ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.386

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३८६

सद्गुरू निवृत्ति दिसतो घनदाट । सुषुप्तीचा घांट वेधतांची ॥१॥ आत्मा माया शिव शक्तीचे हे रूप । दिसतें चिद्रूप अविनाश ॥२॥ ज्ञानदेव चढे ऐसी वाट देख । आकाशी असे मुख तिचें कैसें ॥३॥

अर्थ:-

ज्ञानघन श्रीगुरू निवृत्तिरायांचे दर्शन सुषुप्तीचा घांट ओलांडल्या नंतर होते. निवृत्तीराय म्हणजेच ब्रह्म आहे. ते अविनाशी, चिद्रूप, आत्मा, माया, शिवशक्ती यांचे ही रूप तेच आहे. आम्ही या वाटेने गेलो त्या आश्चर्याची गोष्ट ही की तिचे तोंड आकाशाकडे आहे. याचा अर्थ ही वाट कठीण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *