दिवाळी दिपावली लक्ष्मीपूजन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Diwali 2022: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत… तिथी योग मुहूर्त सर्वकाही जाणून घ्या

Deepawali 2022 Date : अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, दिवाळीची खरेदी यांच्या योजनांना सुरुवातही झालेली आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? पाहूया…

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

Diwali 2022
दिवाळी २०२२

सन २०२२ मधील दीपोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मध्यावर दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, दिवाळीची खरेदी यांच्या योजनांना सुरुवातही झालेली आहे. साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. शास्त्रांनुसार, अश्विन अमावास्येला लक्ष्मी देवीच्या पूजनासह गणपती आणि कुबेराची पूजा करावी, असे सांगितले जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? पाहूया…

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

सन २०२२ मधील दिवाळी

  • वसुबारस : निज अश्विन कृष्ण एकादशी – शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०२२.
  • धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण द्वादशी- रविवार, २३ ऑक्टोबर २०२२.
  • नरक चतुर्दशी : निज अश्विन कृष्ण चतुर्दशी – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.
  • लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.
  • बलिप्रतिपदा/पाडवा,वहीपूजन : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.
  • भाऊबीज : कार्तिक शुद्ध प्रतिपदा- बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.

धनतेरस २२ ला की २३ ला
यावर्षी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६ वाजून ०३ मिनिटापासून अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी साजरी केली जात आहे ज्याला धनत्रयोदशी म्हणतात. त्याच दिवशी यमदीपही काढण्यात येईल. आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटा पर्यंत राहील. यामुळे धनतेरस २२ ऑक्टोबर संध्याकाळपासून ते दुसऱ्या दिवशी २३ ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत साजरा केला जाऊ शकतो. धनतेरस तिथीच्या फेरबदलामुळे धनत्रयोदशीचे व्रत ठेवणाऱ्यांनी किंवा प्रदोष व्रत ठेवणाऱ्यांनी २३ ऑक्टोबरला उपवास ठेवावा असे सांगितले जात आहे. कारण २३ तारखेला संध्याकाळी त्रयोदशी तिथी व्याप्त राहील. शास्त्रानुसार याच दिवशी व्रत ठेवणे शुभ ठरेल.

चतुर्दशी आणि अमावस्या यांचा योग

यावेळी दिवाळी आणि छोटी दिवाळी हा सण एकत्र साजरा केला जाणार आहे. साधारणपणे छोटी दिवाळी दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा चतुर्दशी आणि अमावस्या या दोन्ही सणांचा असा योग आला आहे, त्यामुळे हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबरला साजरे केले जाणार आहेत. तर यावेळी २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी पडणार आहे.

दिवाळी तिथी मुहूर्त

या वर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशी तिथी २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होते आणि २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ०५ वाजून २८ मिनिटांनी संपते. त्यानंतर २४ रोजी सायंकाळी ०५ वाजून २८ वाजल्यापासून अमावस्या तिथी सुरू होत असून ती २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी म्हणजे प्रदोष कालावधीपूर्वी अमावस्या समाप्त होत आहे. त्यामुळे दिवाळीचा सण या दिवशी साजरा केला जाणार नसून एक दिवस आधी साजरा केला जाईल.

वास्तविक, दिवाळीचा नियम असा आहे की, ज्या दिवशी संध्याकाळी आणि मध्यरात्री अमावस्या असते, त्याच दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जातो. या नियमामुळे २४ ऑक्टोबरला दिवाळी असणार आहे. दुसरीकडे २५ तारखेला अमावस्या असल्याने अमावास्येशी संबंधित पूजा २५ तारखेला होणार आहे. तर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण देखील असणार आहे.

चतुर्दशी तिथी २३ ऑक्टोबरलाच संध्याकाळी ०६ वाजून ०४ वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ०५ वाजून २८ मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी हा सण २४ ऑक्टोबर रोजी उदय तिथीला साजरा केला जाणार आहे.

Diwali 2022 : दिवाळीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या मग साजरी करा महादीपावली, लक्ष्मीमाता होईल प्रसन्न

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

सन २०२२ मधील दिवाळी
वसुबारस : निज अश्विन कृष्ण एकादशी – शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०२२.

धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण द्वादशी- रविवार, २३ ऑक्टोबर २०२२.

नरक चतुर्दशी : निज अश्विन कृष्ण चतुर्दशी – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.

लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२.

बलिप्रतिपदा/पाडवा,वहीपूजन : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.

भाऊबीज : कार्तिक शुद्ध प्रतिपदा- बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.

दिवाळीचा सण उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनोत्रयोदशी. यंदा धनोत्रयोदशी ही दोन दिवस साजरी करावी लागणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या भागात 22 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी होणार आहे.

तर सोलापूर, नागपूर, अमरावती आणि विदर्भ भागात 23 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी साजरी करावी लागणार आहे. सायंकाळी 06.03 नंतर सूर्यास्त असलेल्या गावात 22 ऑक्टोबरला तर त्याआधी सूर्यास्त असलेल्या गावात 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि प्रदोष असल्याची माहिती दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते (Mohan Date) यांनी दिली. शास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी यासंदर्भात पंचागकर्ते मोहन दाते यांनी काय माहिती दिली पाहूयात.

या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)….मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते

(श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका…नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे….पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा….जप झाल्यानंतर प्रार्थना करावी.

आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा….ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर “#श्रीसुक्त” किंवा “#महालक्ष्मी_अष्टक” यांचेही पाठ करावेत ही विनंती.@ सचिन मधुकर परांजपे

(महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत)

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)@सचिन मधुकर परांजपे

१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)

२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:

३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात

४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा

५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:

६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:

७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे

….तर मित्रांनो अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. पोस्ट पब्लिक पोस्ट आहे त्यामुळे कॉपी-पेस्ट न करता सबंध पोस्ट
लेखकाचे नावासहच शेअर करा. आपल्या सर्व बंधुभगिनींना, आप्तेष्टांना मार्गदर्शन होवुन सर्वत्र समृध्दीचे, समधानाचे वातावरण पसरावे हीच श्रीलक्ष्मीनारायणांच्या चरणी प्रार्थना….

दिवाळीतील महत्वाचे सण तथा दिवस

Page: 1 2
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *