ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.758

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५८

ऋणाचेनि मिसें निर्गुण आलें आपैसें । तेणें मज सर्वस्वे ठकियेलें ॥१॥ घेऊनि गेला माझें धन । केलें पैं निर्वाण मन देखा ॥२॥ त्यासी वोळखिना अनोळखी । दृश्य ना अदृश्य ऋण म्यां सादृश्य दिधलें देखा ॥३॥ निवृत्तिप्रसादें इतुकें पैं जालें । रखुमादेविवरू विठ्ठलें मज गोवियेलें गे माये ॥४॥

अर्थ:-

सगुण भक्तिच्या ऋणाने निर्गुण माझ्या हातांत आपोआप आले. आणि निर्गुण स्वरूपाच्या योगाने माझा देहभाव नाहीसा करुन मला ठकवले. माझे भक्तिचे धन घेऊन गेला. म्हणजे परमात्मस्वरूपासी ऐक्य झाल्यावर कोणी व कोणाची भक्ति करावयाची? अशा रितीने निर्वाण म्हणजे मोक्ष सौख्य मनाला प्राप्त झाले. आतां त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ओळखही नाही व अनोळखही नाही. म्हणजे त्याच्याविषयी ज्ञानही नाही व अज्ञानही नाही.दृश्य, अदृश्य, साम्य, ऋण हे सर्वभाव त्याच्या ठिकाणी नाहीसे झाले. श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी मला आपल्या निर्गुण स्वरूपांत गोवून टाकले असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *