ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.447

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७

आनंदाच्या ताटी अमृताची वाटी । विवेक तारू घोटीं रसना बळेंं ॥१॥ तें हे रूपडें रूपस विठ्ठल । पुंडलिकें बहुसाल प्रार्धियेलें ॥२॥ तारावया जन व्हावया पावन । जडमूढ अज्ञान हरिपाठें ॥३॥ कर्म धर्म करितां शिणली येतां जातां । पुंडलिकें अनंता प्रार्थियेलेंं ॥४॥ येऊनियां श्रीहरि भीमेच्या तीरींं । सुदर्शनावरी पंढरी उभविली ॥५॥ अमरतरूवर तीर्थ सरोवर । वेणुनादी श्रीधर खेळताती ॥६॥ बागडे गाती हरि वाकुल्या कुसरी । तेथे पुंडलिक परोपरी स्तवन करी ॥७॥ पंढरीनगरी फावली चराचरीं । धन्य जो भूमिवरी दृष्टी भरी हरिदेखे ॥८॥ ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशीराज़ । नव्हें हें नवल चोज प्रत्यक्ष हरि ॥९॥

अर्थ:-

श्रीपंढरीराय हेच एक आनंदाच्या भोजनाचे ताट असून त्यांत पुंडलिक अमृताची वाटी अशी कल्पना करून ह्याच ताटात असलेला ब्रह्मरस सेवन करणारे महानुभव संत ते भक्तीच्या बळाने तो ब्रह्मरस सेवन करीत आहेत.असे हे सुंदर गोजिरवाणे श्रीविठोबाराय यास पुंडलीकाने प्रार्थना करून पंढरीस आणले. त्याचे कारण अज्ञानी, जड, मूढ, जीवांचा हरिस्मरणाने उद्धार करून पवित्र करावे हे होय.कर्माचरणाने जन्ममृत्युच्या फेऱ्यात पडून दमलेल्या जीवाकडे पाहून पुंडलिकरायांनी या भगवंताची प्रार्थना केली. त्याचे प्रार्थनेप्रमाणे श्रीहरिनी येऊन चंद्रभागेच्या तीरांवर खाली सुदर्शन ठेऊन त्यावर पंढरी वसविली. त्या पंढरीचे महात्म्य काय वर्णन करावे? पंढरीतील सर्व वृक्ष कल्पतरू आहेत.तेथील सरोवरे तीर्थे असून त्यावर भगवान श्रीकृष्ण मुरलीच्या नादांत खेळत आहे. अनंत तऱ्हेंने श्रीहरिचे नाम घेत असता त्या बागड्या म्हणजे स्वछंदाने गीत गाणाऱ्या भक्तास जो ना त्या आनंदाच्या भरामध्ये ते भगवतभक्त स्वर्गातील देवांना ‘टुक टुक माकड करून हिणवू लागले. तेव्हा पुंडलीकराय पांडुरंगाला म्हणू लागले की हे या भूमीवर ही पंढरी ज्या जीवांना प्राप्त झाली ते लोक व ही पंढरी धन्य आहे. जो डोळे भरून विठ्ठलाचे दर्शन घेईल त्याचे भाग्य धन्य मला हे श्रीविठ्ठल बीज प्रत्यक्ष लाभले आहे मी माझ्या अनुभवाने हे वर्णन केले आहे. ही कांही नुसती पोकळ स्तुती नाही तर वस्तुस्थिती आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *