सार्थ अमृतानुभव अध्याय ११ ला, ओवी १५ ते ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी १ ते ५

प्रमोद कुलकर्णी सार्थ अमृतानुभव सर्व भाग: कैसा मेळु आला गोडीया
। दोघे न माती जगी इये । कीं परमाणुमाजी उवाये । मांडली आहाती ।। ओ 11


अर्थ –शिव-शक्ती यांचा एकमेकात मिसळण्याचा व अलग होण्याचा सुखद खेळ चालला आहे, की त्यामुळे त्यांनीच निर्माण केलेले जग त्यांना अपुरे पडते. जगाच्या अनुरुत भरूनसुद्धा हे शिल्लक राहतात. स्वतः निर्माण केलेली आकृती स्वतः पेक्षाही मोठी होऊ शकते.

शब्दार्थ मेळु = मेळ संगम, न माती = मान्य करीत नाही, भावत नाही, उवाये = उगवणे

विवेचन –शिव-शक्ती यांचा कायम एकत्र येण्याचा व अलग होण्याचा सुखद खेळ चालला आहे, अर्थात ह्या खेळाचाही ते आनंद घेतात.

त्यामुळेच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय ह्या अवस्थांमधून जात पूर्णत्वाकडे धाव ते घेत आहे. पण संपूर्ण जग हे त्या शिव शक्तीचीच निर्मिती असल्याने सर्व चराचरात नव्हे तर सर्व अनुरेणूंत व्यापुनही ते विश्वापेक्षा मोठे आहेत. कारण जग ही त्यांचीच निर्मिती असल्याने ते जगापेक्षा मोठे आहेत. येथे आकारमान पहायचे नाही. पहा जगाचे अस्तित्व केंव्हा समजेल? जेंव्हा देह व प्राण, शिव-शक्ती एकत्र असतील, त्या दोघांचे मिलन झालेले असते तेंव्हाच ह्या शिव-शक्तीच्या आनंद आपण उपभोगू शकतो. अन्यथा जगाचा आपण कसा अनुभव घेणार? त्याअर्थाने शिव-शक्ती हे जगापेक्षाही मोठे व जगापेक्षाही जास्त मौल्यवान आहे, हे ज्याला समजले तोच हा आनंद सुध्दा उपभोगू शकतो.

जिही एकएकावीण । न कीजे तृणाचेही निर्माण । जिये दोघे जिऊ प्राण । जियां दोघा ।। ओ 12

अर्थ –शिव-शक्ती स्वतः एकमेकांच्या शिवाय साधे तृण, गवत सुद्धा निर्माण करू शकत नाही. हे दोघेही परस्परांचे प्राणच आहेत.
शब्दार्थ तृण =गवत, जिऊ = जीव,शरीर

विवेचन –कोणतीही दृश्य वस्तू तयार व्हायची असेल तर त्यासाठी शिव आणि शक्ती, देह आणि प्राण ह्यांचे एकत्रीकरण व्हावे लागेल. वनस्पती असो की प्राणी मात्र,सूक्ष्म विचार केला तर निर्जीव वाटणाऱ्या वस्तू सुद्धा निर्माण होण्यासाठी ह्या दोघांची गरज समसमान आहे. त्यामुळेच ते परस्परांचे प्राणच आहेत. कोणतीही निर्जीव वस्तू तयार करण्यासाठी सुध्दा मानवाची गरज आहेच म्हणजेच एका अर्थाने शिव-शक्ती तेथे आहेच ना?

उदाहरण द्यायचे तर मनुष्य देहाचे घेता येईल. श्याम नावाची एक व्यक्ती मृत्यू पावली की आपण म्हणतो श्याम गेला. श्यामचा देह तर समोरच असतो तरीही ती व्यक्ती गेली सारे म्हणतात, का? तर त्या व्यक्तीला त्या देहाला चालविणारी, त्या देहाचे सर्व व्यवहार सांभाळणारा प्राण गेला. म्हणजेच श्याम म्हणजे प्राण नाही का? ही प्राणशक्ती ह्या जगातून कधीही नष्ट होत नाही पण ती शक्ती त्या देहातून बाहेर पडतो. ह्या शक्तीचा व देहाचा संयोग असल्याशिवाय जीवसृष्टी असंभवनीय आहे. देहाशिवाय प्राण, प्राणाशिवाय देह राहूच शकत नाही. त्यामुळेच ते एकमेकांचे प्राण झाले आहेत. ज्याला मोक्षाप्रत जायचे असेल त्याने ह्यातील भेद व साम्य लक्षांत घेतले पाहिजे. मी मूळ चैतन्य आहे मग देहाचे चोचले किरी करायचे? देहाला किती कष्ट द्यायचे? ह्याचा विचार केला पाहिजे.

घरवाते मोटकी दोघे । जै गोसावी सेजे रिघे ।
तै दंपती पणे जागे । स्वामिनी जै ।। ओ 13

अर्थ –संपूर्ण संसार विश्व म्हणजे शिव-शक्ती होय. शिव जेंव्हा सुप्तावस्थेत किंवा ध्यान अवस्थेत असतात, तेंव्हा संसार चालवण्यासाठी शक्तीला जागृत राहावे लागते.
शब्दार्थ घरवात = घरदार, संसार, दंपती = पती-पत्नी
विवेचन –विश्वाची निर्मिती ही शिव-शक्ती पासून ,झाली तरी हे दोघेही वेगवेगळे आणि परस्परावलंबी आहेत हे आपण अनुभवतो .

ह्यातील शिव हे ध्यान धारणा करतात. देह थकल्या नंतर विश्रांती घेतो, झोपतो पण शक्ती मात्र अविश्रांत जागृत असते, जागी असते. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता आपल्या पतीची सेवा करते पति झोपी जाई पर्यंत जागी राहते त्याप्रमाणे देह झोपी गेला तरी सुद्धा प्राणशक्ती सदैव कार्यरत असते. देह ध्यान अवस्थेत असला तरीही प्राण चालूच राहतात, क्रियाशील असतात. इतकेच नव्हे तर अगदी समाधी अवस्थेत पोहचलेल्या देहांत सुध्दा प्राणशक्तीचे प्रवाहन चालूच असते. ज्या प्रमाणे शेषशायी भगवान निद्रिस्त होतात पण लक्ष्मी माता या जाग्याच असतात, तद्वत देह विश्रांती घेतो,ध्यान धारणा करतो, समाधी अवस्था प्राप्त करतो पण शक्ती आपले कार्य चालूच ठेवते. ह्या शक्तीला देहातील चैतन्य म्हणतात. ह्या शक्तीला काहीही म्हणा,प्राण,आत्मा, चैतन्य, श्वास, अल्लाकी रुह, होली लाईट, पण ती प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असतेच. ती नुसती असतेच असे नाही तर ती क्रियाशील सुध्दा असते. योग्य गुरू लाभले तर ह्या क्रियाशील शक्तीला एक मार्गदर्शक लाभतो. ह्या शक्तीला योग्य दिशा मिळते व तिचा मोक्षाप्रति प्रवास सुरु होतो. भारतीय अध्यात्म शास्त्राचे वैशिष्ट्य आहे. ह्या अध्यात्मात देहभावाकडून देवभावाकडे जाणे अपेक्षित आहे. ही विद्या सर्वांसाठी आहे. कारण देह व प्राण सर्वांठाई आहे, त्यामुळे जात, धर्म, लिंग, वय, वर्ण, उपासना पद्धती याचा कोणताही भेद न करता, कोणतीही व्यक्ती हा प्रवास करू शकतो. त्यासाठी समर्थ व ज्ञानी श्रीगुरुंचे मार्गदर्शन लाभले पाहिजे.

जया दोघामाजी एखादे । विपाये उमजले होय निदे ।
तरी घरवाते मिळोनि नुसुधे । काही न करी ।। ओ 14

अर्थ –शिव-शक्ती ह्या दोघांनाही मूळ चैतन्याचे ज्ञान झाले तर निर्माण झालेला सारा संसार, शिव-शक्ती ह्यासुद्धा चैतन्यात विलीन होऊन निष्क्रिय बनतात.
शब्दार्थ विपाये = कदाचित, निदे = विस्मरणातून, झोपेतून, नुसुधे = एकटेपणाने, घरवाते = संसारात
विवेचन –देह किंवा प्राणशक्ती ह्या पैकी कोणा एकालाही चैतन्य मूळ चैतन्याचे जर ज्ञान झाले तर देह प्राण एकवटून मूळ चैतन्यात विलीन होतात. ह्याचे उदाहरण द्यायचे तर संत तुकाराम महाराजांचे घेता येईल. त्यांच्यातील प्राणशक्तीला जेंव्हा चैतन्याचे ज्ञान झाले तेंव्हा देह निष्क्रिय झाला व ते सदेह वैकुंठास गेले. ज्ञानदेव स्वतःच्या पायांनी चालत समाधीला गेले. हा काही निव्वळ योगायोग नाही. जेंव्हा देह किंवा प्राणशक्ती ह्या दोघांपैकी एकाला चैतन्याची, प्राणाची ओळख पटते, त्याचे ज्ञान होते तेंव्हा अनामिक निश्चल आनंद अनुभवायला मिळतो, पण त्याचे शब्दांत वर्णन केवळ अशक्य आहे. हे कसे घडते हे सांगणे अवघड आहे कारण तो अनुभवायचा भाग आहे.


एक अनुभव आहे एकदा रात्री एक दीड चा सुमार होता. झोपेत लघु शंकेसाठी उठलो. पाय एका विंचवावर पडला, तो दुखावला गेला. त्याने त्याचा धर्म पाळला जोरदार चावा घेतला. इतका की त्याने पाय सोडलाच नाही. लाईट लावला तेंव्हा कळले पायाला विंचवाने धरले आहे. दोन चार मिनिटातच विष पायातून वर चढू लागले. भयंकर वेदना होऊ लागल्या त्याच वेळी श्रीगुरूंचा स्पष्ट आवाज कानी आला “साधनेस बैस.” विंचवाचे विष आता खूपच चढले होते. पण गुरू आदेश मानून देवघरात जाऊन बसलो, आणि काय आश्चर्य!! देहाचा विसर पडला. देह चैतन्यात विरुन गेला. देहाचं भान नाही तर पाय आणि पायाच्या वेदना कश्या जाणवणार? चार पाच तास साधन झाले नंतर देहभान आले. तोवर वेदना सहन करता येतील इतक्या कमी झाल्या होत्या. ही गुरूकृपा व देहाचे चैतन्यात विरून जाणे होय.

दोहो अंगाची अटणी । गिवसित आहाती एकपणी |
झाली भेदाचिया वाहाणी । आधाधी जिये ।। ओ 15

अर्थ — ह्या दोघांची (शिव-शक्तीची) निरंतर चाललेली हालचाल आपल्या अलग झालेल्या अंगाची अटणी करून परत एकत्व शोधण्यासाठी असते. पण चैतन्य जीवनापासून अलग झाल्यामुळेच ह्यांची दोन भागांत अलग अलग हालचाल चालू असते.
शब्दार्थ वाहाणी = प्रवाह, आधाधी – अर्ध
विवेचन — शिव-शक्ती, जीव-प्राण हे एकमेकांपासून भिन्न आहेत व त्यांच्या हालचाली सुद्धा भिन्न आहेत.

आपण झोपल्यावर देह,शरीर शांत असते. याची बाह्य हालचाल थांबलेली असते पण प्राणांची मात्र अविरत हालचाल, येणे-जाणे चालूच असते, त्याचे अवगमन, वहन थांबत नाही. शरीराच्या हालचाली वेगवेगळ्या प्रकारच्या चालू असल्या तरीही त्यांचे अंतिम ध्येय शांती, सुख, समाधान मिळवणं हेच असते. आपण अन्न ग्रहण करतो, पाणी पितो, निद्रा घेतो ही सर्व कामे शरिर संवर्धनासाठी करतो. काम करतो, व्यापार उदीम करतो ते पैसे मिळवण्यासाठीच. हे सुध्दा एका अर्थाने शरीर संवर्धन करण्यासाठी पूरक म्हणूनच करतो. पूजा, पाठ, यज्ञ, जप-तप हे सारे मन:शांती मिळवण्यासाठी करतो. या साऱ्या गोष्टी आपण सुख समाधान मिळावे म्हणून करतो. हे सारे आपण शक्तीच्या सहाय्याने करतो व त्याचं अंतिम ध्येय मोक्ष मिळवणे हेच असते ना? त्यासाठी शारीरिक क्रिया व शक्तीच्या क्रिया यांचे एकत्व झाले पाहिजे.

ते एकत्व येण्यासाठी हा सारा आटापिटा चालू करावा लागतो. ते जर एकमेकांपासून दूर झालेच नसते तर हा सगळा व्यापार करावा लागला नसता, तशी गरज पडली नसती. पण यांचे एकत्व येणे ही गोष्ट सहज साध्य नाही. यासाठी शक्तिपात साधन प्राप्त झाल्यावर साधकाला श्रीगुरू सांगतात ,” डोळे मिटा, शरीर ढिले सोडा, प्राणांवर, श्वासांवर लक्ष केंद्रित करून बसा. ती प्राणशक्ती जे करेल, ज्या काही क्रिया होतील त्या होऊ द्या. ज्या काही क्रिया होतील त्या आपोआप होतील. स्वतः काहीही करायचे नाही. आसन, बंध, प्राणायाम, दर्शन होतील, करायचे नाही. सरावाने एक अवस्था अशी येते की, शरीर व प्राण दोन्ही शांत होतात. मनाची तगमग शांत होते. जे काही आहे, जसे आहे त्यात समाधान, आनंद मिळू लागतो. हेच त्या दोघांचे शिव-शक्तीचे एकत्व आहे. येथे एक प्रगाढ शांतीचा अनुभव येतो. ही भाव समाधी अवस्था आहे. मुक्तीचा अनुभव, अनुभूती आहे.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ११ ते १५ समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *