संत तुकाराम म. चरित्र १२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-१२

तुकोबांच्या शरीरावर अध्यात्मीक तेज इतके  झळकत होते की, लोकांना त्यांच्यात पांडुरंग दिसत असे. बहिणाबाई आदी मंडळी मंबाजीच्या मठात उतरली ह्या मंडळीस त्याने आपल्या पाशांत ओढण्यासाठी तुकोबाविषयी मन कलुषित करण्याचा खुप प्रयत्न केला. रामेश्वर भट्टानाही भूरळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतू ही मंडळी फसली नाही. त्यामुळे मत्सराग्नी भडकला. त्याने बहिनाबाईची गाय कोंडून सोट्याने बडविले.

ते वळ तुकोबाच्या पाठीवर उमटलेले दिसल्याने त्यांच्याविषयीची निष्ठा अधिकच बळावली. स्रीया आणि शुद्र ह्यांना अधिकार नाही, परंतु शुद्र समजल्या जाणार्‍या तुकोबांच्या वेदात्तर अभंगानी मंबाजीसारख्या ब्राम्हणाच्या फुसलावणीस न भुलता तुकोबाच्या चरणी लीन झालेत. अधिकार ही बाब परमेश्वराच्या हाती आहे. ही अधिकाराची गोष्ट जातीवर किंवा स्रीपुरुष भेदावर अवलंबुन नाही.

रामेश्वर भट्ट, कचेश्वर ब्रम्हे आणि बहिणाबाई या तिघांनाही त्यांच्या सात्वीक वृत्ती व आध्यात्मिक तेजजाने त्यांच्यात प्रत्यक्ष विठोबा दिसत असे. महाराष्टात वारकरी संप्रदायने भक्तीमार्गाची सुंदर व भव्य इमारत उभारली आणि तुकोबांनी त्यावर कळस चढविला.” *तुका झालासे कळस* ” प्रमाणे ते स्वतः कळस झालेत.भगवंताने मानवांच्या परम कल्याणासाठी प्रगट केलेला धर्म म्हणजे *भागवतधर्म*. भागवतधर्म इतर धर्मापेक्षा अधिक व्यापक व दुरवर पोहोवचणारा आहे. यात जातपात, भेदभाव, धर्मभेद, स्री-पुरुष असा संकुचित भाव  या धर्मात नाही.

या धर्माची परंपरा फार जुनी आहे. वेदकालापासुन उपनिषधे, पुढे महावीर, बुध्द, चक्रधर, ज्ञानदेव, नामदेव, नानक, तुकाराम, त्याचप्रमाणे जीसस, महंमद, राजमोहन, महर्षि देवेद्रनाथ, केशव चंद्रसेन, माधवराव रानडे वगैरे मंडळींनी एका सुत्रात गोवलेली आहे. या सर्वांच्या चळवळींचा भागवत धर्मात अंतर्भाव होतो.

पंढरीची वारी, एकादशी व्रत, विठोबाच्या मुर्तीचे पुजन, भजन किर्तन, हा तुकोबांचा मार्ग होता. शुध्द भाव, चित्त निर्मळ ठेवणे, हीच मुख्य गोष्ट मानीत. त्याचबरोबर दया, क्षमा, शांती धरावी, परोपकारी वृत्ती, अनाथांना सहाय्य, परद्रव्य, परनारीची अभिलाषा न ठेवणे, परनिंदा, द्वेष, आकस न करतां व्यवहारात चोख असावे, अशाप्रकारचा उपदेश  करीत असे. देवाचा सहवास हवा असेल तर एकंदर वर्तन सत्याला धरुन पवित्र ठेवले पाहिजे. असा अमृताचा स्राव करणारे अभंग त्यांच्या वाणीतुन स्रवत असे.

विठोबा हे तुकोबांचे कुलदैवत. त्याची भक्ती करतां करतां परमार्थ मार्गात पाऊल पुढे टाकुन  विठोबा म्हणजेच सर्व व्यापक विश्वंभर, अशी भावना ठेवुन त्यांनी साधनमार्ग चालु ठेवला. तुकोबांचा धर्म  हा प्रेमाचा धर्म होता. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे, इंद्रिय दमन ह्या गोष्टी द्दृढ अभ्यासाशिवाय साध्य होत नाहीत.

तुकोबांना मुक्तीपेक्षा परमेश्वराच्या सेवेची व संतसमागमाची असल्यामुळे         त्यांचा कल सामुदायीक धर्माकडे असुन आपण तरुण इतरांना तारावे, एकमेकांच्या समागमे वैकुंठ गाठावे, हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे भजन, किर्तन, सत्संग अशा साधनाची त्यांना आवड होती. ते स्वतः नम्रतेची मुर्ती असुन जगन्मान्य पुरुष होते. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे  ह्या गोष्टी द्द्ृढ अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच देवाचे सहाय्य मागुन संसाराचा मार्ग आक्रमत होते.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *