ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 830

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८३०

अष्टदळ पाहे पद्म नेत्र दाहे । सोहं मंत्र कोहं ठाकी दूरी ॥१॥ आडवी आडव रुपाचा बरव । सखिये तो राव रामराणा ॥२॥ उपरती साधी प्रपंची अवधी । गुणें गुण उद्बोधी शेजे सये ॥३॥ ज्ञानदेवी लपे विज्ञान हारपे । काळ यम मापें न बाधिती ॥४॥

अर्थ:-

नेत्रांदिदशेद्रियांत अष्टदल कमलाप्रमाणे असणारे, हृदयांत अभिव्यक्त होणा-या परमात्म्याचे चिंतन कर तूर्त सोहं कोहं असे जे मंत्र आहेत ते दूर टाकून दे. संसारुपी अरण्यांत सर्वत्र संकटेच असतात. त्या संसाराच्या पलीकडे असणारा परमात्मा सुंदररूपाचा तो राम राजा आहे. असे समज. प्रपंचाला टाकून मनाचे उलट साधन कर आणि सात्त्विक गुणाने अनंत कल्याण गुणधाम श्रीहरि त्याचा उत्तमबोध करून घेऊन त्याच्या स्वरुपाचे ठिकाणी स्वस्थ राहा. परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी नित्य लीन हो. आणि प्रपंचज्ञान टाकून दे म्हणजे कितीही मोठा संसार असला तरीही बाधा करणार नाही व यमही त्याच्याकडे पाहाणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *