संत तुकाराम म. चरित्र १४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-१४

तुकारामांची भक्ती एवढी जावल्य ठरली की, प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आलेत. सुदाम्याप्रमाणे ते गरीब असल्याने पाण्यांत कण्या शिजवून *फाल्गुन शुध्द दशमीला* जेऊ घातले. तेव्हापासुन देहुला या दिवशी कण्याचा नैवद्य दाखवण्याची प्रथा देवाच्या भेटीच्या स्मरनार्थ  पडली आहे. जीवभाव देवाला अर्पन करुन संबंध आयुष्यभर परमेश्वराची आराधना, परमार्थिक धनाची कमाई तुकोबासारख्या साक्षात्कारी संताने आपल्या आध्यात्मिक साठा आपल्यासाठी ठेवला आहे.

एका एकादशीला जिजाईला जवळ बोलावुन तुकोबांनी अकरा अभंगांनी परमार्थाचा उपदेश करुन म्हणाले, “मानवदेह हे शेत आहे, या शेताची प्राप्ती होऊन जे भक्की करतात त्यांना ज्ञानरुपी चांगले पीक येते. याचा ८०% सारा द्यावा लागतो, न दिल्यास काळाला जबाब द्यावा लागेल. पांच ज्ञानेंद्रिय आणि पांच कर्मेंद्रिय! यापैकी १०% सारा राबवुन दिला. ७०% सारा देण्यासाठी कांहीही एवज नाही. आपल्या देहात दहा  इंद्रिय आहेत, त्यांचा उपयोग  सुखौपभोगासाठी किंवा मानप्रतिष्ठेसाठी न करतां कोणी शिव्या देवोत की, स्तुती करो असा कोणताही विचार न करतां निरिह वृत्तीने देवास अर्पण केल्यास  १०% ची फेड होऊ शकते.”

ते पुढे म्हणाले, “देवाने माझा पिच्छा पुरवुन  मन, मनोविकार सर्व हरण केले. आपल्याला हीन दशा आली म्हणुन वाईट वाटुन न घेता, खंत-खेद न मानतां नाशवंत गोष्टीची आसक्ती टाळुन कल्यानाचा मार्ग  जर स्विकारला तर आपली कधीही ताटातुट, वियोग होणार नाही.मुलांबाळांत, संसारांत न गुरफटता मोहमाया पाशातुन मुक्त होऊन जन्म मरण्याच्या फेर्‍यातुन सुटका होण्यासाठी मोठ्या मनाने सर्वांना आपुलकीने सामावुन घेतल्यास उन्नती होईल. जवळची संपती चोराने लुटली, मुले नाहीतच, वासना दमण करुन  मन वज्राप्रमाणे कठोर, सुखाचा हव्यास न केल्यास संसाराचे फाश तुटुन परमानंदाची प्राप्ती होईल.”

” उद्या शुध्द पक्षाची व्दादशी व पर्वकाळ आहे. व्दिजांना बोलावुन आपल्या जवळचे सर्व शुध्द अंतःकणाने दान कर, परमेश्वर आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. जसे सांगीतले तसे वागलीस तर भवसागर तरुन जाशील. या उपदेशात त्यांनी कुठेही पती सेवा, किंवा पतीला देवाप्रमाणे मानावेचा चकार शब्दही आलेली नाही.”जिजाई संसारात गुंतलेली, तर तुकाराम रात्रंदिवस ध्यानपुजनात मग्न असल्यामुळे तीच्यावरच संसाराचा भार पडत असे. परंतु ते तीला संसारातुन, मोहातुन मन काढण्यास परम सुखाचा लाभ होईल, तिन्ही लोकांत मान्यता मिळेल असे वारंवार सांगत असे.

तुकोबा आणि जिजाई एकत्रीत राहत, परंतु दोघांचेही मार्ग  भिन्न असुन वेगवेगळ्या भुमीकेवर त्यांचे वास्तव्य होते. जिजाई रुळलेल्या कर्मठांच्या मार्गाने जाऊन, तीचा संसार मर्यादित असल्याने लौकीक आचार धर्म पाळीत, तर तुकोबांचे लक्ष अचल अशा धृव्यतार्‍याकडे, उच्चस्थानी असलेल्या देवाच्या चरणावर अधिष्ठान ठेवले होते. एकदा एकांताची संधी साधुन एका विलासप्रिय स्रीने त्यांच्याजवळ कामवासनेची इच्छा व्यक्त केली. तुकोबांनी तर इंद्रियावर विजय मिळवला असल्याने, परस्री मातेसमान आहे असे म्हणुन तीला फटकारुन परत पाठविले.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *