वसंत पंचमी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

■ *वसंत पंचमी निमित्त अभिष्टचिंतन.*

● *आज माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी !  आजच्या दिवशी देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली, त्यामुळे या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन सरस्वती देवीची पूजा आणि प्रार्थना केली जाते. तसंच काही ठिकाणी कलशाची स्थापना करुन पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी सरस्वती  देवीची पूजा करुन नवीन पिकांच्या लोंब्या देवीला अर्पण करतात. घरात, कुटुंबात अशीच भरभराट होऊ दे, अशी मनोभावने देवीचरणी प्रार्थना केली जाते.*

● *सरस्वती देवी ही विद्येची आणि ज्ञानाची देवता असून तिच्या हातात पुस्तक, वीणा असते. तर एका हाताची मुद्रा केलेली असते. याचाच अर्थ चांगली बुद्धीमत्ता, उत्तम शिक्षण तसंच शिक्षणेतर कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी सरस्वती देवीची प्रार्थना केली जाते. देवीच्या हाताची मुद्रा एकाग्रता दर्शवते. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याही कामात एकाग्र व्हायचे असेल तर देवीची उपासना करणे नक्कीच फायदेशीर ठरेल.*

*सरस्वती मंत्र.*

*या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता*
*या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना |*
*या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता*
*सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ||*

*अर्थ : जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे; जिचे हात उत्तम विणेमुळे शोभत आहेत; जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.*

● *वरील मंत्र म्हणून खालील प्रमाणे देवी सरस्वतीची बारा नावे अकरा वेळा नित्यनियमाने म्हटल्यास विद्या, पराक्रम, बुद्धी यांचा विकास होतो. तसेच अभ्यासू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तम यश लाभते. सातत्याने खालील मंत्राचा जप केल्याने मूर्ख व्यक्ती देखील विद्वान बनते.*

*प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती |*
*तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी ||*
*पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा |*
*सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी ||*
*नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी |*
*एकादशं चन्द्रकान्तिर्द्वादशं भुवनेश्वरी ||*
*द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः |*
*जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती ||*

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *