मदत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

|| सप्रेम जयहरी ||
आपणांस कोणतीही मदत लागेल तर आपण ती विनामुल्य घेऊ शकता.

सामान्य प्रश्नांची उत्तरे.

  • माझी नोंदणी करण आवश्यक आहे आहे का.?
    उत्तर:
    हो आपली नोंदणीवारकरी रोजनिशी ” या वेबसाईटवर आवश्यक आहे, कारण आपण वारकरी आहात तर आपण आपल्या सांप्रदायाची सेवा या ” वारकरी रोजनिशी ” वेबसाईटच्या द्वारे करू शकता.
    आणि
    सेवा घेऊ सुद्धा शकता.
    आपण आता हे काही उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
    उदा. : १.
  • समजा गावातील अखंड हरिनाम सप्ताहमध्ये १०१ लोक ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसणार आहेत, त्याना ज्ञानेश्वरी ग्रंथ उपलब्ध करून द्यायचा आहे.
  • तर
  • मग ह्या वेबसाईटवर येवून तुम्ही पंढरपूर, आळंदी देवाची, पैठण, ईत्यादी तीर्थावरील धार्मिक दुकानदारांचा संपर्क नंबर उपलब्ध करू शकता.

  • किंवा शेजारच्या २५ किलोमीटर च्या वर्तुळात (पंचक्रोशीत) कोणत्या गावात धार्मिक साहित्य उपलब्ध आहे का ? याचा तपास करू शकता.
  • अनेक संस्थाने, सप्ताह मंडळे, यांच्याशी संपर्क करू शकता.
  • महाराज, (वक्ते) गुणीजन (गायक, वादक, ईत्यादी) कार्यक्रम करण्यासाठी आपली माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम हि “वारकरी-रोजनिशी” हि वेबसाईट करते.

  • कायर्क्रमाच्या संबंधितांना या “वारकरी-रोजनिशी” या वेबसाईटचा फार उपयोग होणार आहे.
    जसे
    अखंड-हरीनाम-सप्ताह मध्ये मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टमचा बराच मोठा वाटा अलीकडच्या काळात होत आलेला आहे, आणि तो नाकारताही येत नाही.
    (आणि बरेच कार्यक्रम “मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टम” बरोबर नसल्याने कार्यक्रमाचा रस भंग झालाचा अनुभव अनेकांना आलेला आहे.)

  • अखंड-हरीनाम-सप्ताह सप्ताह मध्ये
    किर्तनकार -:  
    कथा प्रवक्ता -: (झांकीवाले, ऑर्गन, तबला, इत्यादी संच)
    भजन गायक -:  (संचां सहित)
    विणेकरी -: (काकडा, नगर प्रदक्षिणा, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन, ईत्यादीसाठी)
    गायक -: 
    वादक -: (काकडा, नगर प्रदक्षिणा, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन, ईत्यादीसाठी)
    टाळकरी -:  
    काकडा घेणारे -:  
    वीणा पहारा घेणारे -: 
    अशी 
    धार्मिक मंडळी आवश्यक आहे, तेंव्हा त्यांचा संपर्कच महत्वाचा ठरतो. आणि तो संपर्क हि वेबसाईट उपलब्ध करून देत आहे.

  • नुसती धार्मिक मंडळीच नाही तर “अखंड-हरीनाम-सप्ताह” शी संबंधित मंडळी जसे आचारी, पाणी टॅंकर, हार-फुले, धार्मिक ग्रंथ, मृदंग दुरुस्ती, वीणा दुरुस्ती, अन्नदान मंडळे, ह्या सर्वांची संपर्क निर्मितीसाठी हि “वारकरी-रोजनिशी” वेबसाईट काम करत आहे.

  • नोंदणी साठी येथे क्लिक करा.

 

 

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *