…..कारण आपण माणूस आहोत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सर्व लेखांची सूची पहा.

(अवश्य वाचा. कारण आपण माणूस आहोत)


उच्च शिक्षण आणि पशुत्व यात फरक आहे काय?
असा प्रश्न एका सुसंस्कारित माणसाने विचारलेला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.

पहिल्यांदा पशुत्व म्हणजे काय? ते समजून घेणे गरजेचे आहे. पशूच्या ठिकाणी काय काय गोष्टी घडत असतात? तर पशु जीवनामध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन या चार गोष्टी असतात. कारण
१)पशूला देखील खाण्यास पिण्यास लागते. पशुदेखील आपल्या शरीराला पोषक आहार घेतात, आपल्या शरीराला पोषक पाणी पितात, पशुदेखील विहार करतात म्हणजे फिरतात, पशु देखील कधी एकटे तर मॅडमसह फिरतात,
२) पशु देखील थकवा आल्यावर विश्रांती करतात, झोपतात, तेदेखील घोरतात. म्हणून पशूच्या ठिकाणी निद्रा आहे.
३) पशुला देखील भीती वाटते, एखाद्या माणसाच्या हातात काठी,दगड असेल तर त्या काठीला पाहून, दगडाला पाहून पशुदेखील भीतीने पळून जातो. म्हणून पशूच्या ठिकाणी भय आहे. तसेच
४)पशुला देखील समागम करावा अशी भावना होते. आणि त्याप्रमाणे पशु देखील समागम करतो. परंतु समागम करत असताना पशूच्या जीवनामध्ये दोन गोष्टी आढळतात, त्या अशा की, पशु हा कोणत्याही मादीबरोबर संबंध ठेवत नाही. तर त्याच्याच जातीच्या मादीबरोबर संबंध ठेवतो आणि योग्य ऋतू कालामध्ये संबंध ठेवतो. कोणत्याही वेळेमध्ये, कोणत्याही ऋतू काळामध्ये आठवण येईल, त्या वेळेला संबंध ठेवत नाही.

इत्यादी असंख्य गोष्टी पशूच्या ठिकाणी विशेषत्वाने आपल्याला दिसून येतात.

आता पुरुषाचा विचार करू, पुरुषाच्या ठिकाणीदेखील आहार, निद्रा, भय, मैथुन या चारही गोष्टी आहेत. कारण पुरुषाला देखील खाण्यापिण्यासाठी लागते, पुरुषदेखील खातात, पितात. परंतु आपल्या शरीराला पोषक फक्त अन्नधान्य आहे, वनस्पती आहे.
मनुष्य केवल अन्नधान्य खात नाही,
केवळ वनस्पती खात नाही.
तर हिंस्र पशुचेही अन्न असलेले मांस खातो.
हिंस्र पशूच्या शरीराला भगवंताने मांस पचवण्याची शक्ती दिलेली आहे. त्यामुळे मांस खाऊन हिंस्त्र पशु कधीही आजारी पडलेले दिसत नाहीत. त्यांना कधीही रोग झालेला दिसत नाही.
पण मनुष्य मात्र मांस खात असल्याने अर्थात् हिंस्र प्राण्यांच्या आहारावर अतिक्रमण करत असल्याने सर्व रोग हे मनुष्याच्या शरीरामध्ये असतात.

तसेच गाढव पशु आहे. परंतु कोणतेही पाणी पीत नाही, मादक पदार्थाचे सेवन कधीही करत नाही, माणूस मात्र मादक पदार्थाचे सेवन, अमली पदार्थाचे सेवन करत असतो. या निषिद्ध खाण्यापिण्याच्या व्यवहारांमध्ये स्वतःला शिक्षित म्हणवून घेणाऱ्याचा भरणा अधिक आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे सणवार, तिथी मितीचे घेणेदेणे नसते. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत जे पशुपक्षी नियम पाळतात. ते नियम हे स्वतःस उच्चशिक्षीत म्हणवणारे, शिक्षित म्हणवणारे लोक पाळत नाहीत, हे आपल्याला समोर दिसते आहे.

शिवाय पशु पक्षी हे ठराविक कालामध्ये विश्रांती घेत असतात, झोपतात. त्यामुळे ते आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते, पण
माणूस मात्र हा रात्री उशिरा खाणे,
उशिरा झोपणे करत असल्याने तो
सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठत नाही. आणि शास्त्र असे सांगते की,
जो सूर्योदयाच्या अगोदर उठतो,
नियमित व्यायाम करतो,
जो नियमित खातो.
तो आजारी पडत नाही.
हे स्वतःला उच्चशिक्षीत म्हणवणारे उशिरा झोपतात. आणि सकाळी अकरा वाजता, दहा वाजता, बारा वाजता उठतात,

पूर्वीच्या काळामध्ये संस्कारित माणसे हे सूर्योदयाच्या अगोदर उठून, व्यायाम करून, स्नान करून, सूर्यनारायणाची प्रार्थना करत असत की, हे देवा! तुम्ही आता उदयाला या! परंतु हीच शिक्षित माणसे मात्र सूर्योदय झाल्यानंतर उठतात. त्यामुळे भगवान् श्रीसूर्यनारायण यांची प्रार्थना करतो की, हे भक्ता, आता लवकर उठ! तरीही हा मनुष्य लवकर न उठता उशिरा उठतो. त्यामुळे सतत आजारी असतो, पैसा पाणी भरपूर असतो, त्यामुळे बहुतेक पैशाच्या विनियोगाचे देवाचे ते नियोजन असावे!. मी एका शिक्षित माणसास विचारले की, आपण लवकर कां उठत नाही? त्यावेळेला त्याने दिलेले उत्तर मोठे मौजेचे आहे. तो म्हणाला~ सूर्योदयाच्या अगोदर उठणे, हे खेड्यातील आडानी लोकांचे काम आहे. मी शिकलेला आहे, त्यामुळे मी सूर्योदय झाल्यानंतर उठले पाहिजे. मी जर लवकर उठलो तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? मला त्यावेळेला कळाले की, शिक्षणाचा काय उपयोग असतो ते. त्यामुळे मी त्यास म्हणालो आता झोपा! आणि तो मनुष्य सतत त्याच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टीने, शक्तीच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, वैचारिक दृष्टीने झोपलेलाच असतो. तसेच पशूला जशी भीती असते तशी माणसाला देखील भीती आहे.

कारण माणसाला देखील हिंस्र प्राणी पाहिल्यानंतर, दंश करणारे प्राणी पाहिल्यावर, किंवा गुंड प्रवृत्तीचा मनुष्य पाहिल्यानंतर, शस्त्रधारी माणूस पाहिल्यानंतर भीती वाटते. म्हणून माणसाच्या ठिकाणी भय आहे. तसेच पशूच्या ठिकाणी जसे मैथुन असते, तसे पुरुषाच्या ठिकाणीदेखील मैथुन आहे. परंतु पशु जसा कुठल्याही मादीबरोबर संबंध ठेवत नाही, कुत्रा हा कुत्रीबरोबर संबंध ठेवतो, बैल हा गाईबरोबर संबंध ठेवतो, सर्प हा सर्पीनीबरोबर संबंध ठेवतो, कोंबडा कोंबडीबरोबर संबंध ठेवतो, म्हणजे पशू पक्षी स्वतःच्या समाजातील, स्वतःच्या जातीतील मादीबरोबर संबंध ठेवतो, परंतु पुरुष मात्र स्वतःच्या समाजातील नसलेल्या, स्रीबरोबर संबंध ठेवतो, ती स्री कुठल्या देशातील आहे? याचा तो विचार करत नाही. ती स्री कुठल्या जातीची आहे? कुठल्या धर्माची आहे? हादेखील विचार हा शिक्षित मनुष्य करत नाही. तसेच स्री आहे ना! मग तिच्याशी संबंध करायला हरकत नाही एवढाच तो विचार करत असतो.

एकंदरीत पशुपेक्षा वेगळ जीवन शिक्षित माणूस जगत असतो, म्हणूनच त्यास सुशिक्षित न म्हणता “शिक्षित” म्हणावे लागते.

सुशिक्षित आणि भ्रष्ट ह्या दोन गोष्टी एकत्रित नांदत नसतात. जो आचारविचारसंपन्न आणि शिकलेला असतो, त्यास “सुशिक्षित” म्हणतात. आणि
जो शिकलेला आहे परंतु आचारभ्रष्ट आहे त्यास “शिक्षित” म्हणतात. म्हणून जो सुशिक्षित असेल तो भ्रष्ट नसतो आणि जो भ्रष्ट असतो, तो सुशिक्षित असू शकत नाही. हे वाचकांनी लक्षात ठेवावे.

शिवाय पशु हे कधी हनिमूनला गेल्याचे आढळत नाही. पण माणूस मात्र हनीमूनला जातो, परदेशात जाऊन स्वैराचार करून, मौजमजा करून येत असतो. हेदेखील पशुपक्षापेक्षा माणसाचे वेगळेपण आहे. वाचकांनी हे लक्षात ठेवावे की,

परदेशाला जाऊन आला म्हणजे तो सुसंस्कारित असतो असे मात्र मुळीच नाही. आपण शिक्षित व्हायचे किंवा उच्चशिक्षित व्हायचे? ते ठरवले पाहिजे, उच्चशिक्षित होऊन सुशिक्षित असेल तर त्यास धन्यता देता येते. नाहीतर उच्चशिक्षित असून शिक्षित असेल, भ्रष्ट असेल तर त्यास धन्यता देता येणार नाही. अशा शिक्षित आणि भ्रष्ट लोकांमुळेच धर्माला ग्लानी निर्माण होते. आणि हेच शिक्षित आणि भ्रष्टलोक धर्माला, वारकरी संप्रदायाला, साधुसंतांना, आपल्या संस्कृतीला नावे ठेवत असतात.
कळावे~ बाबुराव महाराज वाघ वाचा विचार करा सर्वत्र पाठवा. आणि आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान हा प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे, अशी सर्वास विनंती करतो.

3
(वाचा विचार करा)
श्रद्धांजली स्वस्त झाली कां? कारण सध्याच्या काळामध्ये इंटरनेटचे युग आहे. या इंटरनेटच्या युगामध्ये कोणाचा कोणत्या भागामध्ये कधी मृत्यू होतो. हे ताबडतोब कळते. मग तो सज्जन कीर्तनकार असो, किंवा धंदेवाईक कीर्तनकार असो,विद्वान असो,वा अविद्वान असो, शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारा नास्तिक, निधर्मी, प्राचार्य असो, अगर देशप्रेम, धर्मप्रेम, संस्कृती प्रेम शिकवणारा, आपल्या या भारत भूमीच्या मातीशी इमानदारीचे शिक्षण देणारा असो, अशी कोणतीही माणसे मृत झाली. मग ती कॅन्सरने मृत्यू होवो किंवा कोणत्याही असाध्य रोगाने मृत्यू होवो किंवा असंख्य मुलीचे चारित्र्य भ्रष्ट करून किडनीच्या असाध्य रोगाने मृत्यू होवो असे कोणी जर मृत झाले तर, कोणत्या कां कारणाने होईना, कोणत्या कां भागातील असेना, कोणत्या कां धर्माचे असेना, लहान असो अगर वयस्कर. पण ते जर मृत झाले तर त्यांच्या प्रित्यर्थ मोबाईल वर श्रद्धांजली केल्या जाते.

परंतु या विषयी माझे स्पष्ट मत मी सांगणार आहे. कोणतीही व्यक्ती मृत झाली म्हणजे श्रद्धांजली वाहावी कां त्या व्यक्तीचा आणि आपला कांहीतरी संबंध असेल तर श्रद्धांजली वहावी? असा जर विचार केला तर आपल्या संबंधित व्यक्ती जर गेली तर त्याविषयी दुःख करावे, याविषयी श्रद्धांजली अर्पण करणे योग्य.

समजा कल्पना करा~

एखाद्या माणसाची बायको मेली. या मेलेल्या पत्नीच्या संबंधित जे कोणी नातलग असतील त्यांनी त्या स्त्रीच्या प्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण करणे, चांगूलपणाची दोन शब्द बोलणे योग्य असते. परंतु एखाद्या माणसाचा कांहीही संबंध नसता त्या माणसाने श्रद्धांजलीपर दोन शब्द पाठवणे चुकीचे आहे असे वाटते. कारण या श्रद्धांजली पाठवणाराचा त्या बाईच्या पतीशी कांहीही संबंध नाही, तो त्यांचा नातलग सुद्धा नाही, मग त्याने त्याला श्रद्धांजली पाठवण्याचे कारण काय? तसेच त्या स्त्रीचे आत्म्याला शांती लाभो, तिला सद्गती मिळो,


अशा पद्धतीने श्रद्धांजली पाठवण्याचे कारण काय? याचा आणि त्या स्त्रीचा संबंध काय? कांहीही संबंध नसताना मोबाईल हातात आला म्हणून श्रद्धांजलीपर दोन शब्द टाकणे चुकीचे आहे. एका बाईचा पती वारला. तर ती बाई शोकाकुल झाली. अशा काळामध्ये कांही माणसे त्या ठिकाणी दारू पिऊन आले. हे दारू पिऊन येणारे या स्त्रीच्या संबंधीत किंवा त्या वारलेल्या पुरुषाच्या संबधीत कोणीही नव्हते. तरीदेखील त्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली आणि श्रद्धांजली वाहत असताना ते म्हणाले की, या ताईने दुःख करू नये, तिचे पती वारले, ही गोष्ट वाईट म्हणून तिने दुःख करू नये, पण आम्ही नाहीत कां तिच्या करिता! वाचक हो विचार करा, एक तर या लोकांचा तेथे कांहीही संबंध नाही आणि तिच्या दुःखामध्ये ही भाषा वापरणे, हे कितपत योग्य आहे? म्हणून कांहीतरी नातेसंबंध असेल तर श्रद्धांजली व्हावी, कांहीतरी मित्र संबंध असेल तर श्रद्धांजली वाहणे, कांहीतरी कुठलातरी संबंध असल्याशिवाय श्रद्धांजली वाहून नये, तसेच श्रद्धांजली वाहत असताना त्या व्यक्तीविषयी आदराची भावना असेल तरच श्रद्धांजली वहावी. उगीचच कोणी कांहीतरी पोस्ट टाकून माझा कसा त्या व्यक्तीशी संबंध होता, हे सांगण्यात स्वतःचा मूर्खपणा आपण सिद्ध करतो.. याचे भान या लोकाला असत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

चार दिवसापूर्वी ह भ प ताजुद्दीन महाराज शेख यांचे जामदे ता. नंदुरबार या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने यांचे निधन झाले, कीर्तन चालू असताना अचानक त्यांना चक्कर आली, ते खाली बसले. आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. वारकरी संप्रदायाचे किर्तन करणारा एक व्यक्ती आपल्यातून गेला याबद्दल दु:ख आहेच. त्यानंतर मात्र असंख्य लोकांनी त्यांच्याविषयी श्रद्धांजली अर्पण केली, त्यांच्याविषयी अनादर असण्याचे कारण नाही, ताजुद्दीन शेख हे तसे निरूपद्रवी पुरुष होते. मुस्लिम समाजामध्ये जितका कट्टरपणा असतो. त्यांच्यापेक्षा ताजुद्दीन शेख हे किर्तन या विषयात जास्त वेळ देणारे होते. त्यांचा बहुतांशी वेळ हा हिंदू समाजाशी संपर्क ठेवण्यात होता, त्यामुळे ते आपल्या कार्यक्रमासंबंधित राहत असत. इतर मुस्लिम समाजामध्ये काय चाललेले आहे. याचा ते विचार करत नसत. त्यामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींनी त्यांना त्या काळामध्ये त्रास देऊन पाहीले. परंतु त्यांनी आपले कीर्तनाचे काम सोडले नाही. त्यांनी असंख्य लोकांना मार्गदर्शन केले, त्यांचे असंख्य चाहते निर्माण झाले, त्यांनी श्री ताजुद्दीन शेख यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ते करणे योग्य आहे, कारण एक तर त्यांच्याविषयी श्रद्धावान वर्ग समाजात आहे. त्यांनी ताजुद्दीन महाराजांचे शिष्यत्व पत्करले आहे. त्यामुळे त्यांनी श्रद्धांजली वाहणे ठीक आहे.

पण त्या ताजुद्दीन महाराजांसी ज्यांचा अर्थाअर्थी कांहीही संबंध नाही, ताजुद्दीन महाराज कोठे राहतात, काय करतात? यांची कोणालाही माहिती नाही. त्यांनीदेखील हातामध्ये मोबाईलवर दोन शब्द बोलणे हे उचित वाटत नाही. आणि असा नियम नाही की, श्रद्धांजली वाहिली तरच त्यांच्याविषयी प्रेम आहे असे ठरते, असे नाही. समाजामध्ये कितीतरी माणसे परंपरेचे नसतात, तरीदेखील वारकरी या नात्याने, कीर्तनकार या नात्याने प्रेम ठेवणारे असतात. माझा आणि त्यांचा तसा कुठल्याही प्रकारे संबंध आलेला नाही, त्यांचे क्षेत्र वेगळे आणि माझे क्षेत्र वेगळे. तरीदेखील ते एक कीर्तनकार होते आणि मीदेखिल वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. त्यामुळे त्या नात्याने वारकरी संप्रदायातील एक मनुष्य कमी झालेला आहे. अशी माझी भावना. भगवंताचे नामस्मरण ऐकत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले हे मात्र निश्चित. यामुळे ते निश्चितच भाग्यवान आहे. म्हणून त्यांना सद्गती प्राप्त झाली असे म्हणणे उचित होणार नाही कारण देवाचे नामस्मरण ऐकत, करत शरीर जर पडले तर काय फल प्राप्त होते? हे वारकरी संप्रदायिकाला सांगणे नलगे. म्हणून संबंध नसलेल्याने श्रद्धांजली वाहणे म्हणजे श्रद्धांजली इतकी सोपी, स्वस्त झालेली आहे काय? असा सहजच प्रश्न पडतो.
कळावे
बाबुराव महाराज वाघ. विचार करा सर्वत्र पाठवा.

4

आपला हितचिंतक~ बाबुराव महाराज वाघ पंढरपूर सर्व मित्रमंडळींनी हा संदेश सर्वत्र पाठवावा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇