आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


गोकर्णला येऊन सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले. तेथे शैवपंथियांचे प्राबल्य वाढले होते. त्यातील निलकंठ नामक ब्राह्मण अत्यंत विद्वान होता. त्याने शैवतत्वावर आधारित ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले होते. त्यानी आचार्यांबरोबर शास्रार्थ केला.निलकंठ पंडित आणि त्याचे शिष्य आचार्यांचे अनुयायी बनले. ती विजययात्रा दक्षिण प्रदेशात शृंगेरीत आली. तुंग आणि भद्रा या दोन नद्यांचा त्या ठिकाणी संगम होता. पुढे ती नदी तुंगभद्रा या नावाने वाहते. आचार्य तेथे आले आहेत,ही वार्ता कानी पडताच राजा
त्यांच्या दर्शनासाठी आला. आचार्यांनी राजाला सांगितले,” राजन,हे मनोहर स्थान
मठ स्थापण्याच्या योग्यतेचे आहे. मला या स्थानी शारदेचे मंदिर आणि मठ बांधून दिलास तर मोठेच कार्य होईल.” ” मला आनंदच होईल हे कार्य करण्यासाठी,” राजा म्हणाला. राजा गेल्यावर आचार्यांनी प्रमुख शिष्यांची बैठक बोलावली.या बैठकीस चित्सुख,हस्तमलक,पद्मपाद,
सुरेश्वराचार्य उपस्थित होते.आचार्यांनी


सांगितले, हे एक धर्मकेंद्र असेल.संपूर्ण आर्यवर्ताच्या चारी दिशांना अशी केंद्रे निर्माण करायची आहेत.अद्वैत मताची ही प्रसारकेंद्रे असतील. पंचायतन पुजा आणि षण्मताचे आचरण सर्वांनी ठेवावे. ही अध्ययन आणि अध्यापन केंद्रे असायला
हवी आहेत. अध्ययनासाठी विवेकचुडामणी,आत्मानात्मविवेक,प्रपंचचार,अपरोक्षनुभूती,आत्मबोध,बोधसार, सर्ववेदान्तसिध्दांतसारसंग्रह आदी रचना
असतील. या सर्व ग्रंथांच्या आणि वेदशास्रांच्या अध्यापनाद्वारे या आर्यावर्तात वैदिक धर्मध्वजा फडकावणे
हेच या मठांचे कार्य राहील.

” या मठाचा प्रमुख कसा असावा?”सुरेश्वराचार्यांच्या पृच्छेवर आचार्यांनी उत्तर दिले, “शुचिर्जितेन्द्रियो वेदवेदाड्गादिविशारदः।
योगज्ञः सर्वतन्त्राणां सो$स्मत्स्थानमवा-
प्नुयात।।” म्हणजेच शुध्दाचरणी,इंद्रियांना
जिंकणारा,चार वेद आणि सहा वेदांग यांचे
ज्ञान असलेला, सर्व शास्त्रांचा उपयोग जाणणारा असा साधकच उत्तराधिकारी
म्हणून नियुक्त करण्यात येईल. हे उत्तराधिकारी विशिष्ट पदव्यांनी ओळखले
जातील.” या दहा पदव्या कोणत्या?” सुरेश्वराचार्यांनी विचारले. “पुरी,गिरी,तिर्थ,
भारती,आश्रम,वन,अरण्य,पर्वत,सागर आणि सरस्वती या नावांच्या पदव्या असतील.” आचार्यांनी सांगितले. कालांतराने शृंगेरी पीठ स्थापित झाले. तेथे आचार्यांनी ‘श्री’
यंत्रांची स्थापना केली. सरस्वतीने शब्द दिल्याप्रमाणे त्यात निवास केला. तेथेच
आचार्यांनी शारदामंदिर उभारले. सुरेश्वराचार्यांना पीठाधीश करण्यात आले.
शृंगेरीत आचार्यांचे वास्तव्य असतांना आनंदगिरी नामक एका युवकाने विनंती केली की “आचार्य मला शिष्य करुन घ्या आचार्य मी मूढ आहे. मला काहीच
येत नाही, पण आपली मनोभावे सेवा करीन.सेवावृत्तीनेच राहीन. जे कानावर पडेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करीन.” आचार्यांनी संमती दिली. आनंदगिरी आचार्यांची मनोभावे सेवा करीत असे.
त्याच्या नम्र स्वभावामुळे त्याने सर्वांची
मने जिंकली. शिवाय तो आचार्यांच्या
शिकवणीला वेळेवर हजर असे व कानावर


पडेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा गिरीला येण्यास उशीर झाला होता. आचार्य म्हणाले गिरी आला की पाठाला सुरवात करूया. पद्मपादांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता. ते म्हणाले,” त्या मूढाला शास्त्रविवेचनातले काय कळतंय? तो कसले प्रश्नही विचारत नाही.” तेवढ्यात गिरी आला आणि त्याने आचार्यांना प्रणाम केला. आचार्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच गिरीच्या मुखातून बारा अक्षरी तोटक छंदातील रचना बाहेर पडू लागली! गुरू- शिष्याचा
शास्त्रसंवाद त्याच्या मुखातून बाहेर पडू लागला! ते पहाताच सर्व आश्चर्यचकीत झाले. गुरू सेवेच्या बळावर गिरीला ज्ञानप्राप्ती झाली! पद्मपादाचार्यांचा अहंकार गळून पडला. त्यांनी आचार्यांच्या
पायावर लोळण घेतली.आचार्यांनी गिरीला
विधिवत दिक्षा देऊन त्याचे नांव ‘तोटकाचार्य ‘ ठेवले. तोटकाचार्यांनी आचार्यांना प्रणाम केला. त्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरले होते. आचार्यांच्या प्रतिभावंत शिष्यांनी,सुरेश्वराचार्यांनी


अद्वैतसिध्दांतावर परिश्रमपूर्वक ग्रंथरचना
केली, त्याला नांव दिले ‘नैष्कर्मसिध्दी’. तो
ग्रंथ त्यांनी आचार्यांना अर्पण केला. पद्मपादाचार्यांनी ब्रह्मसूत्रावर लिहीलेली चतुःसूत्री टीका वाचून आचार्य प्रभावित झाले. त्या ग्रंथाला ‘विजयडिंडीम’ नाव देण्यात आले. आचार्यांनी बौद्ध तांत्रिकांचा
पराभव केला. अभिनव गुप्तांना शास्त्रार्थातील पराभव फारच जिव्हारी लागला. त्याने आचार्यांवर तंत्र आणि मंत्राच्या साह्याने अभिचार-अनुष्ठान केले.
त्यामुळे आचार्यांच्या शरीरात भगंदर नावाच्या असाह्य रोगाने प्रवेश केला. त्यामुळे आचार्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या. जखमेतून रक्तस्त्राव होऊन वारंवार कपडे बदलावे लागत होते. तोटकाचार्य


आचार्यांची मनोभावे सेवा करत होते. आचार्यांची अवस्था बघून पद्मपादांनी नृसिंहाचा धावा केला नृसिंह प्रगट झाले.
त्यांनी ओंकारमंत्राने प्रत्यभिहार करण्यासाठी मंत्र आणि विधी सांगितला.
पद्मपादाने प्रत्यभिहार करण्यास सुरुवात करताच दैवी आणि आसुरी शक्तींचा भीषण संग्राम सुरू झाला. भयंकर मेघनाद होऊ लागला.अवेळी विद्युल्लता चमकू लागल्या. विलक्षण वेगाने वारे वाहू लागले. अचानक सर्व शांत झाले. दैवी शक्तीचा विजय झाला.आचार्य पुर्णतः बरे झाले. त्याचवेळी अभिनवगुप्ताची अखेर झाली. तो मृत्यु पावला. आचार्य व्याधिमुक्त झालेले पाहून सर्व शिष्य आनंदित झाले. आचार्यांनी संपूर्ण भारतात
परिभ्रमण करून चार दिशांना चार पिठांची स्थापना केली.


1) पूर्वेला-गोवर्धन पीठ–पद्मपादाचार्य
महावाक्य-प्रजनम ब्रह्म -वेद- ॠग्वेद
2) पश्चिमेला-द्वारका पीठ-हस्तमलकाचार्य
महावाक्य–तत्वमसी–वेद–सामवेद
3) उत्तरेला–ज्योतिर्मठ–तोटकाचार्य
महावाक्य-आयमात्मा ब्रह्म -वेद-अथर्व
4) दक्षिणेला-शृंगेरी मठ–सुरेश्वराचार्य
महावाक्य-अहम् ब्रह्मास्मी-वेद-ॠग्वेद
5) शंकराचार्यांनी स्थापलेले पाचवे पीठ
कांचीपूरम. या सर्व पिठांची स्थापना
करून आचार्यांची विजययात्रा काश्मीर येथील ‘सर्वज्ञपीठाकडे’ निघाली.
क्रमशः
संतोष म्हैसाळकर
9869483930

श्रीमद् आद्य शंकराचार्य संपूर्ण साहित्य

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading