भाग ४ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🔸गोसावी-बैरागी. भाग 4🔸
———————————————
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
———————————————

वैशिष्टे १ :
दसनामी गोसाव्यांचे मत.
गोसाव्यांच्या संस्कारांत ‘शुद्धीकरण संस्कार व समाधी.
स्त्रियाही पंथाची दीक्षा घेऊ शकतात.
गोसाव्यांचा दीक्षाविधी
गुरू त्याच्या कानात ‘……’ मंत्र सांगून त्यास पक्का गोसावी म्हणून मान्यता देतो.
परस्पर भेटीच्या वेळी गोसावी ‘ॐनमो नारायणाय’ म्हणून अभिवादन करतात.

दसनामी गोसाव्यांचे मत.
दसनामी गोसाव्यांचे तत्त्वज्ञान प्रामुख्याने शंकराचार्यांच्या अद्वैत मतास अनुसरून आहे तथापि त्यांच्यातील काही अनुयायी पातंजल योगाचा तसेच तंत्रमार्गाचाही अवलंब करतात.

गोसाव्यांच्या संस्कारांत ‘शुद्धीकरण संस्कार व समाधी
गोसाव्यांच्या संस्कारांत ‘विरजा होम’ हा शुद्धीकरण संस्कार (वैदिक संस्काराचा अवशेष) महत्त्वाचा आहे. त्रैवर्णिकांतून एखादा जेव्हा गोसावी होतो तेव्हा त्याला शुद्ध करण्यासाठी विरजा होम करतात. शूद्रास गोसावी होता येत नाही. त्यांच्यातील इतर संस्कार पुराणोक्त पद्धतीने होतात. संन्यासी वा गृहस्थ गोसावी मेल्यास शैव-वैष्णव भेदांनुसार त्याच्या डोक्यावर बेलपत्र किंवा तुळशीपत्र ठेऊन बसलेल्या स्थितीत त्याला पुरतात. त्याच्या शेजारी त्याची झोळी, दंड, कमंडलू इ. वस्तूही पुरतात. मृताबद्दल त्यांच्यात शोक करीत नाहीत. श्राद्धाऐवजी त्याची पुण्यतिथी (बरशी) करतात.

स्त्रियाही पंथाची दीक्षा घेऊ शकतात.
बद्रिकेदार, रामेश्वरादी ठिकाणची यात्रा केलेले गोसावी हातात धातूचे कडे वा शिंपल्याचे वलय घालतात. काही गोसावी नग्नावस्थेत राहतात आणि ‘अलख’ म्हणून भिक्षा मागतात. काही फक्त पाचच घरी भिक्षा मागतात, तर काही नर्मदापरिक्रमा करतात. स्त्रियाही पंथाची दीक्षा घेऊ शकतात. स्त्रियांचे आधी वपन करण्यात येते व त्यांच्या अंगास भस्म फासून त्यांना भगवी वस्त्रे नेसावयास देतात. ब्रह्मचर्य पालन करून त्यांना मठात रहावे लागते.

गोसाव्यांचा दीक्षाविधी
*त्रैवर्णिकांतील कोणाही व्यक्तीस गोसावी म्हणून दीक्षा घेता येत असल्याकारणाने, गोसावी वर्गात अनेक जातींचे लोक आढळतात. गोसाव्यांचा दीक्षाविधीही फार सोपा आहे. दीक्षा घेणाऱ्यास एक दिवस उपोषण करावे लागते. दुसऱ्या दिवशी त्याचे मुंडन करण्यात येते. नंतर त्याला स्नान घालून त्याच्या सर्वांगास भस्म फासण्यात येते व नवीन नाव देण्यात येते. अशा प्रकारे तो उमेदवार गोसावी होतो. एक-दोन वर्षे उमेदवारी केल्यावर त्याची पंथीय आचारविचारांशी ओळख होते. नंतर गुरू त्याच्या कानात ‘ओम् सोहम्’ मंत्र सांगून त्यास पक्का गोसावी म्हणून मान्यता देतो.

काही गोसाव्यांचे आचार पुराणोक्त तर काहींचे वेदोक्त आहेत. आजन्म ब्रह्मचर्यपालन, भुकेलेल्यांना अन्नदान, भिक्षेवर निर्वाह व तीर्थाटन हा संन्यासमार्गी गोसाव्यांचा प्रमुख आचार होय. देहदंड किंवा आत्मक्लेश करून घेण्यातही गोसाव्यांची विशेष ख्याती आहे.*

परस्पर भेटीच्या वेळी गोसावी ‘ॐनमो नारायणाय’ म्हणून अभिवादन करतात.
औरस संततीने झालेल्या गोसाव्यांना ‘बिंदू’, तर त्रैवर्णिकांतून गोसावी झालेल्यांना ‘नाद’ म्हणतात. दोहोंनाही आखाड्यात भरती होता येते. शिष्य संप्रदाय चालविणाऱ्या गोसाव्यास ‘कंगली’ म्हणतात. चैत्र व आश्विन महिन्यांतील नवरात्र तसेच दसरा, दिवाळी व शिमगा हे त्यांचे प्रमुख सण. त्यांच्या आचारधर्मात मद्य-मांस, गांजा, भांगादी सेवन निषिद्ध मानले आहे. परस्पर भेटीच्या वेळी गोसावी ‘ॐनमो नारायणाय’ म्हणून अभिवादन करतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश, सुर्वे, भा. ग.

गोसावी संन्याशी बैरागी सर्वमाहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *