रामायणातले संस्कृती दर्शन भाग ९

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग क्र.9

रामचंद्रांचा आदर्श का?
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकीरामायणातले संस्कृतीदर्शन पाहु.
अयोध्याकांडापासुन आपण आरंभ केला आहे.मागील भागात कैकयीचा पराक्रम पाहिला आज पुढे सुरु करु.
कैकयीने दशरथ राजाकडुन दोन वर मिऴवले भरताला राज्याभिषेक व रामचंद्रांना चौदावर्षे वनवास त्या नंतर सर्वांना झालेले दु:ख वगैरे कथा आपणास ज्ञात आहेत ज्या परंपरेने आपण आजी आजोबांकडुन , कथाकीर्तन, प्रवचनातुन ऐकल्या आहेत.
रामाचा आदर्श म्हणजे नक्कि काय घ्याव?
एभिरेव घटै:सर्वैरभिषेचन सम्भृतै:।
मम लक्ष्मण तापस्ये व्रतस्नानं भविष्यति।। (27)
अथवा किं मयैतेन राजद्रव्यमयेन तु।
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति ।। (अयोध्याकांड 22-28)


हे लक्ष्मणा राज्याभिषेकाकरता हे तयार केलेले कलश आहेत यांनीच माझ्या तापसीव्रताचा संकल्प होईल
अथवा मला या मंगलद्रव्यकलशांची (सोने, चांदी, अनेक रत्नांनी युक्त असे घट होते) मला काय आवश्यकता?
मी स्वत:च्या हातानी पाणी काढुन माझ्या तापसी व्रताचा संकल्प करेन.
मातृपितृ वचन पालना करता कोणताहि आढावेढा न घेता निमिषात राजवैभवाचा त्याग करणे हे सोपे नाहि.बालपणापासुन वय वर्षे 27 पर्यंत ज्याने राजवैभव उपभोगलय हाती सत्ता येत असुनहि केवऴ वडिलांचा व सावत्र आईचा शब्द पाऴणे हे फार दुर्लभ आहे.
मी राजखर्चाने आणलेल्या पाण्याचा वापर तापसी संकल्पाकरता (वनात जाण्याकरता) करणार नाहि मी स्वत:पाणी या करता काढेन किती निस्वार्थ भावना
हिच भावना राज्यकर्त्यांची असणे हि काऴाची गरज आहे.हिंदुस्थानात असे अनेक तपोनिधि राजे होवुन गेले .तसच पंतप्रधान होवुन गेले
आर्य चाणाक्य (कौटिल्य) हे आपल्या झोपडि वजा घरात एक दिवा घेवुन असत. राज्यकारभाराची कागदपत्रे हिशेब तपासताना ते या समयीचा वापर करत व सरकारी काम झाले कि तो दिवा ते मालवुन टाकत अेकदा या विषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगीतले कि हा दिवा राज्यखर्चातुन पेटतो त्यामुऴे वैयक्तिक कामाकरता मी हा वापरत नाहि हा जनतेच्या द्रव्याचा अपव्यय आहे.


दुसरे उदारण
छ.शिवरायांचा उल्लेख राष्ट्रगुरु रामदास स्वामी हे “श्रीमंत योगी “असा करतात तो उगीच नव्हे. राजवैभवात असुनहि योग्यांप्रमाणे निस्वार्थी पणा राजांचा होता.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होऴकर यांचे चरीत्र हि असेच दिव्य आहे संपत्ती सत्ता सर्व असुनहि त्यांचे वर्तन हे संन्यस्त होते.
कै.लालबहाद्दुर शास्त्री हे रेल्वेमंत्री व नंतर पंतप्रधान असताना देखील असेच वर्तन होते.घरात केवऴ चटयी हिच बसण्याची सोय होती (कोच, खुर्ची वगैरे काहि नाहि) .शास्त्रींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे पाच सहस्त्र रुपयांचे कर्ज फेडले होते
स्वत:च्या मुलाला देखील त्यांनी नोकरीकरता शिफारस पत्र दिल नव्हत
मनुस्मृतित फार सुंदर वचन आलय
द्वयोरप्येतयोर्मूलं य सर्वे कवयो विदु:।
तं यत्नेन जयेल्लोभं तज्जावेतावुभौ गणौ ।।49
विद्वान लोक म्हणतात नाना प्रकारच्या व्यसनांचे मुऴ कारण लोभ आहे त्यामुऴे राजाने तो टाऴलाच पाहिजे.
याच नि:स्वार्थीपणामुऴेच आम्हि रामाचे पूजन करतो त्याची उपासना करतो.
भुंगा हा कठिण लाकुड पोखरतो पण कमऴाची मृदु पाकऴी पोखरणे त्याला जमत नाहि हि मंडऴी तशीच होती व हिच आपली संस्कृती आहे. पुढच्या भागात सीतामाईला केलेला उपदेश पाहु व अनेक आक्षेपांचे साधार खंडन मांडु
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading