संत तुकाराम म. चरित्र ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-५

देहुमधील समताधर्म फडकावणार्‍या धर्मवीराकडे अखिल जगाने पहावे असा दिवा कनकाईने पाजळविला, तर पारततंत्र्यांच्या जोखडातुन मुक्तता व्हावी, शेकडो वर्षे परसत्तेचे तुफान नष्ट व्हावे, स्वातंत्र्याची ज्योत महाराष्टात प्रथम पेटविण्याचे श्रेय जिजामातेने शिवबासारखा पुत्र देऊन घेतले. *जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उध्दारी।।*तुकाराम महाराज आणि छ. शिवाजी महाराज दोघेही मातृभक्त होते. खरं पाहतां तुकोबांचा विपरीत काळाच

काळाचा आरंभ दुष्काळापासुन झाला नाही तर त्यांचे वडील बोल्होबा मरण पावल्यापासुन झाली. लवकरच त्यांची परमवत्सल माता मरण पावली. व्यापार धंदा बसल्यामुळे आधीच्या दुखण्याने त्यांची प्रथम पत्नी रखमाबाईची प्रकृती क्षीण असल्यामुळे अश्या परिस्थीतीत ती टिकाव न धरु शकल्याने मरण पावली. बायको, मुल  मेल्याने मायापाशांतुन ते मोकळे झाले. संसाराचे गाडे नीट चालत नाही असे पाहुन भामनाथ पर्वतावर जाऊन ते भजन व हरीनामस्मरणांत मग्न झाले. भजन पुजन, नामस्मरण, ग्रंथाध्यायन, किर्तन, मनन ध्यान इत्यादिकांत वेळ घालवु लागले. जवळपास असणार्‍या आळंदी वगैरे तिर्थयात्रा करीत. अमेरिकन तत्ववेत्ता इमर्सनच्या म्हणण्यानुसार *’जोपर्यंत मनुष्यावर संकटं येत नाहीत तोपर्यंत त्याच्या अंगी असणार्‍या गुणांचा विकास होत नाही’*

संकटे म्हणजे उन्नतावस्था प्राप्त करुन देणारी साधनें आहेत. ज्याच्यावर देवाचे प्रेम असते त्याच्यावर संकटे आणुन देव त्याला तावुन सुलाखुन त्याची परिक्षा घेत असतो. भागवताचे प्राकृतात निरुपण केल्याबद्दल, आणि अभंगाद्वारे वेदांताचा उपदेश केल्याबद्दल तुकोबाचा अतिशय छळ करण्यांत आला. धर्मतत्ववेत्तांचे ज्ञान व्हावे व इश्वरस्वरुपाची ओळख व्हावी, ज्या देवाची भक्ती करतो त्याचे यथार्थ रुप समजावे, आणि हे ज्ञान वेदांतच आहे हा दृढ समज असल्यामुळे वेदांचा ठाव घेण्याची त्यांना उत्कंठा होती. परंतु हा अधिकार आपल्याला नाही म्हणुन ते दुःखी होते.

तुकोबा वेदांती नव्हते, पंडीत नव्हते. त्यांनी पंडीतांप्रमाणे वाद केले नाहीत, तरी अनेक व्यावहारीक दृष्टांत देऊन अद्वैत मनाचे उत्तम रितीॅ खंडन केले. भेदभाव नाहीसा करावा, हे त्यांचे आरंभापासुन ध्येय होते. सर्व सृष्टी परमेश्वराची आहे, परमेश्वर भूतमात्रात आहे, विश्वव्यापक आहे. यासाठी सर्वांविषयी समभाव ठेवुन कोणाचा मत्सर, द्वेश, इर्षा करुं नये. त्यांची भक्ती म्हणजे प्रेमभक्ती, सख्यभक्ती होती. देवांचे भजनपुजन,जनी जनार्दनाची आणि भूतमात्राची सेवा करत देवाशी समरस झालेत.

वैराग्य प्राप्त झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, अपनिषदे अभ्यासली. द्वेत-अद्वैतावर कांही अभंग रचना केली. नंतर ग्रंथावलोकन कमी होऊन भजन, किर्तन, मनन, ध्यान करुन देवाशी समरह होण्याचा जो आनंद मिळतो तो भक्तांच्या भजन किर्तनांत आहे, ज्ञान्यांच्या आत्मस्थितीत नाही.

महारांजास वैराग्य उत्पन्न होण्याचे मुख्य कारण त्यावेळी परसत्तेने गरीब जनतेकडे दुर्लक्ष करुन चालवलेले भयंकर हाल ! जनतेच्रा दुःखास अनुसरुन परमेश्वरास जागे केल्याशिवाय, त्याला प्रसन्न केल्याशिवाय दुसरा उपाय नाही हे त्यांना उमगले. संसारी जीवनास स्वहस्ते त्यागरुपी अग्नी लावुन जनहिताचा खरा मार्ग शोधला. परहितासाठी नवीन जीवन धारण केले.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *