रामायणातील संस्कृती दर्शन भाग 18

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌷 पाप स्विकृत करण्याची संस्कृती🌷 भाग क्र.18


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातले संस्कृतीदर्शन पाहु.अयोध्या कांडापासुन हा विषय आपण अभ्यासतो आहोत.मागील भागात तापसी कुमाराची कथा व शब्दवेधी धनुर्धर संस्कृती पाहिली .आज या कथेचा उत्तरार्ध पाहु.
दशरथ राजाचा बाण लागताच तो तापसी कुमार गतप्राण झाला. मृत्युपूर्वी त्याने आपल्या अंध मातापित्यास पाणी नेवुन द्यावे हि विनंती दशरथास केली त्या प्रमाणे दशरथाने पाण्याचा घडा त्यांचा जवऴ नेला त्या क्षणी दशरथ आपली अवस्था काय झाली होती हे कौसल्येला सांगतात
मुनिमव्यक्तया वाचा तमहं सज्जमानया ।
हीनव्यञ्जनया प्रेक्ष्य भीक्ष इवाब्रुवम् ।। (64.11)
त्या मुनींना पाहुन माझ्यामनात भय निर्माण झाले.जीभ जड झाली शब्द बाहेर फुटेनात शक्य होतील तेवढिच अक्षरे अस्पष्ट पणे मुखातुन बाहेर पडली.
अज्ञानाद्भवत: पुत्र:सहसाभिहतो मया ।
शेषमेवं गते यत् स्यात् तत् प्रसीदतु मे मुनि:।।19
दशरथांनी सर्व वृत्तांत कथन केला ते म्हणतात अज्ञानाने माझ्या हातुन तुमचा पुत्र मारला गेला आहे त्यामुऴे तुम्हि मला शाप किंवा अनुग्रह द्यायला हे मुनिवर आपण प्रसन्न व्हा.


आपल्या हातुन अज्ञानाने जर काहि पाप घडले तर त्याची कबुली देवुन प्रायश्चित्त घेणे किंवा त्या करता शिक्षा भोगणे हे कर्तव्य आहे. मनुस्मृतित या विषयी फार उत्तम व मार्मिक श्लोक दिलाय
अधर्मेणैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
तत:सपत्नाञ्जयति समुलस्तु विनश्यति ।। (मनु.4.174)
अधर्म किंवा पापाचरणाने माणुस चटकन प्रगती उन्नत्ती करतो आपले कल्याण पाहतो मग शत्रुंवर विजय प्राप्त करतो शेवटि मात्र बांधव, पुत्र यांच्यासह समुऴ नष्ट होतो.याचे
उत्तम उदारण दुर्योधन आहे.त्याने पापाचरणाने पांडवांचे राज्य हरण केले ते तेरा वर्षे उपभोगले पुढे कौरवांचे काय झाले हे अापण जाणता.
राजाने आपली चुक स्विकारणे व त्या करता तापसी कुमाराच्या वडिलांकडे तुम्हि मला दंड देण्याकरता प्रसन्न व्हा हि विनंती करण यातच भारतीय राज्यव्यवस्थेचे श्रेष्ठत्व अधोरेखीत होते.
आपल्याकडे पापाचे क्षालन होण्याकरता विविध प्रायश्चित्तांचे व शिक्षेंचे वर्णन विविध स्मृतिग्रंथात विस्ताराने आलेय .यातुन राजाला हि सुटका नव्हती दुर्दैवाने लोकशाहित मात्र राजकीय नेते सहज पणे सुटतात कारण आपण गुन्हा केलेला ते मान्यच करत नाहित
अयोध्येचा युवराज असणारा दशरथ हा गुन्हा “सहज पचवु ” शकला असता परंतु त्याने तसे न करता आपला गुन्हा कबुल केला याचे कारण “पापाची भिती “
पाप पुण्य असते का? हा वाद आस्तिक व नास्तिकात सुरु आहे आपणाला त्यात तुर्त पडायचे नाहि परंतु समाजातल्या सज्जनांवर याचा पगडा होता तो पर्यंत अयोग्य वर्तन हेतुपुरस्सर केले जात नसे.
तुझ्या हातुन अज्ञानाने माझ्या बालकाची हत्या झालीय व तु ती कबुल केल्यामुऴे मी तुला शाप देतो.
पुत्रव्यसनजं दु:खं यदेतन्मम साम्प्रतम् ।
अेवं त्वं पुत्रशोकेन राजन् कालं करिषेयसि ।।54


हे राजन् मला ज्या प्रमाणे पुत्र शोकामुऴे दु:ख कष्ट होताहेत त्याच प्रमाणे तुला हि हे कष्ट होतील तु देखील काऴाच्या गाऴात रुतशील.
(बरेचदा कथाकार कीर्तनकार हा शाप म्हणजे पुत्रहीन दशरथाला वरदानच वाटले. या शापात पुत्रवियोग होणार म्हणजे निपुत्रीक दशरथाला एक प्रकारे आनंद झाला. हे सांगतात पण यात फार तथ्य नाहि कारण कौसल्येला दशरथ राजाने हा प्रसंग आपल्या विवाहाआधीचा आहे हे सर्व प्रथम सांगीतले आहे व मागील भागात त्याचा उल्लेख पाहिलाय जेव्हा दशरथराजांचे लग्नच झाले नव्हते तेव्हा पुत्र होत नाहि याचा शोक तो विवाहाआधी कसा करेल? त्यामुऴे हि चुक आपण सुधारावी व त्यांचा लक्षात आणुन द्यावी हि विनंती)
अनेकदा पाप व पुण्य हे समजताना जे पाप नाहि ते पुण्यच असते हा आपला गैरसमज असतो तो सर्व प्रथम दुर करावा अेक उदा.पाहा.
आपण आपले वाहन योग्य जागी उभे केले (पार्क केले) तर पोलीस आपणास बक्षीस देतात का? उत्तर नाहि असेच येते
पण अयोग्य स्थानी वाहन उभे केले तर मात्र दंड मात्र नक्कि करतात.
म्हणजे काहि गोष्टि या कर्तव्यात मोडतात त्या करणे हे अपेक्षीत व आवश्यकच असते त्या केल्या नाहित तर मात्र “दंड किंवा शिक्षा मात्र भोगावी लागते.
तापसी कुमाराच्या माता पित्यांनी दशरथाला मृत्युदंड शिक्षा दिली नाहि कारण हि हत्या अज्ञानाने झाली होती.
अज्ञानवश झालेल्या पापास कठोर दंड देवु नये हे वचन आहे तसच ज्याला दंड द्यायचा अाहे त्याचे वय व ज्ञान “कर्माचा हेतु ” लक्षात घेवुनच शिक्षा दिली जावी हे स्मृतिवचन आहे.


अेक उदारण पाहु
सैनिकांनी अतिरेक्याला मारले तर त्याला खुनाची शिक्षा होते कि बक्षीस मिऴते?
वरील घटना खुनाचीच आहे पण हेतु हा रक्षणाचा आहे त्यामुऴे ते पुण्यच ठरेल.
पाण्याचा तांब्या शाऴकरी मुलाकडुन सांडला तर अाई त्याला धपाटा देते पण रांगणार्या बाळाने पाणी सांडले तर त्याचे कौतुक होते लाडाने ओरडले जाते
आजोबांकडुन जर पाणी सांडले तर त्यांना विचारले जाते तुम्हाला काहि लागले तर नाहि ना?
कृती एकच झालीय मग शिक्षेत फरक का? कारण त्यांचे वय व ज्ञान हेहि विचारात घेतले जाते
आपल्याकडे गुन्हा कबुल करण्याची परंपरा आहे व गुन्हा कबुल केल्यानंतर त्याचे क्षालन हि करण्याची परंपरा आहे. हिच संस्कृती ख्रिश्चन धर्माने कन्फेशन म्हणुन स्विकारली आहे.


पापाची शुध्दि तपाने होते हेहि आपल्या शास्त्रात दिलय .वाल्मिकींनी रामनाम जप केल्यावर त्यांचे पूर्वाश्रमातले पाप नष्ट झाले व ते वंदनीय ठरले
राजा परीक्षिताचे पापक्षालन भागवत कथा श्रवणाने झाले व तो वंदनीय ठरला.
या दोन्हि उदारणात त्यांनी आपला गुन्हा आधी कबुल केलाय मग त्यांना अनुक्रमे नारदाने व शुकमुनींनी योग्य उपदेश केलाय हिच आपली संस्कृती आहे
त्यामुऴे अज्ञानाने झालेले पाप कबुल करण्याची व त्या करता योग्य शिक्षा किंवा दंड भरण्याची आपली तयारी ठेवणे यात गैर काहि नाहि.
चुकुन लायसन्स सोबत नसताना वाहन चालवताना पकडले गेलो तर अधिकृत दंड भरुन त्यातुन सुटका करुन घ्यावी.
हा गुन्हा दडपण्याकरता पोलीसांना दिलेली लाच हा दुसरा गुन्हा ठरेल व हा अक्षम्य ठरेल कारण तो हेतुपुरस्सर होईल.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *