संत तुकाराम म. चरित्र २

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम भाग-२

बल्होबांना तीन मुलं, सावजी, तुकाराम, कान्होबा! सावजीचा पुर्वीपासुनच वैराग्याकडे कल होता. धाकटा कान्होबा पुढे तुकारामाचा शिष्य झाला. तुकोबांचे मुळ पुरुष विश्वंभर यांनी देहुस आले ते केवळ भक्ती व जिवंत धार्मिक भावना यांच्या बळावरच !  त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पन करुन सामाजासाठी राष्टभक्तिचा मार्ग मोकळा करुन दिला. मागील सहा पिढ्यांचा धार्मिक कमाईचा वारसा बोल्होबा मोरे यांना मिळाला.बोल्होबांची वडीलोपार्जित खरी मिरासदारी विठ्ठल भक्ती तुकोबांना मिळाली. त्यांची पत्नी कनकाईचीही भक्ती उत्कट होती.

अशा या महान आईबापांनी तुकाराम महाराजांना जन्म दिला म्हणण्यापेक्षा महाराष्टधर्म! मानवधर्म, भक्ती, त्याग, वैराग्य व महाराष्टाचे भाग्यासच जन्म दिला असे म्हणणे संयुक्तीक होईल. महाराष्टाचा नवा मनु जन्मास आला. त्यावेळी महाराष्टाची राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थीती मृतप्राय होऊन तीला घाण येऊ लागली होती.महाराष्टाची बहुसंख्य जनता गुलाम होते.

उच्चनिचतेचे शिखर गाठल्याने हिंदु समाज विस्कळीत झाला होती. अशी सर्व परिस्थिती सुधारण्यासाठीच त्यांचा जन्म  झाला म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.तुकोबांच्या जातीवरुनही त्यावेळी बराच हलकल्होळ माजला होता. जातीजातीतील विषमता त्यांच्या मनाला फार डाचत असे. विठोबाची कास धरल्याने जातकुळीचा भेदभाव नष्ट होतो हे त्यांनी पुनः पुनः सांगीतले. पण त्यावेळी जातीजातीतील द्वेष, मत्सर नीट लक्षांत घेतल्याशिवाय त्यांच्या अभंगाचे मर्म कळणार नाही.

वास्तविक तुकोबांचे मोरे घराणे देशमुखी, वतनदारीचे, पण त्यांचा वाण्याचा धंदा असल्यामुळे त्यांना शुद्र समजत होते. त्यांनी महप्रयासाने अभंग रचना केली. या अभंगामुळे समाजाचे खरे हित होणार होते पण वाघोलीच्या रामेश्वर भटजींनी सर्व अभंग नदीत खोलवर बुडवले. हेच त्यावेळी धार्मिक स्वातंत्र्य होते का?महाराजांची खरी योग्यता जातीवर नसुन निर्मळ भक्ती, सत्याचारण, अहिंसा, हीन-दीनांबद्दलची जागती कळवळ, भागवत धर्माची द्वारे सर्वांसाठी खुली करणे,

उच्चनिचतेची कृत्रिमता गाडणे, रुढीच्या दास्यातुन सर्वास मुक्त करणे, वर्णाश्रमधर्माबाबत उघड बंड करणे, परधर्मियाच्या धार्मिक आक्रमणास अटकाव करणे आणि महाराष्टातील बहुसंख्य लोकात चालु काळाबद्दलची जाणीव उत्पन्न करणे, वगैरे राष्टोध्दाराचा बाबींवर त्यांचा भर होता.अशा एकंदर महत्वाच्या गोष्टींमुळे महाराष्टातील आबालवृध्दांच्या ह्रदयात कायम ठाव करुन असेल, तोपर्यंत मानवी मन हे धर्म व भक्तीस बांधील राहिल आणि  इतिहास जिवंत राहिल. महाराष्टाच्या ह्रदयात तुकाराम महाराजांची जागा कायम राहील.तुकोबा हे व्यापकपणे चहुवर्णातीत होते कारण ते ब्रम्हनिष्ठ होते.

ब्रम्ह जाणे तो ब्राम्हण !रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग,अंतर्मन व बाहेर जनांशी युध्द करुन दोहोंवर जय मिळवला म्हणुन क्षत्रिय! संताचा उदीम उपदेशाचा, भक्तीप्रेमाचा देवघेवचा व्यापार जन्मभर केला म्हणुन वैश्य! आणि पांडुरंगाची, जनता जनार्धनाची त्यांनी निष्काम भावनेने सेवा केली म्हणुन शुद्र ठरतात. बरं ते चहुवर्णाच्या पलीकडे गेले होते. स्वानुभव सुर्यापुढे. सारेच विचार तुच्छ ठरतात

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *