संत तुकाराम म. चरित्र ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-६

तुकोबांना संसारी सुख नाही म्हणुन ते भक्त झाले नाही, तर पुर्णविचारांती परसेवेसाठी त्यांनी वैराग्याची कास धरली. त्यांचा त्याग, भक्ती व असामान्य साधुत्व यांची प्रभा महाराष्टभर फाकली. त्यांना अनेक प्रकारची मदत, खुद्द छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या योगक्षेमेसाठी मोठी देणगी पाठवली, पण या महात्म्याने साधी नजर सुध्दा फिरविली नाही.कारण “बुडती हे जन पहावेना डोळा । म्हणुन येतो कळवळा तारावयासी ।।” याच तत्वासाठी उभे आयुष्य परमेश्वरभक्ती व जनहितातच खर्च करण्याचा निर्धार केला. समाजाच्या निरंतर उपयोगासाठी जी अनमोल अभंगवाणी करुन ठेवली त्या शक्तीचे मुळ ज्या दिवशी संसार सोडला त्याच वेळी हाती लागले.

धर्म रक्षावयासाठी ।करणें आटी आम्हासी ।
। वाचा बोलो वेदनीती ।करुं संत केलें तें ।।

तुकोबाची पत्नी जिजाई हिच्याबद्दल ती खाष्ट आहे म्हणुन प्रचार होता. पण ती कां संतापत असे ? कारण तीला घर चालवावं लागे आलेल्या अतिथीचं पहावं लागे, आणि तुकोबाचे घराकडे अजिबात लक्ष नव्हते. वरुन दिनदुबळ्यांना, आल्यागेल्यांना घरांत जे असेल ते वाटुन देण्याची प्रवृत्ती, त्यामुळे तीची फारच ओढातान व्हायची ! तीला तुकोबांची योग्यता कळल्यावर ती त्यांची एकनिष्ठ शिष्या झाली.

वास्तविक जिजाई ही पुण्यांतील एका धनाढ्य सावकाराची मुलगी ! बापाने थाटांत लग्न लावुन दिले. सासरची देखील सांपतिक स्थिती चांगली होती. पुढे वाईट दिवस येऊन सासरची संपन्नावस्था ढासळली.सासु सासरे, जाऊ मृत्युमुखी पडलेत, दीर घर सोडुन गेला, धंदा बसला. संपत्ती नाहीशी झाली, तरी ती डगमगली नाही की, माहेरी जाऊन राहिली नाही. स्वतः जामीन राहुन तुकोबांच्या धंद्याला सहाय्य व प्रोत्साहन दिले. परंतु तुकोबांचा भोळसटपणा व कनवाळुपणामुळे तीला अपयश येत गेले.

तुकोबा आणि जिजाई यांचे आराध्य दैवत, उपासनेचा मार्ग भिन्न असल्यामुळे त्यांच्यांत मतभेद होत असे. तुकोबा विठोबाचे भक्त होते तर जिजाई  मेसाई, जाखाई, जोखाई, राहु केतु शनिदेव वगैरे जिजाईचे उपास्थे होती. तीचा समज होता की, विठोबा हा घरघेणा देव आहे. तो आपल्या भक्तांना सुखाने नांदु देत नाही. संसाराची राखरांगोळी करणार्‍या विठ्ठलाविषयीची तेढ वाढु लागल्याने विठोबाला सोडुन द्या म्हणुन तीचे सारखे टुमणे असे.

तुकोबा एरवी धीरगंभीर व शांत स्वभावाचे, परंतु प्रत्यक्ष पत्नीनेच विठोबाची नालस्ती करावी हे त्यांना खपत नसे.संसारांत जी संकटे येतील त्यांना धेर्याने तोंड देऊन केवळ देवावर भार ठेवुन तीने निश्चिंत असावे, निष्काम धर्माचे आचरण करावे असे तुकोबांना वाटे, परंतु कर्मठपणांत मुरलेल्या, लौकीक धर्मात वाढलेल्या साधारण स्रीस हे असिधारे प्रमाणे कठीण व्रत आचरणांत आणणे सोपे नव्हते.

तुकोबा पत्नीस उपदेश करुन म्हणायचे क्षणभंगुर सुखाचा ध्यास न धरतां परमेश्वर प्राप्तीची आयास केला व त्याच्यावर भार टाकला तर तो भक्ताची ऊपेक्षा कधीच करत नाही. याचा जिजाईवर परिणाम होऊन ती त्याप्रमाणे  तीच्यावर परिणाम होउ झाल्यामुळे तीची आध्यात्मिक उन्नती झाली.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *