ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.604

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०४

अवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें । अवघ्या हृदयीं अरुप धरिलें ॥१॥ अवघेपणे मी त्याचीच जालें । तेंचि पावलें तदाकारें ॥२॥ कांही नसोनिया कांहीं एक जाला । अवघाचि शोखिला ब्रह्मरसु ॥३॥ रखुमादेविवरु अवघाचि धरिला । अवघाचि गिळिला अवधेपणें ॥४॥

अर्थ:-

माझ्या बाहुनी ते निराकार आकाशरुपी ब्रह्म मी कवळिले. आणि तेच रुप हृदयात धरुन ठेवले. सर्व प्रकाराने मी त्याचीच झाले. ब्रह्मरुप झाले.कांही एक न होता मी तद्रूप होऊन ब्रह्मरस सेवन केला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना मी पूर्ण स्वाधीन केल्यामुळे वेगळा ठेवला नाही. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *