ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.429

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२९

चैतन्य हैं दिसे उघडेया डोळां । नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥ मसुरांतील सूक्ष्म अनुभवें दिसे । तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ऐसें तेथ तेज । असे गुजगुजीत निर्मळ तें ॥३॥

अर्थ:-

चैतन्य वस्तु ज्ञानरूपी डोळ्यांनी दिसते, व तो सुखसोहळा निवृत्तीनाथांनी अनुभविला.ब्रम्हारंधातील मसुराएवढ्या बिंदुचे तेज अत्यंत सूक्ष्म असले तरी योगी लोकांना त्याचा अनुभव घेता येतो. ते तेज मोहक व निर्मळ असले तरी ज्या डोळ्याला तेज दिसते त्या डोळ्याचाही डोळा जो परमात्मा तो एक निवृत्तीनाथांनाच माहीत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *