंच्या फार मोठ्या वर्गाचा ह्या संज्ञांतून स्थूलमानाने निर्देश होतो. शैव आणि वैष्णव संप्रदायांतील अनेक पंथोपपंथांचाही गोसावी-बैरागी संज्ञेत अंतर्भाव होईल.

दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व गौण मठ तीन मिळून सात मठ व बावन्न मठ्या.
दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व गौण मठ तीन मिळून सात मठ व बावन्न मठ्या आहेत. गोसावी लोक आपल्या मठाचेच नाव गोत्र म्हणून वापरतात. एकाच मठीच्या घराण्यांमध्ये विवाह होत नाही. उत्तर भारतातील विवाह ‘भावरे’ पद्धतीने, तर विदर्भादी भागांतील पुराणोक्त पद्धतीने होतात. गोसाव्यांत चार प्रमुख मठांप्रमाणेच प्रमुख उपसंप्रदायही चारच आहेत. म्हणजे प्रत्येक मठाचा वेगवेगळा उपसंप्रदाय आहे. कीटवार, भोगवार, आनंदवार आणि भूरिवार हे ते उपसंप्रदाय होत. उत्तर भारतीय गोसाव्यांचा आचारधर्म आणि तत्त्वे दसनामधर्म नावाच्या ग्रंथात सांगितली आहेत. शंकराचार्यप्रणीत शारदा (द्वारका), गोवर्धन (जगन्नाथपुरी), ज्योती (बद्रीनाथ) व शृंगेरी (शृंगेरी-कर्नाटक) ह्या चार मठांचा जो आचारधर्म आहे, त्याप्रमाणे गोसाव्यांचे वर्तन असावे असे ह्या ग्रंथात म्हटले आहे.

दसनामी शंकराचार्यांचे कट्टर अनुयायी अशुनही त्यांनी त्यांचा प्राचीन नारायणीय धर्मही सोडला नाही.
शंकराचार्यांनी विस्कळित गोसावी समाज संघटित व नियमबद्ध केला. आपल्या शिष्यांतील अधिकारी व्यक्तींची ह्या पीठांवर त्यांनी प्रतिष्ठापना करून अद्वैत मताचा सर्वत्र प्रसार केला. ह्या शिष्यांपासूनच दशनाम (दसनाम) संन्यास प्रसृत झाला असे मानतात. दसनामी गोसावी हे शंकराचार्यांचे कट्टर अनुयायी असले, तरी त्यांनी त्यांचा प्राचीन नारायणीय धर्मही सोडला नाही. शंकराचार्यांनी आपल्या अनुयायांचे निरंजनी, निर्वाणी, अटल, सनातनी, अग्नी, अभाव, व आनंद असे सात आखाडे करून त्यांची सांप्रदायिक संघटना उभारली.

आखाड्यात गोसावी भरती करण्याचे नियम कडक असतात.
प्रत्येक आखाड्याच्या प्रमुखास महंत म्हणतात. हे आखाडे म्हणजे त्यांना धार्मिक आणि सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या संस्था वा केंद्रेच होत. हे आखाडे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. प्रत्येक आखाड्यात गोसावी भरती करण्याचे नियम कडक असतात. उमेदवार गोसाव्याचे वय साधारणपणे १८ ते ४५ च्या दरम्यान असावे व त्याने ब्रह्मचर्य पाळून तेथे १२ वर्षे काढली पाहिजे, असा दंडक आहे.

गोसावी संन्याशी बैरागी सर्वमाहिती

श्रीमद् आद्य शंकराचार्य संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *