भाग क्र.11
विरहाचा निरोप व आक्षेपांचे खंडन
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातल्या अयोध्या कांडातील संस्कृती दर्शन पाहु.
परवाच महिला दिन जगभर साजरा केला गेला त्या दिवशी अनेक जागृत महिलांनी आपले पुरोगामित्व नेहमीप्रमाणे सिध्द करण्याकरता रामचंद्रांबद्दल यथेच्छ गरळओक केली अनेकांनी मला त्या भाषणांच्या क्लिप पाठवल्या त्या मुऴेच खरा विषय लोकांसमोर यावा या करता हा लेखन प्रपंच आहे.
वाल्मिकींचा काऴ हा रामचंद्रांच्या समकालीन अाहे त्यामुऴे कोणीतरी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा आद्यकवी वाल्मिकींनी लिखीत रामायण हे अधीक जवऴचे वाटते.या पुरोगामी महिलांची
तक्रार अशी होती वनवास रामाला झाला होता त्याने सीते ला सोबत का नेले? सीतेचे हाल का?वगैरे वगैरे
रामचंद्र काय म्हणतात हे एकदा नीट पाहा.
भ्रातृपुत्र समौ चापि द्रष्टव्यौ च विशेषत:।
त्वया भरत शत्रुघ्नौ प्राणै:प्रियतरौ मम ।। (26-33)
भरत व शत्रुघ्न हे मला प्राणांहुनी प्रिय आहेत आता तुला त्या दोघांची भाउ व पुत्रा प्रमाणे तु काऴजी घ्यायची आहे. (कारण रामचंद्र वनात अेकटेच निघाले होते व सीतेचा निरोप घेताना ते तीला हे समजवत होते.)
विप्रियं न कर्तव्यं भरतस्य कदाचन ।
स हि राजा च वैदेहि देशस्य कुलस्यच ।। (34)
हे वैदेहि तु भरताच्या आज्ञेविरुध्द आचरण करु नकोस कारण आता तो देशाचा च नव्हे तर आपल्या कुलाचा हि राजा आहे.
याच सोबत रामचंद्र म्हणतात सीते तु कौसल्येला आधार दे त्याचसोबत माझ्या अन्य मातांची देखील तु काऴजी घे कारण आजपर्यंत स्नेह प्रेम व पालन पोषण या दृष्टिने त्या तिघांनी मला सांभाऴले आहे. (वन्दितव्याश्च ते नित्यं या शेषा मम मातर:।
स्नेहप्रणय सम्भोगै: समा हि मम मातर:)
एवढेच सांगुन रामचंद्र थांबले नाहित तर पुढे म्हणतात वैदेहि तु तुझ्या सखी व दासीं समोर सतत माझे गुणगान करु नकोस आता युवराज भरत होणार आहे त्याला त्यामुऴे सतत वाईट वाटेल त्याचा मनात अपराधी पणाची भावना दाटेल हि राज्याकरता योग्य नसेल. (हल्ली राजकारणी सत्तेत राहुन मंत्रीपद उपभोगुन मुख्यमंत्र्यांच्या सतत विरोधात असतात या उलट रामचंद्र आहेत सत्तेत नसुन हि राज्याची व राजाची मनापासुन काऴजी घेताहेत)
रामचंद्र हे अविवेकी नव्हते कैकयी चा राग त्यांनी भरतावर काढला नाहि उलट ते सीतेला त्याला पुत्राप्रमाणे तु सांभाऴ असे म्हणताहेत
याचे दुसरे कारण असेहि आहे कि सीता हि राज्यशास्त्रात उत्तम पारंगत होती व या विरहानंतर राजा दशरथ कौसल्या माता हे सर्वजण दु:खमग्न व शोकाकुल राहतील. याच वेऴी भरत शत्रुघ्न मामाकडे आहेत लक्ष्मण चिडलेला आहे राम वनवासात जाणारेत मग राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होता नये प्रजेचे काम अडता नये या करता हा उपदेश आहे.
आईच अशा कठिण प्रसंगात मुलांना धीर देवु शकते ती आई ते सीतेला व्हायला सांगताहेत. (जिजाबाईंनी च छ.शिवरायांना अनेक कठिण प्रसंगात धीर दिला होता,मुक्ताबाईंने देखील ज्ञानोबांना मातृवात्सल्याने धीर दिलाय) रामचंद्राना वन हे हिंस्त्र श्वापदे व राक्षसांनी युक्त आहे याची पूर्ण कल्पना आहे समोर काय संकटे येवु शकतात हे ठावुक असताना शांतपणे पत्नीला जवाबदारी ची जाणीव करुन देणे हा धिरोदात्तपणा अाहे.
असाच निरोप छ.शिवरायांनी दिल्लीत जाताना आपल्या मातेचा व पत्नींचा घेतला होता व त्या वेऴी तर औरंग्याकडुन राजे सुखरुप परत येतील का?हि देखील काऴजी सर्वांना होती औरंगजेब हा धुर्त महाकपटि होता व आपल्या बापाला भावांना तुरुंगात टाकुन त्याने राज्य बळकावले होते. राजे स्वराज्यात नसताना काय काऴजी घ्यावी कारभार कसा करावा याची सर्व जवाबदारी राजांनी सर्वांना वाटुन दिली होती.
स्वा.सावरकरांनी देखील असाच निरोप आपल्या पत्नीचा घेतला होता .अंदमानात गेलेला माणुस जिवंत परत येत नाहि हि ठाम कल्पना असताना दोन जन्मठेप भोगायला जाताना काय बोलण झाल असेल या दोघांचे कल्पना करुनच अंगावर शहारे येतात.
चाफेकर बंधु जेव्हा क्रांतीकार्याकरता बाहेर पडले तेव्हा त्यातल्या एका चाफेकरांच्या पत्नीचे डोहाऴे जेवण नुकतेच झाले होते.घरात नवीन येणारा पाहुणा गरोदर बायको व समोर क्रुर इंग्रज कसा निरोप घेतला असेल यांनी ते देखील फाशी होणार हि कल्पना असताना .
भारतीय जवान काश्मिरात जाताना पत्नी व मुलांना काय सांगुन निरोप घेत असतील. आठ आठ दिवस फोन सेवा बंद असते घरचे काय विचार करत असतील?
सतत युध्दजन्य स्थिती विचार केला तर मन बधीर होत बाबा /नवरा परत येणार का? हा प्रश्न सतत मनात घर करुन राहिलेला.
या सर्वांमधे एक गोष्ट “कॉमन” आहे या सर्वांनी वैयक्तिक स्वार्थाकरता पत्नींचे निरोप घेतले नाहियेत तर केवऴ आईच्या सेवेकरता हा विरह आहे.ती कैकयी माता असो किंवा भारतमाता असो.अनेक पुरोगाम्यांना भारताला माता म्हटलेल रुचत नाहि पटत नाहि म्हणुनच वंदे मातरम् (आईला नमस्कार) हे राष्ट्रगीत बदलुन जनगण मन हे स्विकारण्यात आल भारत माता कि जय हे देखील हल्ली “फेसीझम ” या व्याख्येत येतय तिथे यांना काय हे निरोप कऴायचे.
अापली संस्कृती हि निरोप म्हणजे केवऴ संदेश पोचवणे एवढिच संकुचीत नसुन जबाबदारीचे भान देणे व कर्तव्य जाणीव करुन देण्याची आहे आजहि आई ऑफीसला जाताना “मी येते ” एवढाच मर्यादित निरोप न घेता डब्यात काय दिलय, जेवण काय केलय, नीट वेऴेवर जेव इथपासुन पैसे पाकिट रुमाल चावी या सर्वांची आठवण करुन व गँस लाईट बंद कर नऴ बंद कर या सर्व जबाबदारींची आठवण करुन देवुनच जाते हे रोजच नित्य असल तरी आईची आठवण करुन निरोप देणे हि संस्कृती चुकत नाहि मग इथे तर चौदा वर्षे भेटच होणार नव्हती म्हणुनच हा विरहाचा निरोप महत्वाचा आहे. हि संस्कृती आजहि आपण पाऴतोय मग तो विरह चार तासांचा असो दिवसभराचा असो किंवा वर्षभराचा
आपल्याकडे जातो असा निरोप घेत नाहित तर येतो असा घेतात कारण मी परत येणार हा आशावाद त्यात असतो व तोच आधार असतो
तुर्त लेखन मर्यादा
पुढिल भागात हाच विषय पुढे नेवु.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
