माघ मास महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

————————–
*माघ मास महात्म्य*
—————————

हिंदू पंचांगानुसार ११ महिना माघ माघ मास असून या महिन्यात मघा नक्षत्रयुक्त पौर्णिमा असल्यामुळे यांचे नाव माघ आहे.

धार्मिक दृष्टीकोनातून हा महिना खूप खास मानला जातो. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला स्वर्गात स्थान प्राप्त होते. 
माघ मासात प्रयागमध्ये स्नान, दान, भगवान विष्णूंचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व सांगताना गोस्वामी तुलसीदास यांनी

*श्रीरामचरितमानसमध्ये लिहिले आहे की….*

माघ मकरगत रबि जब होई। तीरतपतिहिं आव सब कोई।।
देव दनुज किन्नर नर श्रेनीं। सादर मज्जहिं सकल त्रिबेनीं।।
पूजहिं माधव पद जलजाता। परसि अखय बटु हरषहिं गाता।

पद्मपुराणातील उत्तरखंडमध्ये माघ मासाचे माहात्म्य वर्णन करताना लिहिण्यात आले आहे की…
व्रतैर्दानैस्तपोभिश्च न तथा प्रीयते हरि:।
माघमज्जनमात्रेण यथा प्रीणाति केशव:।।
प्रीतये वासुदेवस्य सर्वपापापनुक्तये।
माघस्नानं प्रकुर्वीत स्वर्ग लाभाय मानव:।।

*अर्थ -*
व्रत, दान आणि तपश्चर्या करूनही भगवान विष्णूला तेवढा आनंद होत नाही जेव्हा माघ मासात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने होतो. यामुळे स्वर्ग लाभ, सर्व पापातून मुक्तीसाठी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने माघ स्नान अवश्य करावे.

*माघ मासाशी संबंधित इतर रोचक माहिती*

धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे या महिन्याचे महत्त्व….
धर्म शास्त्रामध्ये माघ मासला अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. मत्स्य पुराण, महाभारत इ. धर्म ग्रंथांमध्ये माघ मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात माधवाची (श्रीकृष्ण) पूजा तसेच नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याला स्वर्गलोकात स्थान प्राप्त होते.

*धर्मग्रंथानुसार….*

स्वर्गलोके चिरं वासो येषां मनसि वर्तते।
यत्र क्वापि जले तैस्तु स्नातव्यं मृगभास्करे।।

*अर्थ -*
ज्या व्यक्तीला चीरकाळापर्यंत स्वर्गलोकात राहण्याची इच्छा असेल त्याने माघ मासात सूर्य मकर राशीत स्थित झाल्यानंतर पवित्र नदीमध्ये प्रातःकाळी (पहाटे) स्नान करावे.

माघं तु नियतो मासमेकभक्तेन य: क्षिपेत्।
श्रीमत्कुले ज्ञातिमध्ये स महत्त्वं प्रपद्यते।।
(महाभारत अनु. 106/5)

*अर्थ -*
जो माघ मासात नियमितपणे एक वेळेला जेवण करतो, तो श्रीमंत कुळात जन घेऊन कुटुंबात मान-सन्मान प्राप्त करतो.

अहोरात्रेण द्वादश्यां माघमासे तु माधवम्।
राजसूयमवाप्रोति कुलं चैव समुद्धरेत्।।
(महाभारत अनु. 109/5)

*अर्थ -*
माघ मासातील द्वादशी तिथीला दिवस-रात्र उपवास करून श्रीकृष्णाची पूजा केल्यास साधकाला राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि तो कुळाचा उद्धार करतो.

*जाणून घ्या, कशाप्रकारे करावे भगवान विष्णूंचे पुजन…*

हिंदू धर्म ग्रंथामध्ये माघ मासात स्नान, तप, उपवास करणे श्रेष्ठ मानण्यात आले आहे. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात विधीपूर्वक श्रीकृष्णाची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. माघ मासात विधीपूर्वक श्रीकृष्णाची पूजा करण्यापूर्वी सकाळी तीळ, जल (पाणी) फुल, आसन घेऊन खालील प्रमाणे संकल्प करावा.

ऊँ तत्सत् अद्य माघे मासि अमुकपक्षे अमुक-तिथिमारभ्य मकरस्त रविं यावत् अमुकगोत्र अमुकशर्मा (वर्मा/गोप्तोहं) वैकुण्ठनिवासपूर्वक श्रीविष्णुप्रीत्यर्थं प्रात: स्नानं करिष्ये।

त्यानंतर खालील श्लोकाचा उच्चार करून प्रार्थना करावी…

दु:खदारिद्रयनाशाय श्रीविष्णोस्तोषणाय: च।
प्रात:स्नानं करोम्यद्य माघे पापविनाशनम्।
मकरस्थे रवौ माघे गोविन्दाच्युत माधव।
स्नानेनानेन मे देव यथोक्तपलदो भव।।
दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोस्तु ते।
परिपूर्णं कुरुष्वेदं माघस्नानं महाव्रतम्।
माघमासमिमं पुण्यं स्नानम्यहं देव माधव।
तीर्थस्यास्य जले नित्यं प्रसीद भगवन् हरे।।

माघ मास एकमेव असा महिना आहे, ज्यामध्ये कोणत्याही ठिकाणावरील पाणी गंगाजल प्रमाणे आहे. तरीही प्रयाग, काशी,  नेमिषारण्य, कुरुक्षेत्र, हरिद्वार तसेच इतर पवित्र तीर्थ स्थळांवर स्नान करण्याचे महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार अशाप्रकारे संपूर्ण महिनाभर भगवान विष्णुंची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
—————————————————
*संकलन :- सतीश अलोणी @*
————————————————–

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *