संत सोपानदेव चरित्र ७

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ७

अनुक्रमणिका


एरवी शांत समंजस असलेले आपले हे दोन भावांच्या चेहर्‍यावर एवढी वेदना,उद्विग्नता पाहुन सोपानांनी कारण विचारल्यावर,माधुकरी मागायला गेले असतां,ज्ञानेश्वराबरोबर घडलेला प्रसंग निवृत्तीनाथ सांगु लागले.एका घरासमोर ज्ञानदेव उभे राहुन ॐ भवति भिक्षां देही असा पुकारा केल्यावर हातात भाकर घेऊन घरची बाई बाहेर येऊन झोळीत भाकर टाकणार तेवढ्यात त्या घरचा पुरुष बाहेर आला व तिच्या हातची भाकर हिसकावुन कुत्र्याला टाकली व ज्ञानदेवांना हाकलुन दिले.हा अपमान सहन न होऊन ज्ञानदेव त्याला म्हणाले, तुम्हाला जर मानव आणि पशूतला फरक समजत नाही तर तुम्ही कसले ब्राम्हण? असा रागाने सवाल करुन तडक तिथुन निघुन आले.हे ऐकुन सोपानांही राग आला.मुद्रा लाल झाली,पण क्षणभरच! शांत स्वरांत प्रौढ मानसासारखे म्हणाले, यात एवढं राग येण्यासारखं काय आहे? हे तर अपेक्षितच होतं.आपण वादळाला तोंड द्यायचं ठरवल्यावर,मग काय घाबरायच?ज्ञानदादा आपण ज्ञानोपासक ना? मग,”विद्याविनय सम्पन्ने ब्राम्हणे गवि हस्तिनी ।शुनि चैव श्वपाके च पण्डीतः समदर्शिना”।। असं भगवंत श्रीकृष्णाने सांगीतले आहे ना? दादा!तुला तर अवघी गीता पाठ आहे.आपल्याला संतापायचं कारणच नाही.माधुकरीवरच आपलं जगनं आहे तर,स्थितप्रज्ञता ठेवलीच पाहिजे ना?


‌ सहा वर्षाच्या सोपानाचे बोलणे ऐकुन निवृत्ती व ज्ञानदेव डोळे विस्फारुन दिड्ःमुढ झालेत.ज्ञानेशा म्हणाले,अरे सोपाना!तूं आणि भगवद् गीता?ते सुध्दा पांचवा अध्याय? आणि कर्मसन्यासयोग?अरे कुठे आणि कधी रे शिकलास?तुम्ही दोघे घाटावर जात होता तेव्हा मला बाबांनी संथा दिली.आणि गीतेचे अठराही अध्याय शिकवले. संकोचुन सोपानदेव म्हणाले,एवढा संयमी आणि शांत असणारा ज्ञानदादा विचलित झालेले पाहुन,जस सुचलं तसं बोलुन गेलो.तुम्ही दोघे भल्या पहाटे घाटावर जाऊन वेद उपनिषदांची हटयोगाची चर्चा करीत असत आणि बाबांनी विधिवत भगवद् गीता शिकवुन मुखोद्गत करुन घेऊन सोपानाला ज्ञानसंपन्न,समंजस शहाणं बनवलं.सोपानाच्या मनाची जमीनीची मशागत होऊन त्यावर कांही बीजांकुर फुटले होते,अंकुरले होते.ज्याला आपण लहान,अबोध समजत होतो तो आपल्याला समजवाण्या इतका समंंजस झाला होता.आतां मुक्ताईची काळजी नव्हती.तीच्यासाठी सोपानच सक्षम होता.ज्ञानदेवांचा राग कुठल्या कुठे पळाला.आणि दोघांनी धाकट्या सोपानाला आपल्या कवेत घेतले.तोच


दादाss ज्ञानदादा,सोपानदादा, निवृत्तीदादाss बघा मला काय सांपडले? मुक्ताईच्या हाका ऐकुन तिघेही बाहेर आलेत.मुक्ताईच्या हातात पिवळे ठिपके असलेल्या हिरव्या रंगाच्या कांचेच्या बांगड्या बघुन जागच्या जागी थिजल्या सारखे थबकले.तीच्या हातातल्या बांगड्या बघुन तिघांच्याही काळजांत चर्र झालं!उरांत हुंदका घुसमटला,डोळ्यात पाणी उभं राहीलं.सावरुन निवृत्तीदादा म्हणाले,मुक्ते कुठे मिळाल्या?गंगेच्या काठावर वाळुत ह्या आईच्या बांगड्या सांपडल्या,आणि सोपानला बिलगुन रडु लागली.मुक्ते एकटीच गेलीस होय गंगेच्या वाळवंटात?मला सांगीतले असते तर मी ही आलो असतो खेळायला.रडु आवरुन मुक्ता म्हणाली,दादा! खेळायला नव्हते गेले,परवा विनायकबुवांनी सांगीतले होते ना की,आईबाबानी गंगेत समर्पन केले, तर,आईला शोधायला गेले होते,जिथे आपण वाळुचे घर बनवत होतो,तिथे ह्या बांगड्या सांपडल्या.वातावरणांतील ताण कमी होण्याच्या दृष्टीने ज्ञानेशाने केविलवाणे हसण्याचा प्रयत्न करतांना बघुन निवृत्तींना वाटले या हास्यापेक्षा त्याचं रडणं जास्त बरं वाटलं असतं, वातावरण निवळल्यावर,ज्ञानेशाने आणलेला शिधा थोडा थोडा चौघांनी वाटुन खाऊन भरपूर पाणी पिऊन क्षुधा क्षमवली.रात्री चौघेही भावंड झोपली तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळी स्वप्ने तरळत होती.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading