ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.449

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४९ .

दुजे द्वैत सांडी एकतत्त्व मांडी । अद्वैत ब्रह्मांडी पैसु कीजे ॥१॥ ते रूप पंढरी पुंडलिका द्वारीं । मुक्तिमार्ग चारी वश्य रया ॥२॥ अनंती अनंत ओतिले संचित । वैकुंठ अद्भुत उभे असे ॥३॥ ज्ञानदेवीं ध्यान मनमौन्य चरण । आपणची मग्न तेथें जाले ॥४॥

अर्थ:-

जगांतील द्वैताचा मिथ्यात्व निश्चय करून अद्वैत आत्मतत्त्वाचा विचार कर, त्यामुळे तुला सर्वत्र एक आत्माच आहे असे ज्ञान होईल.तो श्रीपांडुरंग भोळ्या भाविक भक्तांच्या उपासनेकरिता पंढरीस चारी मुक्तिंचा मार्ग हातात घेऊन पुंडलिकाचे द्वारात उभा आहे. अनंत पदार्थात अनंत रूपाने व्यापक राहून ते परब्रह्म विटेवर उभे आहे. मी सर्व प्रपंचाविषयी मौन धारण करून ध्यान केले व त्या ध्यानामुळे माझे मन पंढरीरायाच्या चरणी तल्लीन झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *