बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपण आजही ‘इडा पीडा टळो बळी चे राज्य येवो’ असे म्हणतो बळीराजाच्या राज्यात जर जनता इतकी खुश होती सुखी होती तर वामनाने बळीराजाला का मारले?
वामनाने बळी राजाला मारले नाही तर त्याला पाताळाचे स्वामित्व बहाल करून स्वतः विष्णू बळीच्या रक्षणासाठी द्वारपाल म्हणून उभे आहेत.

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

याबाद्दल पौराणिक आख्यायिका जाणून घेऊ.
बळीराजा हा भक्त प्रल्हाद याचा नातु आणि विरोचन याचा पुत्र होता. पौराणिक संदर्भानुसार यांचा सर्वांचा जन्म हा दैत्य कुळात झाला होता.

पौराणिक आख्यायिका नुसार सर्व दैत्य हे कठोर तपस्वी होते. देव आणि दैत्य यांच्यातील फरक म्हणजे, दैत्य हे त्यांना मिळलेल्या वरामुळे ऋषी – मुनी यांच्यावर अत्याचार करायचे. त्यांना सळो की पळो करून सोडायचे. तपाच्या सामर्थ्यावर ते देवांचा राजा इंद्र हे पद सुध्दा मिळविण्याची शक्यता निर्माण होत असे. तेव्हा मात्र देवांना पण भीती वाटायची. जेव्हा देव संकटात येत, तेव्हा भगवान विष्णु अवतार घेऊन त्या संकटाचे निवारण करीत होते.

चित्रस्रोत : गुगल

अशीच काही घटना राजा बळी याच्याबाबत पण घडली होती. त्याला इंद्रपद मिळवून अमरपूरीत राजा व्हायची अभिलाषा होती. तेव्हा दैत्य गुरू शुक्राचार्य यांनी शंभर यज्ञ करून अमाप दान – धर्म करण्याचा सल्ला दिला. त्या यज्ञाचे पौरोहित्य स्वतः दैत्यगुरु शुक्राचार्य करीत होते. बळीने ९९ यज्ञ पुर्ण केले आणि इंद्रपद मिळण्यासाठी फक्त एक यज्ञ कमी होता.

स्वर्गातून देवांना बळीची ज्ञान आणि दानशूरता पाहुन आता इंद्रपद बळीला मिळणार म्हणून भीती निर्माण झाली. इंद्रासह सर्व देव भगवान विष्णु कडे गेले. त्यांनी विष्णुला हा संकल्प पुर्ण होऊ देऊ नका, काही करून यात विघ्न आणा अशी प्रार्थना केली.

यानंतर महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू भाद्रपद शुद्ध द्वादशीला बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे वामन असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीन, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञा स्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. जेव्हा बटू अवतारात स्वतः विष्णु आहेत, ते संकल्प सोडायला लावतात. तेव्हा शुक्राचार्य स्वतः झारीच्या तोटीत जाऊन बसतात. पाणी पडत नाही, म्हणून बळी दर्भाची काडी घेऊन झारीच्या तोटीत घालतो. तेव्हा शुक्राचार्य यांचा एक डोळा फुटतो, व ते रक्त बंबाळ होऊन तोटीतून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना “एकाक्ष” पण म्हणू लागले.

शेवटी संकल्प सोडुन बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.

सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव रूपातील विष्णु भगवान प्रसन्न होतात. त्याला वर देतात की तुझ्या या दानशूरपणा बद्दल तुझी प्रत्येक कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पुजा होऊन तुझ्या सारख्या वैभवाची लोक मागणी करतील. कारण श्रीविष्णू बळीराजाला पाताळ लोकाचे स्वामीत्व बहाल करतात आणि स्वतः बळीच्या राज्यावर कोणतेही विघ्न येऊ न देण्याचे वचन देऊन स्वतः द्वारपालपद स्वीकारतात.

सांगण्याचे तात्पर्य असे की विश्वाचा मालक, कर्ता बळी राजाचा द्वारपाल होऊन आज पण तिष्ठत आहे, या पेक्षा दुसरे राज्य वैभव नाही….!
सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

बळीराजाचे साम्राज्य खूप मोठे होते. बाली बेटाचा आणि बळी नावाचा काय संबंध आहे का?
बळी ह्या नावाचा आणि बाली ह्या बेटाचा काहीच संबंध नाही. बळीराजाचे साम्राज्य खुप मोठे होते, यालाही काही आधार नाही. भरत हा पहिला सम्राट होता ज्यांचे.साम्राज्य समुद्र किनारा आहे तो पर्यंत होते असे महाभारतात उल्लेख आढळतो. परंतु कोणत्या समुद्र किनारी ,? पश्चिम किनरपट्टी पासून पूर्वे पर्यंत, की केवळ गुजराथ च्या किनाऱ्यापर्यंत ? याच्या नावावरून आपल्या भूमीला भारत हे नाव मिळाले. म्हणजे बळीचे राज्य सागर सिमे पर्यंत नसावे.ते कोठपर्यंत होते, गांधार पासून असम पर्यंत होते की अजून कोठपर्यंत यांचा काही उल्लेख आढळत. नाही. काही ब्रिग्रेडी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी ठरवून, वामनाला ब्राम्हणांचा प्रतिनिधी ठरवू पाहतात. याला अर्थातच काहीही आधार नाही. धर्मावर कावडीचा विश्वास नसणारे डावे विचारवंत मात्र बळीला समतेचा ध्वज वाहक आणि वामन विषमतेचा अग्रणी ठरवितात. म्हणुन शेतकऱ्यांचा उल्लेख बळीराजा असा केला जातो.

दिवाळीची संपूर्ण माहिती पाहा.

प्रश्न : – वामनाने बळीराजाला का मारलं?
उत्तर : – वामनाने बळी राजास मारले नाही.


दैत्यराज बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू तथा विरोचन दैत्याचा मुलगा होता. विरोचनानंतर बळी दैत्यांचा राजा झाला. दैत्य म्हणजे दिती आणि कश्यप ऋषी यांच्या हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू यांच्यासारख्या संतती त्यांचे वंशज, प्रजाजन आदि आणि म्हणूनच दिती-दैत्य असे नाव पडले. हे दैत्य जरी क्रूर स्वभावाचे असले तरीही भक्त प्रल्हाद आणि बळी यांच्यासारखे सज्जनही या कुळात जन्मले.

दैत्य लोकं नेहमीच देवांना, सज्जनांना त्रास द्यायचे, बळीच्या नेतृत्वात या दैत्यांचे सामर्थ्य वाढून त्यांनी त्रिलोक पादाक्रांत केले होते. बळी राजा जरी दैत्यांप्रमाणे दुराचारी नसला तरीही त्याचे दैत्यप्रजाजन मात्र इतरांना त्रास द्यायचेच. तेव्हा सर्व देवांना या दैत्यांनी त्राही भगवन करून सोडल्यावर हे देवगण श्री विष्णूंना शरण आले.

बळी राजा हा दानी आणि सदाचारी तर होताच पण तोही आजोबांप्रमाणे विष्णूंचा भक्त होता. शिवाय प्रल्हादाला विष्णूंने दिलेल्या वचनानुसार ते त्याच्या वंशजाला यमसदनी पाठवू शकत नव्हते म्हणून त्यांनी युक्ती काढून बळीराजा इंद्रापदासाठी शंभरावा यज्ञ करत असताना तेथे वामनाने रूप घेऊन आगमन केले आणि त्याला ३ पावलं भूमी मागितली. गुरू शुक्राचार्यांचा विरोध पत्करून बळी या बटूब्राह्मणास दान द्यायला सिद्ध झाला. यात वामनमूर्तीरुपी विष्णूंने अडीच पावलातच त्रिलोक व्यापून अर्धे उरलेले पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले, जीवे मारले नाही.

पण हे दान देताना बळीनेही वचन घेऊन विष्णूंना पाताळात आपला द्वारपाल म्हणून बोलावून घेतले. आता विष्णू वैकुंठ सोडून पाताळात अडकलेले बघून लक्ष्मीदेवी चिंताग्रस्त झाल्या. तेव्हा लक्ष्मीने पाताळात जाऊन बळीराजास राखी बांधली आणि आपल्या पतीस सोडवले. यामुळे बळीराजाची कीर्ती तथा सामर्थ्य अजून वाढले. त्यामुळेच सप्त चिरंजीवांपैकी एक दैत्यराज बळी हा पुढील मन्वंतरात देवाधिपती इंद्रापदाला पोहोचेल असे म्हटले जाते.

“इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो” असे का बोलले जाते? हा बळीराजा कोण होता? बळीराजाचा संपूर्ण इतिहास काय आहे?

पुराणकथांमध्ये महाबळी हा दैत्यांचा राजा आणि भक्त प्रह्लादाचा नातू होता. त्याच्या वडिलाचे नाव विरोचन आणि आईचे नाव देवांबा होते. तो अष्टचिरंजीवींपैकी एक असून दक्षिण भारतातील बहुतेक लोकपरंपरांमध्ये त्याला एक आदर्श राजा मानले गेले आहे. सद्वर्तनी, न्यायप्रिय, आणि कर्तव्यदक्ष बळीराजा प्रजाहितचिंतक शासक तर होताच, शिवाय महान विष्णूभक्तदेखील होता. तामिळनाडूतील महाबळीपुरम् ही त्याची राजधानी होती असे मानले जाते.

त्याने इंद्राला पराभूत करून स्वर्गाचे आणि पृथ्वीचे राज्य मिळविले होते, पण देवतांच्या मत्सरापायी त्याला पाताळात जावे लागले. त्याची कीर्ती आणि सामर्थ्य पाहून घाबरलेल्या देवतांनी विष्णूकडे याचना केली. श्रीविष्णूने आपल्याच भक्ताला मारण्यास नकार दिला, शिवाय बळी नीतीवंत राजा होता.

पण देवतांच्या आग्रहास्तव श्रीविष्णू वामनावतार घेऊन महाबळीच्या यज्ञात उपस्थित झाले. त्यांनी बळीकडे तीन पाऊले भूमीचे दान मागितले जे बळीने सहर्ष स्वीकारले. पण नंतर श्रीविष्णूने विराटरूप होऊन केवळ दोन पाऊलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा मागितली असता बळीराजाने आपले डोके पुढे केले.
श्रीविष्णूने त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठविले आणि तिथले राज्य दिले. तरी, बळीने वर्षातून एकदा आपले मूळ राज्य पाहण्यासाठी पृथ्वीवर येण्याची अनुमती मागितली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या बलिप्रतिपदेला (आणि मल्याळी परंपरेनुसार ओणम् ह्या सणाला) बळीराजा पाताळातून आपले राज्य पाहण्यासाठी येतो अशी मान्यता आहे.

महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही बळीराजा अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय आहे. केरळात ओणम् दिवशी महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या ‘पूकळम्’ (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याची आणि दिवे लावण्याची पद्धत आहे. त्याच्या गौरवार्थ गीते म्हणण्याचीही प्रथा आहे.

जेव्हा बळीराजाचे राज्य होते तेव्हा मनुष्यांमध्ये भेद नव्हता..
जगणे सुगीचे आणि दिवस आनंदाचे होते,
नैसर्गिक आपत्ती नव्हत्या आणि रोगराई नव्हती,
लहान मुलांचे मृत्यू होत नसत, स्त्रिया सुरक्षित आणि आनंदी होत्या ।
चोरी, फसवणूक नव्हती आणि कोणीच असत्य बोलत नसे,
राज्य समृद्ध होते आणि पीक-पाणी भरपूर होते ।
वेदपठण, यज्ञादिकर्म नित्य होत असत आणि नाट्य-संगीत कलांना योग्य महत्व होते ।
जेव्हा बळीराजाचे राज्य होते तेव्हा मनुष्यांमध्ये भेद नव्हता..
संदर्भ:

मल्याळम् लोकगीत- मावेली नाडु वाणीडुम् कालम्
कळिकाळ संपल्यानंतर बळीराजा पाताळ सोडून पुनः एकदा स्वर्गाचे आणि पृथ्वीचे राज्य करील अशी मान्यता आहे.

राजा बळी हा भक्त शिरोमणी प्रहलादाचा नातू आणि विरोचानाचा मुलगा होता. समुद्र मंथन त्याचे नेतृत्वाखाली असुरणी भाग घेतला होता पण तेव्हा मोहिनी रुपात नारायणाने त्यांच्याशी छळ केला आणि अमृत देवांमध्ये वितरीत केले.

त्यामुळे देवासुर संग्राम झाला आणि बळी त्या युद्धात कामी आले. दैत्य गुरू शुक्रचाऱ्याने संजीवनी मंत्रद्वारे मृत असुरांना जीवन दन दिला. त्या नंतर शिक्रचाऱ्याने असुरांच्या उद्धारासाठी आणि आपल्याबरोबर झालेल्या छळ वर प्रतिशोध घेण्यासाठी राजा बळी कडून १०० अश्वमेध यज्ञ करून घेतले. शंभरावा अश्वमेध यज्ञाचा संकल्प करताना नारायणाने वामन अवतार घेऊन बलिकडून तीन पग भूमी दानात मागितले त्यात त्याने दोन पागत स्वर्ग पृथ्वी मापून घेतली.

तीसऱ्याची स्थान जेव्हा ते राजा बलिकडे मागितले तेव्हा त्याने आपल्या शिरावर ठेवण्याची विनंती केली म्हणून हरीच्या चरण त्यांच्या शिरावर लागल्यामुळे राजा बळी चिरंजीवी झाले, त्याच बरोबर त्यांना त्या अपूर्ण यज्ञाचा फळ म्हणून इंद्र पदवी पुढच्या मंवंनतरात लाभेल असा वरदान मिळाले,

आणि त्या त्यांच्या राज्यात एक दिवशी भेट देऊ शकता. तो केरळ मध्ये ओणम म्हणून साजरा केला जातो आणि इतर प्रांतात बळी प्रतिपदा म्हणून साजरा करण्यात येतो. बळी राजा हा धर्मात्मा असल्यामुळे त्याचा देवाला केलेलं संपूर्ण समर्पणामुळे “इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो” असे बोलले जाते..

दिवाळीतील महत्वाचे सण तथा दिवस

Page: 1 2
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *