संत तुकाराम म. चरित्र ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-३

बोल्होबा मोरे संसारातील सर्व व्यवहार अगदी दक्षतेने करीत असत, परंतु त्यांत ते गुंतलेले नव्हते. कारण संसारापेक्षा विठ्ठलभक्तीस विशेष महत्व देत. विश्वभरांच्या भक्तीमुळे देहु गावास क्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले. त्यांनी लावलेला भक्तीरुप वृक्ष त्यांच्या नंतरच्या सर्व पिढ्यांनी वाढविला. बोल्होबा पुर्वजांच्या मार्गाचा अवलंब वाढत्या प्रमाणांत करुन पंढरपुरची आषाढी व कार्तिक वारी नियमाने करणे, घरातल्या मुर्तिची पुजाअर्चा करणे, भागवतधर्मीय संताच्या अभंगवाणीचा भजनाव्दारे प्रसार करणे वगैरे  धार्मिक बाबतीत त्यांचा बराच वेळ जात असे. संपत्ती वाढविण्यापेक्षा विठ्ठल भक्तीची वाढ जास्त कशी होईल याकडेच त्यांचे विशेष लक्ष असे.

शेतीवाडी, धनदौलत यापेक्षा विठ्ठलभक्ती जास्त उपयोगी पडेल असं त्यांना वाटे. त्यांच्या या उच्च ध्येयास सर्वतोपरी सहाय्यकर्ती अशीच गुणवती पत्नी लाभली होती. कनकाई आपल्या नवर्‍याप्रमाणेच संसारसुखापेक्षा परमेश्वर भक्तीसच जास्त महत्व देई. संतवचनाप्रमाणे बोल्होबा मोरे प्रपंचात अगदी सावध होते. मालकीचा वाडा, महाजनकीचे उत्पन्न,

किराणामालाचे दुकान, पुरेशी  शेती व सावकारी अश्या गोष्टींकडे कर्तव्य म्हणुन काळजीपुर्वक लक्ष देत. भक्तीच्या नावाखाली परक्याची एक दमडीही नको हे महान पथ्य सांभाळुन पुढील पिढीने हाच आदर्श ठेवला. त्यांच्या निर्लोभ वागण्यामुळे समाजात त्यांना चांगला मान होता. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तुकोबाचे लग्न लहानपणीच रमाबाई बरोबर झाले. पण तीला दम्याचा त्रास असल्यामुळे, त्यांचे दुसरे लग्न पुण्याच्या गुळबे या श्रीमंत सावकाराने आपली मुलगी जिजाबाईचे लग्न उत्तमप्रकारे लावुन दिले.

बोल्होबांचा थोरला मुलगा साबाजीची पत्नी वारल्यामुळे त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केले पण या जन्मत्यागाने लग्नास नकार देऊन उभे आयुष्य भक्तीत घालवणे हेच ध्येय होते. कांही दिवसांनी त्याने कोणासही न कळू देता गृहत्याग करुन स्वतःच्या अस्तीत्वाचा कुणालाही थांगपत्ता लागु दिला नाही. पुत्रवियोगाने बोल्होबा संसारातुन  विरक्त होऊन भक्तीसंस्कारांत चांगलेच रमले.

याचा परीणाम तुकारामावर होऊ लागला. बोल्होबाने संसाराची जबाबदारी तुकारामावर सोपवुन स्वतः परमेश्वर भक्तीत मग्न झालेत.अल्प वयातच संसाराची जबाबदारी तुकोबा आनंदानं पार पाडीत होते. वडीलांचे संसारातुन पुर्णपणे निघालेले मन आणि आईचा पुत्रवियोगाचा जिवंत उमाळा पाहुन तुकोबांचे संसारात मन रमेना…!  आईबापांची वाढत्या प्रमाणांतील भक्तीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन दिवसेदिवस वाढ होऊ लागली.

तुकोबांच्या संतपणाचा, भक्तीचा , श्रेष्ठतेचा पाया मातृभक्तीतच होता. त्यांच्या ठीकाणी जाज्वल्य स्वरुपात भक्ती निर्मान करणारी त्यांची माता कनकाईच होती. तुकोबा गर्भात असतांना त्यांचेवर श्वासाबरोबर भक्तीची पाखर घातली.

तान्हेपणी स्तनांतुन त्यागरुपी दुध पाजुन पवित्र असे वैराग्याचे संस्कार घडविले. त्यामुळेच हा जगद्वंद्य महात्मा निर्माण होऊ शकला. एक माता जे करु शकेल ते हजार शिक्षकास गुरु म्हणुन मिरवणारांस अशक्य आहे. भक्त पुंडलीकाने पंढरपुरी मातृपितृ भक्तीने विठोबास उभे करुन समाजास आईबापांच्या सेवेचा मार्ग दाखविला. तुकोबांच्या अभंगावरुन ते निःसीम मातृपितृ भक्त होते हे दिसुन येते.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *