ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.169

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १६९

जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे ॥ तें देखोनियां यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥ तें क्षेम सांगावया वाचा कैंची ॥१ ॥ वालभते ब्रह्म गोकुळीं आनंदे ॥ गौळियाच्या छंदें खेळतां दिसे ॥ध्रु० ॥ थुरथुर चालत भूमि पाय ठेवित । आंतु बाहिर दावित यशोदे माये ॥ तो नित्य पूर्ण ह्यणे कडे घे कांवो आमये ॥ स्तनपान दे कां सये वोसंगागे माये ॥२॥ दोनी चारी कणिका वक्रारविंदी देखा ।

तें मुखमय कां माहेर होता ॥ तें उचलेनि कपोळीं स्नेहें चुंबिती गौळणी । मांजयाची सिरयाणी ध्यानीं मुनिजनागे माये ॥३॥ विश्व प्रतिबिंबाचें बिंब तो कान्हया वो साजणीं । त्यासी वोसंगा घेउनी गौळणी स्तनपान देती ॥ सवेंचि कासाविस होती ते पाही । मां साच कीं कान्हया नाहीं तेथें यशोदा ते कैची ॥४॥ वेदाशास्त्रा पुराणा आणि यज्ञतप दाना । श्रुति धांडौळितां मना ठावो नुरेचि । मां मां म्हणोनि गौळणी अंगोळिया धरिती ।

मां विस्मयो करिती चोज अचोजगे माये ॥५॥ ब्रह्मदिकां लक्षा नये कल्प गेले युगे युगे । तो गौळणीया वोसंगा निघालगे माये ॥ तें बाळ भावाचे कीं संतत दैवाचे । न वर्णवे वाचे दिपोदिपिवो माये ॥६॥ सांवळा सुजेडु कीं सुधेपरिस गोडु । तो या डोळ्या उजियेडु डोळसु तो ॥ त्यानें एकै घेइजे एके पुजिजे । मां प्रीतिचेनि माजे नेणिजे दुजेगे माये ॥७॥ हारवी कांई आपुलेपण न सांडितां गांवोगांवीचा होत जात ।

तैसा गोकुळीं गोपिनाथु सकळ जना ॥ कृष्ण परब्रह्म पुतळा कीं आनंदाची कळा । तो हा भोगविता हे लीळा मदनाची गे माये ॥८॥ एक पावलों म्हणती ते कांहींच नेणती । अनुसरलिया हातांतळी पावा पावा म्हणे निवृत्तिदासु हरी । बापरखुमादेविवरु विठ्ठलु करिते निकेगे माये ॥९॥

अर्थ:-
खेळताना धुळीत माखलेले, मोठे पोठ असलेले व सुंदर डोळे असलेला तो बाळकृष्ण अंगणात खेळताना पाहुन यशोदा त्याला मायेने क्षेम देण्या साठी आलिंगन देत आहे त्याचे वर्णन वाचे ने कैसे करावे. आवडीचे परब्रह्म गोकुळात गौळ्यांसोबत आनंदाने खेळताना दिसत आहे. थुयी थुयी चालतल, भुमीवर पाय टाकत आत बाहेर करणाऱ्या कृष्णाला ती

यशोदा खाली उतरु देत नाही कायम कडेवर घेऊन असते व तो ही तिला स्तनपानाची मागणी करत आहे. त्याच्या मुखाला लागलेले दोन चार मातीचे कण पाहुन त्या भुंग्यांना, योग्याना व चंद्राला त्यांचे माहेर वाटत आहेत. त्या गौळणी त्याचे मुखचुंबन घेऊन प्रेमाने मत्त होत आहेत. विश्वाचे बिंब प्रतिबिंब असलेल्या त्या कान्हाला त्या गौळणी आलिंगन देऊन

स्तनपान देत आहेत. व तो दुर गेला दिसला नाहीतर कासाविस होत आहेत. त्यांना तो कृष्णच दिसला नाही तर यशोदा कोठुन दिसणार.त्याचा ठाव वेद शास्त्र, श्रुती, पुराणे यांना घेता आला नाही यज्ञ, तप व दान करुन तो प्राप्त झाला नाही पण अशा त्या कान्हाला त्या गौवळणी बोटाला धरुन खेळवतात त्याचा विस्मय मनाला होतो. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

कोटी कल्प तप करुन तो ब्रह्मादिकांना अकळ राहिला. तो त्या गौळणींच्या मांडीवर खेळतो हे त्याचे भाग्य की संतांचे दैव हे कळत नाही. अशा त्या दिपाच्या दिप्तीचे वर्णन वाचेंने कसे करता येईल.सावळा तेजःपुंज व अमृताहुन ही गोड असणारा त्याला कोण घेणार नाही? त्याची सर्वच पूजा करतात. व त्या प्रितीच्या मोहरामुळे त्या गौवळणा दुसरे काही जाणित नाहीत.

सुर्य जसा आपले एक स्वरुप न सोडता गावोगावींचा होऊन जातो. तसा गोकुळातील कृष्ण आपले कृष्णपण न सोडता सगळ्यांचा होतो. परब्रह्म कृष्णाला आनंदाची मूर्तीच म्हणता येईल.अशा लीला भोगणाऱ्या गवळणी ही मदनाची लीला आहे असे मानतात.परमात्मा आम्हाला कळला असे म्हणणारे काहीच जाणत नाहीत परंतु त्याला अनुसरुन वागले की तो आपलासा होतो असा

तो माझे पिता व रखुमाईचा पती श्री विठ्ठल तो सगळ्यांचेचांगले करेल व त्यांनी मला पावावे असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *