ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 563

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५६३

तिही शून्यावरती नांदताहे देहीं । तोचि ब्रह्मांड गेही भरुनि ठेला ॥१॥ जयाचा तो भास बिंबाकार आहे । ते खूण लाहे गुरुपुत्रा ॥२॥ बिंबाचे तें अंग ब्रह्म ते निघोट । वस्तु ते अविट तेज:पुंज ॥३॥ चळेना ढळेना जैसें तैसें तेंचि । उपमा आणिकाची केवीं साहे ॥४॥ बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचें । अभाग्याशी कैचें प्राप्त होय ॥५॥ अपार अधिष्ठानी सत्य ही अभंगी । जाणूनियां वेगीं जीवीं धरा ॥६॥ ज्ञानदेव म्हणे यापरता नाहीं । उपदेश कांही बोलावया ॥७॥

अर्थ:-

हे गुरुपुत्रा सत्त्व, रज, तम, या त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडचा परमात्मा देहामध्ये नांदत आहे. व तोच परमात्मा सर्व ब्रह्मांडांमध्ये ओतप्रोत भरला आहे. हे ब्रह्मांड म्हणजे त्याचा भास आहे, हे गुरुपुत्रा ही खूण तूं जाणुन घे. बिंबरुप जे ब्रह्म, ते एकरस, अविट, तेजःपुंज असे आहे. ते व्यापक असल्यामुळे चळत नाही, व ढळत नाही. असे ते एकरुप आहे. त्याला कशाचीही उपमा नाही. त्याची प्राप्ती होणे. हे अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ आहे. त्याची प्राप्ती दुर्देवी माणसाला होत नाही. अशा त-हेच्या अपार अधिष्ठानरुप परमात्मा जाणून त्याला चित्तामध्ये कायमचा धरुन ठेवा. याच्या पलीकडे तुम्हाला उपदेश करण्याचे काही शिल्लक राहिले नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *