भाग क्र.14
पंचपक्वानांची परंपरा
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातल्या अयोध्या कांडातले संस्कृती दर्शन पाहु.
पंचपक्वानांची परंपरा व संस्कृती ह्या किती जुन्या आहेत व त्यात किती विविधांगांचा साधक बाधक विचार केलेला आहे हे आज आपण साधार पाहु.
पंचपक्वाने म्हणजे पाच गोड पदार्थ हा गोड गैरसमज सर्व प्रथम मनातुन निरसन करा.
राम लक्ष्मण व सीता हे अयोध्येतुन निघाले वाटेत अनेक मंडऴींची त्यांनी समजुत घातली सुमंत्र हा सारथी त्यांचा सोबत होता. वेदश्रृति, गोमती व स्यन्दिका तसच गंगा नदिचे प्रवाह ओलांडुन मजल दरमजल करत ते गंगेच्या तटावर असणार्या श्रृङ्गवेरपुर या नगरात पोचले तेथे निषादराजा गुह हा राज्य करत होता.तो रामांचा प्राणसखा मित्र होता.तो शाराीरिक शक्ति व सैनिकी शक्तिने बलवान होता.(निषाद म्हणजे वनात राहणारे भिल्ल)
तत्र राजा रामस्यात्मसम:सखा।
निषादजात्यो बलवान् स्थपतिश्चेति विश्रृत:।। (50-33)
हल्ली नवीन च टुम मुलनिवासी वगैरे मंडऴीनी काढलीय “रावण हा मुल निवासी होता राम हा बाहेरुन आलेला आक्रमक होता. वनात राहणारे मारीच वगैरे मंडऴी हि मुलनिवासी होती व रामाने त्यांना मारले म्हणजे वनात राहणार्यांना रामाने मारले.
त्या मुर्खांना रामायण हे काल्पनीक वाटते पण रावण , मारीच, शूपर्णखा वगैरे मंडऴी हि मुलनिवासी खरी वाटतात हि गंमत आहे.
रामायणात तर निषादराजा म्हणजे भिल्ल राजा हा रामांचा प्राणसखा आहे हे सत्य मात्र ते लपवतात भिल्ल वनवासी वगैरे वनात राहणार्या जमातींची त्या काऴी राज्ये होती व राजे हि त्यांचेच होते असो हा विषय आजचा प्रतिपाद्य नाहि त्यामुऴे ओघात आले ते सांगीतले.
रामचंद्रांचे स्वागत केल्यावर निषादराजा गुहाने त्यांची अर्घ्यादि उपचारांनी पूजा केली.
त्यांचे स्वागत केले
भक्ष्यं भोज्यंच पेयं च लेह्यं चैतदुपस्थितम्।
शयनानि च मुख्यानि वाजिनां खादनं च ते ।।39
भक्ष्य, भोज्य, पेय, चेष्य व लेह्य अशा प्रकारांनी युक्त असलेले अन्न आपल्या सेवेत सादर केलेय आपण त्याचा स्विकार करावा या उत्तमोत्तम शय्या आहेत तसच आपल्या घोड्यांकरता चणे व गवत हि आहे आपण ते स्विकारावे.
पंच पक्वान हे या पाच गोष्टिंनी युक्त हवे या पाच पक्वांनांमधे षड् रसांनी युक्त अन्न हवे.पंच म्हणजे पाच प्रकारांनी युक्त
पक्व म्हणजे पूर्ण शिजलेले किंवा तयार झालेले अन्न.
1- भक्ष म्हणजे चावुन खाण्यायोग्य उदा.पोळी, पुरी भाकरी वगैरे
2- भोज्य -म्हणजे जेवणायोग्य पदार्थ भात, गुऴभात साखरभात मसालेभात
3- पेय – म्हणजे पिण्यायोग्य पदार्थ ताक, सोलकढि, कढि वगैरे
4- लेह्य – चटणी, पंचामृत लोणचे, मिरची वगैरे चाटुन खाण्याचे पदार्थ
5- चोष्य – म्हणजे चाखुन खाण्याचे पदार्थ उदा.पिकलेला आंबा वगैरे किंवा खारातला आवऴा वगैरे
या पाच प्रकारांनी युक्त पाक हा शरीरातले षड् रस संतुलीत करण्यास मदत करतो
हे सहा रस कोणते?
मधुर, आम्ल, लवण, कटू (तिखट), तिक्त (कडू रस) व कषाय रस (तुरट रस)
या रसांचे गुणधर्म हे चरकसूत्र व सुश्रतसूत्र व अष्टांगसंग्रहात विस्ताराने दिले आहेत.
बरेचदा अज्ञानामुऴे किंवा प्रतिष्ठेचा पुरस्कार करण्याकरता पाच गो़ड पदार्थ बनवतो पण हे आरोग्य दृष्ट्या अयोग्य ठरते. अन्न हे कफ वात पित्त या तिन्हि प्रकृतींचे संतुलन करणारे हवे जठराग्नि हा योग्य प्रदीप्त व्हावा व योग्य प्रकारे पचन व्हावे असे वाटत असेल तर या उपरोक्त प्रकाराने अन्नग्रहण करणे संयुक्त ठरते.
सहज ओघात आलय म्हणुन पान कसे वाढायचे हे सांगतो.
भात हा पानाच्या मध्यभागी, चटणी कोशिंबिरी, दहि लिंबु मीठ हे पानाच्या डाव्या बाजुस वरती, भाजी पानाच्या उजव्या हाताला वरच्या बाजुस
खीर पानाच्या उजव्या बाजुला खाली, वडे पुरी पानाच्या डाव्या बाजुला खालच्या बाजुस, गोड पदार्थ डाव्या बाजुला
भातावर वरण व तुप असे वाढावे.
हे असे का वाढावे या बाबत एक कारण असे आहे कि माणुस हा नैसर्गिक उजवा असतो त्यामुऴे जे पदार्थ कमी लागतात (चटणी, कोशिंबीर, दहि ) ते डाव्या बाजुस व जे जास्त लागतात भाज्या वगैरे ते उजव्या हातास वाढतात.
यामुऴे पदार्थ खाताना सुलभ सोपे जाते हि यातली मेख आहे.
आपल्या कडे किती प्रकारांनी भोजनासंदर्भात विचार केला जातो हे यातुन सिध्द होते.
अरबट चरबट जंक फुड फास्ट फुड हे कधीच परीपूर्ण अन्न होवु शकत नाहि.
आयुर्वेदात ऋतुचर्या व दिनचर्या हि यास्तवच दिलीय कोणत्या ऋतुत काय खावे? कसे खावे? याचा सांगोपांग उहापोह आयुर्वेदात आलाय तो निष्णात वैद्यांकडुन जाणुन घ्यावा व आपल्या तब्येतीला अनुसरुन आहार घ्यावा.
जंगलात राहत असलेल्या निषादांना देखील या पूर्णब्रह्म अन्नाची माहिती होती व ते तसा आहार हि घेत होते त्यामुळे ते किती ज्ञानी होते याचा आपण अंदाज घेवु शकतो.
अन्न हे पूर्णब्रह्म यास्तवच म्हटल आहे व योगेश्वर कृष्ण हे तेथेच राहतात अस त्यांनी भगवद्गीतेत प्रत्यक्ष म्हटलय ते उगीच नाहि.
पंचमहाभूतांचा या पंच पक्वानांशी संबध आहे (अहं वैश्वानरो भूत्वा 。) तेव्हा स्वस्थ खा व मस्त राहा हि परंपरा व संस्कृती आपण जपुया हि विनंती
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
