ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.419

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१९

सत्त्व रज तम शुद्ध सत्त्व चौथा । निर्गुणी गुणापरला बाईयांनो ॥१॥ स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी । महाकारण सरी चौथा देह ॥२॥ कैवल्य देह तो ज्ञानदेवें पाहिला । पहाणे होऊनी ठेला चराचरीं ॥३॥

अर्थ:-

सत्त्व, रज, तम व चौथा शुद्ध सत्त्व या चार गुणापलिकडचा तसेच स्थूल सूक्ष्मकारण व महाकारण या चारही देहापलीकडचा जो मोक्षरूप देह तो आम्ही पाहिला. व तोच चराचरांच्या रुपाने नटला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *