विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378
अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी २१ ते २५
जे स्वामींचीया सत्ता । विण असो नेणे पतिव्रता । जियेविण सर्वकर्ता । काहीं ना जो।। ओ 21
अर्थ –शक्ती आपल्या पती आज्ञे शिवाय काहीही करत नाही. ती अन्य कोणाच्याही संपर्कात न आल्याने पतिव्रता असणे म्हणजे काय हे तिला माहितही नाही, कारण ती पतिव्रता आहेच. पती शिव, तो सर्वकर्ता, सर्वशक्तिमान असला तरीही तो शक्तीच्या आधारानेच संसार चालवतो. शक्तीने कार्य करावयाचे थांबवले तर तो शिव ही काही करू शकत नाही.
शब्दार्थ —स्वामींचीया सत्ता = स्वामीआज्ञे शिवाय
विवेचन — शक्तीस्वरूपा स्त्री ने कधीही परपुरुषाला पाहिले सुद्धा नाही. ती कधीच शिवा शिवाय अन्य कोणाच्याही संपर्कात आली नाही . ती केवळ देहात्मक शिवाच्या आधारानेच आहे. ती त्याची अंधार्गी झाली आहे, किंबहुना ती दोघे एकमेकांची सर्व भौमसत्ता होऊन राहिली आहेत. त्यामुळे देह सुद्धा शक्ती शिवाय काहीही करत नाही किंवा देहाशिवाय प्राणही काही करत नाही. देहांत प्राण आहेत तोपर्यंत देह कार्यरत रहातो, तसेच ती प्राण शक्ती सुध्दा जगाचे व्यवहार त्या देहाच्या माध्यमातून करू शकते.
देहाचे खरे सौंदर्य ही प्राण शक्ती आहे, चैतन्य आहे. ज्या प्रमाणे पतिव्रता नारी घरचा उंबरठा न ओलांडता सर्व व्यवहार घरातून करते, पतीच्या माध्यमातून करते, त्याचप्रमाणे प्राणशक्ती सुध्दा देहांत राहूनच आपले विश्व व्यापक कार्य करीत असते, इतकी त्यांची एकरूपता झाली आहे. केवळ इंद्रियामुळे आमचे कार्य चालते असे नाही तर त्या इंद्रियांना चालना देणारी प्राण शक्ती सुद्धा तितकीच महत्त्वाची व अत्यावश्यक आहे. पहा डोळे पाहण्याचं कार्य करतात पण केंव्हा? तर त्या शरीरात प्राण आहेत तो पर्यंत. प्राण गेलेली व्यक्ती पाहू शकत नाही. तेच डोळे एखाद्या अंध व्यक्तीला दिले तर ती मात्र पाहू शकते. हिच अंध व्यक्ती प्राण असून सुद्धा डोळ्याच्या अभावी पाहू शकत नव्हती. याचाच अर्थ केवळ डोळे पाहू शकत नाहीत किंवा केवळ प्राणही पाहू शकत नाहीत. पण जेंव्हा हे दोन्हीही एकत्र येतात व एकत्रितपणे कार्य करतात तेंव्हाच पाहण्याचे कार्य संपन्न होते पूर्ण होते. म्हणूच अध्यात्मात केवळ देह भोगाला महत्त्व न देता प्राणशक्तीला जाणून घेणे, प्राणांचे उत्थान व त्यांचे संवर्धन ह्याला विशेष महत्व दिले गेले आहे. जाणकार श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास, ही साधना केली पाहिजे.
जे स्वामींचीया सत्ता । विण असो नेणे पतिव्रता । जियेविण सर्वकर्ता । काहीं ना जो।। ओ 21
अर्थ — शक्ती आपल्या पती आज्ञे शिवाय काहीही करत नाही. ती अन्य कोणाच्याही संपर्कात न आल्याने पतिव्रता असणे म्हणजे काय हे तिला माहितही नाही, कारण ती पतिव्रता आहेच. पती शिव, तो सर्वकर्ता, सर्वशक्तिमान असला तरीही तो शक्तीच्या आधारानेच संसार चालवतो. शक्तीने कार्य करावयाचे थांबवले तर तो शिव ही काही करू शकत नाही.
शब्दार्थ — स्वामींचीया सत्ता = स्वामीआज्ञे शिवाय
विवेचन — शक्तीस्वरूपा स्त्री ने कधीही परपुरुषाला पाहिले सुद्धा नाही. ती कधीच शिवा शिवाय अन्य कोणाच्याही संपर्कात आली नाही . ती केवळ देहात्मक शिवाच्या आधारानेच आहे. ती त्याची अंधार्गी झाली आहे, किंबहुना ती दोघे एकमेकांची सर्व भौमसत्ता होऊन राहिली आहेत. त्यामुळे देह सुद्धा शक्ती शिवाय काहीही करत नाही किंवा देहाशिवाय प्राणही काही करत नाही. देहांत प्राण आहेत तोपर्यंत देह कार्यरत रहातो, तसेच ती प्राण शक्ती सुध्दा जगाचे व्यवहार त्या देहाच्या माध्यमातून करू शकते.
देहाचे खरे सौंदर्य ही प्राण शक्ती आहे, चैतन्य आहे. ज्या प्रमाणे पतिव्रता नारी घरचा उंबरठा न ओलांडता सर्व व्यवहार घरातून करते, पतीच्या माध्यमातून करते, त्याचप्रमाणे प्राणशक्ती सुध्दा देहांत राहूनच आपले विश्व व्यापक कार्य करीत असते, इतकी त्यांची एकरूपता झाली आहे. केवळ इंद्रियामुळे आमचे कार्य चालते असे नाही तर त्या इंद्रियांना चालना देणारी प्राण शक्ती सुद्धा तितकीच महत्त्वाची व अत्यावश्यक आहे. पहा डोळे पाहण्याचं कार्य करतात पण केंव्हा? तर त्या शरीरात प्राण आहेत तो पर्यंत. प्राण गेलेली व्यक्ती पाहू शकत नाही. तेच डोळे एखाद्या अंध व्यक्तीला दिले तर ती मात्र पाहू शकते. हिच अंध व्यक्ती प्राण असून सुद्धा डोळ्याच्या अभावी पाहू शकत नव्हती. याचाच अर्थ केवळ डोळे पाहू शकत नाहीत किंवा केवळ प्राणही पाहू शकत नाहीत. पण जेंव्हा हे दोन्हीही एकत्र येतात व एकत्रितपणे कार्य करतात तेंव्हाच पाहण्याचे कार्य संपन्न होते पूर्ण होते. म्हणूच अध्यात्मात केवळ देह भोगाला महत्त्व न देता प्राणशक्तीला जाणून घेणे, प्राणांचे उत्थान व त्यांचे संवर्धन ह्याला विशेष महत्व दिले गेले आहे. जाणकार श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास, ही साधना केली पाहिजे.
गोडी आणि गुळू । कापूर आणि परिमळु । निवडु जाता पांगळु । निवाडु होय।। ओ 23
अर्थ — गुळापासून गोडी आणि कापुरापासून त्याच सुगंध वेगळा करता येत नाही. कोणी असे करू लागला तर त्याची गणना वेड्यात खेळू जाईल.
शब्दार्थ — निवडु =वेगवेगळे करणे , निवाडू = निवडणारा, पांगळु= अधू, वेडा
विवेचन — गुळापासून गोडी वेगळी काढणे शक्यच नाही. गुळ पाण्यात विरघळला किंवा त्याला गरम करू त्याचा पाक केला तरीही त्याची गोडी नष्ट होत नाही. कारण गूळ आणि त्याची गोडी हे अभेद्य आहेत. तसेच कापुराचेही आहे. कापूर आपला गंध आपला परिमल कधीही सोडत नाही. कापूर पाण्यात टाकला तर पाण्याला त्याचा गंध येतो पण कापराचा सुगंध त्याच्या सोबत राहतोच. कापूर जळताना सुद्धा त्याचा सुवास सर्वत्र पसरतो. कोणी म्हणाला, ” मी गुळापासून त्याची गोडी वेगळी करू शकतो, किंवा कापरा पासून त्याचा सुगंध वेगळा करू शकतो.” तर अश्या माणसाची गणना वेड्यातच होईल. कारण गुळ म्हणजेच त्याची गोडी व कापूर म्हणजेच त्याचा सुवास आहे. तद्वतच माणसाचे आहे त्याचा देह व प्राण यांचे एकत्रितपणे वावरणे म्हणजेच त्या माणसाचे अस्तित्व आहे.
प्रमोद म्हंटले की प्रमोदचा देह व प्राण दोन्ही आलेच. कारण प्रमोदचा फक्त देह आहे त्यात प्राण नाही चैतन्य नाही तर त्याला प्रमोद कोणी म्हणणार नाही त्याला ‘ शव ‘ म्हणतात. तसेच प्रमोद म्हणजे केवळ वायू किंवा प्राण, चैतन्य नाही. असे चैतन्य आम्ही पाहू सुद्धा शकत नाही. प्रमोद म्हंटले की आमच्या समोर एक सचेतन देह येतो त्यालाच आम्ही व्यक्ती म्हणतो. म्हणूनच भारतीय अध्यत्मात केवळ सगुण भक्ती नाहीं की निर्गुण भक्ती नाही. ह्या दोन्हीचा सुंदर मिलाफ केला गेला आहे. म्हणूनच आम्ही पूजे पूर्वी त्या देवतेची प्राण प्रतिष्ठा जातो. त्यानंतर ती मूर्ती पूजेत घेतो. देहाच्या शुद्धते व सौंदर्या बरोबरच प्राणांची शुद्धता, त्याचे संवर्धन ही बाबसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आहार, विहार, आचार ह्यांच्या शुद्धतेसाठी पवित्रतेसाठी काही नियम सांगितले जातात. सुरवातीला कदाचित ते त्रासदायक वाटतात, बंधनकारक वाटतात पण अंतिमतः तेच आपणांस पूर्णत्वास घेऊन जातील हे निश्चित.
समग्र दीप्ती घेतां ।जेवि दीपचि ये हाता । तेवि जियेचीय तत्त्वतां । शिवची लाभे।। ओ 24
अर्थ — दिव्याचा प्रकाश हातात घ्यायचा असेल तर दिवाच हाती घ्यावा लागेल. किंबहूना दिवा हाती घेतला तर त्याचा सर्व प्रकाश हाती येतो. तद्वत चैतन्यघन शक्ती हाती आली, प्राप्त झाली तर संपूर्ण विश्वच ( शिव ) हाती येते.
शब्दार्थ —दीप्ती = प्रकाश
विवेचन — प्रकाश पकडायचा असेल तर दिवा हाती घ्यावा लागतो. एका खोलीत अंधार आहे पण शेजारच्या खोलीत दोन दिवे जळताहेत. ती खोली प्रकाशमान आहे. त्या खोलीतील प्रकाश शेजारच्या अंधाऱ्या खोलीत न्यायचा तर प्रकाश हाती येणार नाही त्यासाठी एक दिवाच उचलून आणावा लागेल. त्या दिव्या सोबतच त्याचा संपूर्ण प्रकाश सुध्दा त्या अंधाऱ्या खोलीत जाईल व ती खोली सुद्धा प्रकाशमान होईल. प्रकाश पकडणे असंभव असले तरी दिवा हाती घेणे सोपे व सहज शक्य आहे. तद्वत संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेणे, प्राप्त करून घेणे अवघड आहे. पण ते ज्ञान प्राप्त करून घ्यावे असे वाटत असेल तर जी प्राणशक्ती संपूर्ण विश्व चालवते. तिलाच आत्मसात केले पाहिजे. तिला जाणून घेतले पाहिजे. कारण “विश्व बिजाचीया कोंभा साऊली केली ” अशी विलक्षण ही शक्ती आहे.
एखाद्या नविन शहरांत जायचे आहे, कोणीही परिचयाचे नाही. अश्यावेळी भीती, काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या गावचा नगराध्यक्ष जर वश झाला, ओळखीचा झाला तर संपूर्ण गावातील लोक ओळखीचे होतात व सर्व प्रकारच्या गोष्टी सहज शक्य होतात. नवविधा भक्तीचे वर्णन करतांना, त्यातील अंतिम भक्ती आत्मनिवेदन भक्ती ही महत्त्वाची सांगितली आहे. “अपुलाच ( सं )वाद आपणाशी” अशी अवस्था प्राप्त होते. ह्या प्राणशक्तीचा अभ्यास करण्यासाठी तिला जाणून घेण्यासाठी सिद्धयोगाचा अभ्यास केल्यास हे सहज शक्य होते. ज्ञानदेवांना असा ज्ञानदिवा त्यांचे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांच्या कडून प्राप्त झाला. हे सर्व सांगण्याचे धाडस माझे अंगी आले हे सुध्दा माझे श्रीगुरु प. पु. श्री नारायण काका ढेकणेमहाराज यांच्या कृपेने प्राप्त झालेल्या सिद्धयोग साधनेमुळे. ही त्या विश्वनियंत्या प्राणशक्तीचीच कृपा आहे यांत संशय नाही. केवळ साधनेने काय होणार असा जो प्रश्न विचारला जातो त्याला माऊलींचे हे अतिशय सुंदर उत्तर आहे. पेटता दिवाच हाती आला तर अंधार तेथे उरणारच नाही. ज्ञानाची उत्पत्ती झाली की अज्ञान तेथे राहूच शकत नाही. बंधने गळून पडली की मुक्ती आपोआप मिळणार हे त्रिवार सत्य आहे.
जैसा सूर्य मिरवी प्रभा । प्रभी सुर्यत्वाचा गाभा ।तेवि भेद गिळीत शोभा । एकचि जे।। ओ 25
अर्थ — सूर्य सर्व ठिकाणी प्रकाश देतो. सूर्य व त्याचाप्रकाश ह्या दोन्हीत काहीही भेद नाही. सूर्याची प्रभा हे सुर्याचाच गाभा आहे, मूळ स्वरूप आहे. किंबहुना दोन्ही एकच आहेत.
शब्दार्थ — प्रभा = सूर्याचे प्रकाशमान तेजोवलय
विवेचन — सूर्य म्हणजेच सूर्यप्रकाश, त्याचे तेज. सूर्यापासून त्याचे तेज किंवा त्याचा प्रकाश वेगळा करता येत नाही. सूर्यप्रकाश हा सूर्याचा गाभा , अर्क, मूळ स्वरूप आहे. सूर्यप्रकाश हा सूर्यांतर्गत आहे. सकाळ होताच सूर्य उगवतो व त्याचा प्रकाश संपूर्ण विश्व व्यापून टाकतो. सूर्य म्हणजेच त्याचा तेजोगोल, त्याची प्रभा आणि सूर्याची प्रभा म्हणजेच सूर्य. दोघांमध्ये काहीही फरक नाही. त्याचप्रमाणे जेव्हा साधना तीव्र होत जाते, वाढीस लागते, तेव्हा साधना व साधक असा फरक राहत नाही. साधक निरंतर साधनेत रममाण होतो. आत्मरंगी रंगून जातो. अश्या सुमंगल वेळी श्रीगुरुतत्वाचा खरा स्पर्श होतो. अनेकवेळा साधकाला अनुभव येऊ लागतो की फार मोठे अचाट काम, अविस्मरणीय काम त्याचे कडून सहजपणे घडून गेले. त्याची कल्पना सुद्धा त्याला होत नाही.
ही “अपणासारखे करती तत्काळ । नाही काळ वेळ । तया लागीं ।।” साधना व श्रीगुरू आपल्या कार्यात शिष्याला कसे सामावून घेतात त्याचा एक स्वानुभव सांगण्याचा मोह होतो. एकदा मद्रासहून एक फोन आला त्यांना कोणीतरी माझा फोन नंबर दिला होता. 30 डॉक्टरांची टीम औरंगाबाद पाहायला येणार होती. ते आपल्या घरीच साधनाकक्षात राहू इच्छित होती व त्यांना सिद्धयोगाची माहिती हवी होती. हे सर्व ठीक होते पण भाषेचा प्रश्न होता. त्यांना हिंदी किंवा मराठी येत नव्हते व माझे इंग्रजी भाषेत यापूर्वी कधीही व्याख्यान झालेले नव्हते. अध्यात्मिक व्याख्यांचे इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द माहीत नव्हते. मी माझे श्रीगुरू ढेकणेमहाराज याना फोन केला. ते म्हणाले, ” गुरुपरंपरेचे स्मरण करून बोलावयास सुरवात कर. सर्व ठीक होईल.” आणि खरोखरच 30 मद्रासी डॉक्टरांसमोर दोन दिवस दोन दोन तास इंग्रजीत व्याख्यान झाले. मी ते बोलूच शकत नव्हतो मी केवळ माध्यम होतो. काका महाराज सारे बोलत होते. येथे गुरू शिष्याचे एकत्व अनुभवास आले.
सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला ओवी २१ ते २५ समाप्त
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI