रामायणातले संस्कृती दर्शन भाग ८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग क्र.8


रणरागिणींची परंपरा
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातल्या अयोध्याकांडातले संस्कृतीदर्शन अभ्यासु.
मंथरेने रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी पाहिली व तिच्या मनात विकल्प निर्माण झाला तो पुढे तीने कैकयीच्या मनात कसा बिंबवला पुढे कैकयीने दशरथ राजांकडुन रामाला 14 वर्षे वनवास व भरताला राज्याभिषेकाचे वचन मिऴवणे हि कथा सर्वांना ज्ञात आहे
यात एक उपकथा आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत
पुरा देवासुरे युध्दे सह राजर्षिभि:पति:।
अगच्छत् त्वामुपादाय देवराजस्य साह्यकृत् ।। (11)
मंथरा सांगतेय देवि (कैकयी) पूर्वी देव व असुरांत संग्राम झाला असता तुमच्या पतिदेवांनी राजर्षिंच्या सोबत तुम्हाला देवराज इंद्रदेवांच्या साहाय्या करता नेले होते.
(याचा दुसरा अर्थ कैकयी हि युध्दशास्त्रात निपुण होती यास्तवच दशरथ राजाने तीचे साहाय्य घेतले होते)
दिशमास्थाय कैकेयि दक्षिणां दण्डकान् प्रति।
वैजयन्तिमिति ख्यातं पुरं यत्र तिमिध्वज ।। (12)
स शंबर इति ख्यात:शतमायो महासुर:।
ददौ शक्रस्य संग्रामं देवसङ्घैरनिर्जित:।। (13)


कैकयी दक्षिणेस दंडकारण्य नावाच्या प्रांतात वैजयंती नामक नगरात हा शंबरासुर नामक पराक्रमी असुर राहत होता ज्याच्या ध्वजावर तिमि (देवमासा याला इंग्रजीत व्हेल म्हणतात) चे चिन्ह होते व जो विविध मायाविद्यांत पारंगत होता देवसैन्य हि त्याला पराजीत करु शकत नव्हते त्याने एकदा इंद्रदेवांशी युध्द आरंभले होते (पुढे जाण्या आधी एक गोष्ट निदर्शनास आणतो प्रत्येक देशाचा एक राष्ट्रध्वज असतो त्या ध्वजावर त्या राष्ट्राचे प्रतिक म्हणुन काहि चिन्हे किंवा रंगसंगती आपण पाहतो हि परंपरा भारतीय आहे हे मात्र आपण विसरतो
उदा.भारताच्या ध्वज हा तिरंगा आहे अशोकचक्र हे चिन्ह आहे
पाक चा ध्वजावर चांद तारा हे चिन्ह आहे वगैरे
हि ध्वज परंपरा आपली आहे व जगाने ती आज घेतली आहे हि आपल्या दृष्टिने अभिमानाची गोष्ट आहे. वेदांमध्ये हि ध्वजाचा उल्लेख आहे वेद हे तर जगातले सर्वात प्राचीन व एकमेव अद्वितीय असे ग्रंथ आहेत पुढे स्मृतित हि ध्वज उल्लेख आहे, पुराणात तर विपुल प्रमाणात आहेत व रामायण महाभारतात हि आहेत तेव्हा भारताने हि परंपरा जगाला दिली हे म्हणणे चुक नाहि)


तिमि म्हणजे देवमासा याचाहि उल्लेख रामायणात दोन तीन ठिकाणी येतो म्हणजे सागरी जीव सृष्टि संदर्भात या लोकांचे ज्ञान होते)
त्या युध्दात रात्री झोपलेल्यांना देखील असुर पऴवुन ठार मारत होते
त्याच युध्दात दशरथ राजाने पराक्रम गाजवला व असुरांच्या शस्त्राने व अस्त्रांनी ते जेव्हा जर्जर होताना तु पाहिलेस
त्याच वेऴी हे कैकयी
अपवाह्य त्वया देवि संग्रामान्नष्ट चेतन:।
तत्रापि विक्षत:शस्त्रै:पतिस्ते रक्षितस्त्वया ।।
देवि कैकयी त्या वेऴी दशरथ राजाची चेतना नष्ट होवु लागली होती त्याच समयी तु चतुराईने रथ रणांगणातुन दूर करुन त्यांचे प्राण तु वाचवलेस .पुन्हा त्या ठिकाणी असुरांनी शस्त्रास्त्र हल्ला करुन त्यांना परत घायाऴ केले त्याहि समयी तु त्यांचे प्राण वाचवले होतेस
(अयोध्या कांड नवम सर्ग)
भारतात जगदंबा आदिमायेपासुन लढवय्या मातृशक्तिची परंपरा आहे आजहि भारतीय लष्करात हि परंपरा सुरु आहे हि संस्कृती आपली आहे.
चंड मुंड, शुंभ निशुंभ महिषासुर वगैरे अनेक राक्षसांना लढुन मारणारी जगदंबा हि आदर्श मानुन अनेक माताभगिनींनी याच मार्गाचे अनुकरण केले आहे.
चुल आणी मुल एवढि छोटि कक्षा भारतीय परंपरेची मुऴीच नाहि .भारतीय माता भगिनी जेवढा स्वयंपाक घरात सफाईदार पणे जशी भाजी चिरतात तेवढ्याच सफाईने शत्रुसंहार हि करु शकतात नव्हे नव्हे तर त्यांनी करुन दाखवला आहे . कैकयी पासुन अनेक लढवय्या मातांचा उल्लेख आपल्या इतिहासात आहे .पद्मावती पासुन ते राजमाता जिजाबाई, ताराराणी, झाशीची राणी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होऴकर, कित्तुरची चन्नमा ते आझाद हिंद सेनेतल्या कँ.लक्ष्मी सैगल ते आज पर्यंत भारतीय लष्करातील माता भगिनी यादि फार विस्तृत होईल.


कैकयी ला रामायणात केवऴ खलनायिका म्हणुन रंगवणे हे तिच्या पराक्रमाला गौण लेखल्यासारखे होईल.
एखादा पटकन विचारेल रथ चालवणे यात काय कौशल्य? त्याला उत्तर द्या योगेश्वर कृष्ण हा सारथी उत्तम असल्याने रथी अर्जुन विजयी झालाय.
फायटर प्लेनच्या वैमानिकास विचारा कि शत्रुचा चहुबाजुंनी आग ओकणारा हल्ला सुरु असताना विमान सुरक्षित नेणे हे किती कठिण काम आहे.
कैकयीने या युध्दात हेच काम केले होते दोन वेऴा दशरथराजाचे प्राण वाचवले होते.त्यामुऴे दशरथानी तिला दोन वर माग मी ते पूर्ण करेन अस वचन दिल होत.
आपल्या देशातल्या अनेक माता या ज्या कौशल्याने घर चालवु शकतात त्याच कौशल्याने शस्त्र व देशहि चालवु शकतात आजहि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आपले काम चोख बजावत आहेत हे उदा.पुरेसे आहे.
तेव्हा बायकांनी केवऴ चुल मुल उष्टे खरकटे काढणे हिच भारतीय परंपरा आहे व ब्रिटिशांमुऴे व राजकारण्यांमुऴेच आपण सुधारलो असे म्हटले तर त्याला वरील लढावु मातांची उदारणे द्या व सांगा हे तुमचे चुकतेय. आमची संस्कृती घर सांभाऴणे आहे तशी देश सांभाऴणे हि आहे तेव्हा मेकॉलेचे डोऴे न लावता उघडपणे आपली संस्कृती पाहु अभ्यासु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *