रामायणातले संस्कृती दर्शन भाग १५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग क्र.15


गंगापूजनाची संस्कृती व आक्षेपांचे साधार खंडन
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातले संस्कृती दर्शन पाहु.आपण अयोध्याकांडापासुन हा अभ्यास करतोय.गेल्या भागात निषादराजा गुहाच्या नगरात राम लक्ष्मण सीतेचे स्वागत झाले व पंचपक्वानांचा बेत रामचंद्रांकरता करण्यात अाला हि पंचपक्वानांची संस्कृती गेल्या भागात पाहिली .राम लक्ष्मण सीतेने यातल काहि स्विकारल नाहि जलपान व थोडा फलहार केला व जमिनीवर पालापाचोळ्यावर निद्रा घेतली (लक्ष्मण मात्र पहारा देत होते) पहाटे रामचंद्रांनी सुमंत्रांना रथासह परत पाठवले व गुहराजाची परवानगी घेवुन त्यांनी दिलेल्या नौकेत बसुन गंगेचा विस्तीर्ण प्रवाह ओलांडुन प्रयाग प्रांतात जाण्याकरता नौकेवर आरुढ झाले.गुह राजा व सुमंत्राचा निरोप घेतला व आचमन करुन मंत्र म्हणुन नौकेत बसले. आपण ज्या गोष्टिंचा वापर प्रवासाकरता करतो त्यांना सर्वप्रथम नमस्कार करुन आमचा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना करणे हा त्यातला भाग आहे हि कृतज्ञता भावना आहे.ऋग्वेदाच्या आश्वलायन गृह्यसुत्रात विवाहानंतर नवदांपत्याची वरात जर रथातुन जाणार असेल, नौकेतुन जाणार असेल तर त्या ठिकाणी कोणते मंत्र म्हणावेत हे विस्ताराने दिलय .आजहि अनेक वाहन चालक, बस चालक हे वाहन सुरु करताना किंवा गाडित बसताना प्रथम वाहनास नमस्कार करतात. बैल असो घोडा असो की नदी असो हे सर्व आपलेच आहेत आपण त्यांचा मांडिवर बसणार आहोत त्यांना आपल्यामुऴे त्रास होणार नाहि हि काऴजी त्यात आहे व त्यांचे आपल्यावर एकप्रकारचे उपकार आहेत हि भावना आपली हवी हि आपली संस्कृती आजहि सुरु आहे.
असो हा विषय आजचा प्रतिपाद्य नाहि ओघात आल्याने सहज मांडला.
नौकेत बसल्यावर वैदेहि सीतेने गंगेची विनवणी केली. वेदात अनेक सुक्तांमध्ये नद्यांचे, पाण्यांचे स्तवन पर मंत्र आले आहेत.
कृ.यजुर्वेदात पाण्याचे महत्व सांगीतल गेलय
“आपो वै सर्वा देवता: “म्हणजे पाण्यात सर्व देवतांचा वास म्हणजे वास्तव्य असते
त्याच सोबत “आपो वै रक्षोघ्नी:” म्हणजे पाण्यात रक्षण करण्याचे सामर्थ्य आहे.


“आप:सर्वस्य भेषजी:” म्हणजे पाण्यात विविध औषधी आहेत
चतुर्दश हि वर्षाणि समग्राण्युष्य कानने ।
भ्रात्रा सह मया चैव पुन:प्रत्यागमिष्यति ।। (52.84)
चौदावर्षांचा वनवास भोगुन रामचंद्रांसह मी व त्यांचे बंधु लक्ष्मण पुन:अयोध्येकडे परत जावु.
ततस्वां देवि सुभगे क्षेमेम पुनरागता ।
यक्ष्ये प्रमुदिता गङ्गे सर्वकामसमृध्दिनी ।। (85)
सौभाग्यशालिनी गंगे त्यावेऴी 14 वर्षांनी आम्हि कुशलमंगल परत आल्यानंतर संपूर्ण मनोरथ पूर्ण झालेली मी तुझी प्रसन्नता पूर्वक पूजा करेन.
अशा प्रकारे विविध प्रकारे सीतामाईने गंगेची विनवणी केली.पुढे ती अस म्हणतेय
गवां शतसहस्त्रंच वस्त्राण्यन्नं च पेशलम् ।
ब्राह्मणेभ्य:प्रदास्यामि तव प्रियचिकीर्षया ।। 88
गंगेला सीतामाई म्हणतेय तुझ्या पुजनासमयी तुझ्या कृपेकरता ब्राह्मणांना हजारो गायी अनेक वस्त्र व अन्नसंतर्पण करेन.
सुराघट सहस्त्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता।।89
ह्या श्लोकाचा दुर्दैवाने अनेक मंडऴी विपर्यास करतात व सीतामाईने गंगेला हजारो सुराघट (मद्याचे घट) व मांसोदन (मांस भात) देईन व तुझे पूजन करेन असा विकृत अर्थ काढुन आपली गंगामाता हि मांसमद्य प्राशन करते किंवा गंगामैया हि मद्यपी आहे असा विकृत अर्थ दाखवतात याचा खरा अर्थ कसा लावावा संस्कृत मधे अर्थ कसा घ्यावा हेहि सप्रमाण देतोय


सुराघट सहस्त्रेण याची व्युत्पत्ति अशी आहे सुरेषु घटेषु न घटन्ते न सन्तीत्यर्थ: म्हणजे सुरेषु म्हणजे देवांना अघट म्हणजे उपलब्ध होवु न शकणारे (सुरा +अघट = सुराघट) असे हजारो पदार्थ मी तुला अर्पण करेन. आपण अघटित हा शब्द जो वापरतो तो देखील अघट म्हणजे अशक्यप्राय अशा अर्थाचाच आहे.
हल्ली बिग्रेडि व फुरोगामी हे सुर म्हणजे देवता या शब्दाचा विकृत अर्थ “सुरापान म्हणजे मद्यपान करणारे “असा लावतात. व जे मद्यपान करत नाहित ते असुर असा विचित्र अर्थ लावतात.
आता मांसभूतौदन चा खरा अर्थ पाहु.
मा म्हणजे नास्ति (नाहि) आपण पार्वती ला उमा म्हणतो ते देखील उ मा म्हणजे तु जावु नकोस असेच आहे. (पार्वती शंकरांची प्राप्ती व्हावी या करता कठोर तपाला निघाली तेव्हा पार्वती देवींची माता म्हणते उ मा गच्छत् तु जावु नको यावरुन उमा नाव पार्वतीला पडले)
अंसो म्हणजे राजभाग (कर)
भू: म्हणजे पृथ्वी
उत म्हणजे वस्त्र
ओदन म्हणजे अन्न (भात)
मा + अंस +भू +उत + ओदन = (मांसभूतौदन) मा म्हणजे नाहि अंस म्हणजे राजभाग (कर) ज्या भूमीवर नाहि अशी भू व उत म्हणजे वस्त्र व ओदन म्हणजे अन्नदान मी करेन.
हे गंगा देवि आम्हि वनवास संपवुन पुन्हा नगरात आलो कि तुला हजारो देवदुर्लभ वस्तु, भूमी वस्त्रे अन्न समर्पण करु व तुझे पूजन करु.
आता पुन्हा शंका नको यास्तव एक मुद्दा सांगतो राजा जे दान देतो त्यावर कर लागत नाहि अगदि राजाने भूमी दान दिली तर दान घेणार्याला त्यावर राजकर भरावा लागत नाहि. (आजहि करमुक्त देणगी दाने आहेत)
या भूमीचा वापर हा घाट बांधणे, धरण बांधणे, कालवे काढणे या करता पूर्वी केला जात असे या भूमी नदीच्याच नावे दान दिलेल्या आहेत.
कारण या मुऴे जनकल्याण होणार असते.
आजहि आपल्याकडे गंगापूजनाची परंपरा आहे.तसच गंगा परिक्रमा, गोदा व नर्मदा परिक्रमा देखील पुराणांत आलेल्या आहेत. गंगेला जावुन आलेली मंडऴी घरी आल्यावर गंगापूजन करतात अन्न संतर्पण (मावंद ) करतात (गंगेच्या किनार्यावर नाहि) सीतेने देखील हेच सांगीतले आहे आम्हि सुखरुप वनातुन आलो कि तुझे पूजन करु.


नर्मदा परिक्रमा करणारे कुमारिकांचे पूजन व त्यांना वस्त्रदान आजहि करतात. त्याच सोबत कढाई (गोडाचा शिरा) नैवेद्यहि करतात.
संस्कृत या भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ होतात त्यामुऴे योग्य अर्थ हा आधीच्या व नंतरच्या श्लोकांना वाक्यांना अनुलक्षुन घ्यावा लागतो.
मास याचा अेक अर्थ महिना असा होतो व दुसरा मास म्हणजे (meat) मांसाहार हा होतो.
वीर्य याचा अर्थ पराक्रम असा होतो व दुसरा अर्थ (semen) जो वैद्यकशास्त्रात वर्णीत आहे तो होतो तो तारतम्याने घ्यावा लागतो.
दिगंबर याचा एक अर्थ नग्न होतो व दुसरा अर्थ दिक् म्हणजे दिशा व अंबर म्हणजे आकाश म्हणजे दशदिशाचे अंबर रुपी वस्त्र धारण केलेला तो असा होतो
सहज ओघात आलय म्हणुन सांगतो संस्कृतमधला मराठि अर्थ शब्दश:घ्यायचा नसतो.
उदा.नरपुङ्गव म्हणजे श्रेष्ठ व्यक्ति चे हे संस्कृतमधील विशेषण आहे.त्या ठिकाणी
मराठितला पुङ्गव म्हणजे
बैल ( “ढ “) असा अर्थ लावु नये याने गडबड होते.
संस्कृतमध्ये “गजगामिनी” हे स्त्रीचे विशेषण आहे.
मराठित अनुवाद करताना हत्तीण असा शब्दश:अनुवाद केल्यानंतर महिला वर्गाकडुन मार पडु शकतो.
तात्पर्य संस्कृतचे अर्थ मीमांसा तर्क यांनी घ्यावे लागतात.


आजहि आपण सर्वजण नित्यस्नान करताना गंगेचे स्मरण करतोच (गंगा गंगेति 。नमामि गंगे 。वगैरे श्लोक म्हणतोच हरगंगे भागिरथी म्हणुन डुबकी मारतो) हे सर्व गंगेचे मानस पूजन व स्मरणच आहे.
आजहि लक्षावधि वर्षांनंतरहि हि गंगापूजनाची संस्कृती सुरु आहे.अनेक घरात आजहि गंगेच्या पाण्याचे गडु नित्य पूजनात आहेत.
गंगामैया, नर्मदामैया अशा मातृवात्सल्य संबोधनांनी नद्यांना आम्हि हाक देतो हि आमची वेदकालीन आरंभ झालेली संस्कृती आहे जी रामायणातहि उल्लेखीत आहे.
लेखाच्या समारोप समयी एक वैज्ञानिक सत्य सांगतो गंगेच्या पाण्याला कधिहि कीड लागत नाहित त्यात जंतु प्रादुर्भाव होत नाहि.ब्रिटिश लोक पूर्वी लंडनला जाताना समुद्रात अनेक दिवसांच्या समुद्रि प्रवासात गंगेच्या पाण्याची पिंपे भरुन नेत असत हे त्यांनी केलेले संशोधन आहे त्यामुऴे त्यावर लगेच विश्वास बसण्यास हरकत नाहि.
राम व गंगा या दोघांची भारतीयांच्या मनावर प्रचंड मोहिनी आहे याच दोन धाग्यात आपण हिंदु बांधले गेले आहोत तेव्हा गंगेचे पूजन करु व गंगा पुन्हा स्वच्छ निर्मऴ बनवण्यास हातभार लावु व गंगा अशुध्द होणार नाहि हि दक्षता आपण घेवु व आपली संस्कृती टिकवु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading