8 वाचावे असे फरक पडतोच, पण आपल्याला समजत नाही ….

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
    *🔸काय फरक पडणारेय...!🔸*

श्रीरंग चितळे.

१९८९ चा सुमार असेल. माझा मित्र अमेरीकेत लुईझीयानातून अलाबामामधे असलेल्या दुसऱ्या मित्राकडे ड्राइव्ह करत चालला होता. खाण्यासाठी म्हणून तो एका फूड पार्क पाशी थांबला. गाडीतून उतरताना त्याच्याकडून काहीतरी गडबड झाली……….. त्याच्या असं लक्षात आलं की गाडीची किल्ली आत गाडीतच राहिली होती, तो बाहेर होता आणि गाडी ऑटोलॉक झाली होती….he was locked out…

तिथून सुमारे १०-१२ मैलाच्या आत गॅरेज किंवा तत्सम काही नव्हतं. मग त्यानी पुढे जाणाऱ्या काही लोकांना पुढे कोणी लॉक स्मिथ (चाव्या तयार करणारा) असेल तर त्याला निरोप देण्याची विनंती केली. थोड्या वेळानंतर एक पोलिस त्या ठिकाणी आला, त्यानी मित्राची विचारपूस केली आणि त्याच्या जवळील क्रो बार वापरून थोडी काच खाली करून त्यातून एक बारीक तार आत टाकून गाडीचं दार उघडून दिलं (गाड्या चोर हेच तंत्र वापरतात).

मित्राचं काम झालं होतं, तो गाडी घेऊन जाऊ शकत होता. एव्हाना अंधार बराच झाला होता. गारठा वाढायला लागला होता…… पण मित्राच्या मनात विचार आला की “जर समजा कोणीतरी पुढे निरोप दिला असेल आणि खरंच कोणी लॉक स्मिथ आपल्या मदतीसाठी इथवर आला तर?”…. पण त्या काळी सेल फोन नव्हते त्यामुळे चौकशी करून हे कळायला काहीच मार्ग नव्हता म्हणून मित्रानी ‘अजून एक तास वाट पहायची’ असं ठरवलं.

अर्ध्या तासानी तिथे एक लॉक स्मिथची व्ह्यान आली. त्यात एक वृध्द दाम्पत्त्य होतं. सुदैवानी ते मित्राशीच बोलले की त्यांना असा निरोप मिळाला होता की एक इंडियन स्टुडन्ट गाडी लॉक आउट झाल्यामुळे इथे ३-४ तासापूर्वी अडकून पडलाय आणि म्हणून ते तिथे आले आहेत. माझ्या मित्रानी त्यांना आल्याबद्दल धन्यवाद दिले आणि सांगितलं की त्याचा प्रॉब्लेम ऑलरेडी सुटलेला आहे.

त्यावर तो वृध्द म्हणाला की “पण मग तू इथे थांबून का राहिलायस?”. इतक्यात त्या वृध्द स्त्रीने “जॉन, तू त्याला प्रश्न काय विचारत बसलायस.. तो भुकेलेला असेल” असं म्हणत तिनी बरोबर आणलेले दोन सँडविचेस आणि गरम कॉफी मित्राला दिली…

मित्र थक्क झाला. कोण कुठले दोन गोरे अमेरीकन गाडी लॉक आउट प्रॉब्लेम सोडवायला दूरवरून इथे येतात, आपल्याला खायला पण घेऊन येतात… सगळं अजब ! मित्रानी त्यांना ते तिथवर त्याच्यासाठी आल्याबद्दल कर्टसी म्हणून २० डॉलर्स देऊ केले, पण ते घ्यायला त्यांनी “प्रॉब्लेम आम्ही कुठे सोडवलाय?” ह्या कारणास्तव नकार दिला.

मित्र त्यांना म्हणाला की “माझा प्रॉब्लेम सुटला होता. पण, पुढे जर कोणी निरोप दिला असेल, तर माझ्यासाठी म्हणून आलेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय निघून जाणं मला योग्ग्य वाटलं नाही”.

तो वृध्द म्हणाला की “ह्या पूर्वी माझा कधी कोणा इंडियनशी बोलण्याचा, व्यवहाराचा संबंध आलेला नाहीये, पण तू तुझा प्रॉब्लेम सुटला असताना देखील ‘कोणी आला तर?’ ह्याची कदर करत इथे थांबलास… हे तुझ्यावरचे संस्कार आणि संस्कृती यामुळे आहे (your upbringing and your culture). अशी संस्कृती असलेल्या इंडियाला मी आवर्जून भेट देईन. माझ्या मित्रांना पण This is how the Indian culture is हे सांगीन”.

त्याच्या दृष्टीकोनातून माझा मित्र ‘इंडियाचा प्रतिनिधी’ होता. मित्राच्या केवळ थांबण्यामुळे त्या वृद्धाचं “इंडिया विषयी” एकुणात सकारात्मक मत बनलं होतं. मित्रानी क्षणभर विचार केला की, “जर मी न थांबता निघून गेलो असतो तर?” ……… आपल्याला असं वाटत असतं की “मी एखादी कृती (Gesture) केली – न केली तर काय फरक पडणारेय?”…….

फरक पडत असतो, पण दर वेळेस तो आपल्याला समजेलच असं नाही.

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *