ज्ञानेश्वरी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी.

ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥ अध्यात्मविद्येचे दाविलेसें रूप । चैंतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छप्पन भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ।।४॥ श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव । एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥॥४॥

भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्री गिता हा प्रश्नू अर्जुनेशी ॥२॥ तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ॥३॥ एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ॥४॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *