ओम ॐ ओंकार महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

—————-
*ॐ*
—————

ओम (ॐ) हे हिन्दु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे.
ओंकार हा ‘अ’कार,’उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.

*उत्पत्तीची आख्यायिका*

याज्ञवल्क्य ऋषींच्या वक्तव्यावरून,ब्रह्मदेवाने पूूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे असे मानतात. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे ‘अ’ ,’उ’ आणि ‘म्’ हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा,विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.

*उच्चार आणि धार्मिक समज*

 ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचे स्मरण होते.
 उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चम्बू होतो. त्या चम्बूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारम्भ होतो.
 म् उच्चारतांना ओठ बन्द होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे.त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते.

अ हा स्वर सर्वांत कोमल स्वर आहे, तसेच तो ओम्-कारातील आद्य स्वर आहे. त्यामुळे, ‘अ’ हा स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो.

उ हा मुखोत्पन्न (केवळ मुखातून निघालेला) सर्वाधिक तीव्र स्वर आहे. अर्थात, ती तीव्र शक्ती आहे. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी-देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या विष्णूचे स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. म् हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारले असता त्याआधील ध्वनीचा लोप होतो व वातावरण पुन: शान्त होते.
हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ओम्-कार हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे असे हिन्दूधर्मात सांगितले आहे.

*मंत्रस्वरूप*
भगवान पतंजलीनी ओंकारासाठी प्रणव हा शब्द योजिला आहे. प्रणव म्हणजे भगवन्तासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओम हा तीन अक्षरांचा लघु मंत्रच आहे. याचा जप केल्याने जगाच्या सर्व दिव्य शक्तींचे स्मरण केल्यासारखे होते.

*इतर अर्थ*
छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा अर्थ ‘अनुज्ञा’ म्हणजेच स्वीकृती असा केला गेला आहे. जो ओंकाराचा स्वीकार करणे समजतो तो समृद्ध होतो.

सर्व वेद या पदाची घोषणा करतात, सर्व तपे ज्याच्याविषयी बोलतात , ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते पद ओम आहे असे म्हटले आहे.

——————————————
*”ओम् उच्चारणे फक्त धार्मिक*
*नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*
——————————————-

रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.

*कसे करावे ओम् उच्चारण?*

ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा.
जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

——————————————-
*ओम् कार जपाचे महत्व*
*आणि परिणाम :*
——————————————-

१)मानवी मनाची शुद्धता करणे.
२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.
५)ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.

*ओम् कर जप :*

ओ SSSSSS म्
ओ SSSSSS म्
ओ SSSSSSS म
——————————————-
*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा*
*अनेक आजारांवर नियंत्रण*
——————————————-
  
हिंदू धर्मात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात.
परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात.
*तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.*

*१. थायरॉईड -*
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो.
*२. अस्वस्थता -*
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.
*३. तणाव -*
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
*४. रक्तप्रवाह -*
यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
*५. पचन -*
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
*६. स्फूर्ती -*
ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
*७. थकवा -*
थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.
*८. झोप -*
ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.
*९. फुफ्फुस -*
ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
*१०. पाठीचा कणा -*
ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
———————————————–
*संकलन :- सतीश अलोणी*
———————————————–
欄連☯連欄

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

  1. रामकृष्णहरि…..
    खुप सुंदर आणि अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आहे..कारण उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी |ऐसी चराचरी किर्ती ज्यांची || तिन्ही लोकांमध्ये वारकरी तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार असताना देखील अनेक नामवंत व उच्च कोटींचे दिग्गज किर्तनकार बहुसंख्य प्रमाणात असुनही आपण आपला संप्रदाय व आपल्या संतांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार सद्य परिस्थितीत देश सोडून जागतिक पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात केला गेलेला नाही…ऊलट वारकरी संप्रदायाच्या आधाराने अनेक संप्रदाय हे कमी कालावधीत जगाच्या अनेक देशांमध्ये पोहोचले आहेत… आणि आपणास खुप खुप धन्यवाद…. कारण *वारकरी रोजनिशी * च्या माध्यमातून आपला धर्म, सकलसंतचरीत्र,संतसाहित्य, व विश्वशांतीसाठी आवश्यक अशी उपयुक्त माहिती उपलब्ध करुन दिली…🙏🙏🙏🙏🙏
    ह.भ.प.पांडुरंग महाराज पवार अंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *